ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
negative energy

बाहेरच्या लोकांची निगेटिव्ह एनर्जी बाधू नये म्हणून घरात हे उपाय करा

तुमच्या हे अनेकवेळा लक्षात आले असेल की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडते, काहीतरी आनंदाची बातमी असते आणि घरात आनंदाचे वातावरण असते, तेव्हाच काही नकारात्मक घटना घडू लागतात. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी हेवा करतात, मत्सर करतात. हे लोक आपल्या आजूबाजूलाच असतात. कधी ते शेजारी असतात तर कधी नातेवाईक किंवा कधी कधी तुमचे जवळचे मित्र देखील तुमचा हेवा करणारे असू शकतात. हे लोक आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी स्थान असलेले असतील तर त्यांच्याशी नातेही तोडले जाऊ शकत नाही. पण अशा लोकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटतो आणि जेव्हा ते तुमच्या घरी येतात तेव्हा ते त्यांच्यासोबत नकारात्मक ऊर्जा देखील घेऊन येतात. 

घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे कसे ओळखावे?

नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते. कधीकधी आपण आपल्या जीवनात सकारात्मक राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही, वाईट ऊर्जा घरात असू शकते. नकारात्मक उर्जेमुळे कुटुंबात अस्वस्थता, वाद आणि भांडणे होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेमुळे लोक आळशी, उदास आणि टॉक्सिक होतात. नकारात्मक ऊर्जा आपल्या मनातून आणि शरीरातून सकारात्मकता काढून टाकते. यामुळे आपल्याला निराश आणि थकल्यासारखे वाटते. जर तुमचे घर वरकरणी स्वच्छ आणि टापटीप असले आणि तरीही तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर घरात नकारात्मक आणि वाईट ऊर्जा आहे असे समजावे. जाणून घ्या काही उपायांबद्दल, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरात आलेली नकारात्मक ऊर्जा घालवून टाकू शकता. नकारात्मक व्हायब्रेशन्स  दूर करण्यासाठी आणि घरात नवीन सकारात्मक निरोगी ऊर्जा आणण्यासाठी हे सोपे मार्ग वापरून पहा.

Negative Energy At Home
Negative Energy At Home

घरातील अशी झाडे ठेवा जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात

झाडे हवेतील विषारी द्रव्ये शोषून घेतात, नकारात्मक ऊर्जा फिल्टर करण्यास मदत करतात आणि सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि सौभाग्य वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप उत्तर किंवा ईशान्येकडे ठेवा कारण तुळशीमध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते आणि ती चांगले व्हायब्रेशन्स निर्माण करू शकते. तसेच लकी बांबूचे झाड उत्तम आरोग्य आणि लव्ह लाईफमध्ये सकारात्मकता आणते. कोरफड ही नकारात्मक उर्जेचा प्रतिकार करते आणि हवा शुद्ध करते. चमेली प्रगतीशील ऊर्जा आकर्षित करते. आणि मनी प्लांट, पीस लिली आणि स्पायडर प्लांट सकारात्मक व्हायब्रेशन्स तयार करतात आणि नकारात्मक व्हायब्रेशन्स दूर करतात.

Negative Energy At Home
Negative Energy At Home

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज घरात कापूर जाळा 

घरात विशेषतः संध्याकाळी दिवेलागणीला कापूर जाळा. यासाठी तुम्ही कॅम्फर डिफ्युजर वापरू शकता किंवा घरात कापूर जाळून सगळ्या खोल्यांमध्ये फिरवा. यासाठी भीमसेनी कापूर वापरल्यास उत्तम. कारण तो नकारात्मक शक्ती दूर करण्यास प्रभावी आहे. घरात संध्याकाळच्या वेळी नैसर्गिक धूप लावणे, कापूर लावणे हा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

ADVERTISEMENT
Negative Energy At Home
Negative Energy At Home

प्रवेशद्वाराचे रक्षण करा 

नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराचे रक्षण केले पाहिजे. आपल्या संपूर्ण घराचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी, घोड्याची नाल प्रवेशद्वारावर उलटी लटकवा. जर तुमच्या घरात कोणी वाईट विचार घेऊन प्रवेश करत असेल तर हा उपाय त्या व्यक्तीची सर्व नकारात्मकता घराबाहेरच ठेवेल. तसेच घरात वाईट शक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी घराबाहेरच्या पायपुसण्याखाली (डोअर मॅट) मीठ ठेवणे हा आणखी एक उपाय आहे. सैंधव मीठ किंवा साधे मीठ घ्या आणि ते हवाबंद पिशवीत भरा. आता ही पिशवी डोअर मॅट खाली ठेवा व दर शनिवारी हे मीठ बदलत राहा.यामुळे नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच थांबेल. 

अशा प्रकारे घरातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाका. 

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
09 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT