कोरोनाने सोशल डिस्टसिंगच्या नावाखाली नात्यामध्येही दुरावा आणला आहे. विशेषत: जे longdistancerelationship मध्ये आहेत अशांना तर हा दुरावा अधिकच त्रासदायक वाटू लागला आहे. आधीच या नात्यामध्ये अंतर हे कारण बिघडण्यासाठी कारणीभूत असतं पण आता या लॉकडाऊन आणि बंद परिस्थितीमुळे या नात्यांमध्ये दुरावा येणारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांची नाती या काळात तुटली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन अनेकांच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. जितका लॉकडाऊनचा कालावधी वाढत आहे तितका हा दुरावा अधिकच वाढू लागला आहे. जर तुम्हालाही तुमचे नाते या लॉकडाऊनमध्ये अधिक दुरावल्याचे जाणवत असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करा आणि तुमच्या नात्यातील गोडवा अधिक वाढवा
#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती
बोला मन मोकळं करा
लॉकडाऊन झालं तरी अनेकांना वर्क फ्रॉम होममुळे खूप काम लागली आहेत. त्या कामातून वेळ काढताना खूप जणांची त्रेधातिरपीट उडते. सतत मीटिंग आणि कामामुळे जर तुमच्या जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर दिवसातून किमान एकदा तरी अशी वेळ काढा ज्या वेळी फोन कॉल शक्य नसेल तर एक मेसेज करा. कामाचा ताण जास्त आहे त्यामुळे मेसेज किंवा कॉल करणे जमत नाही हे तरी जोडीदारापर्यंत पोहोचवा. त्यामुळे तुम्ही खरं बोलत आहात हे तुमच्या जोडीदाराला कळेल आणि तुम्हालाही तिच्या संपर्कात राहिलात असे वाटेल. शक्य तेव्हा मनं मोकळं करा. मेसेजवरुन शक्य असेल तर एकमेकांना इमोजी पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करा.
चांगल्या गोष्टी आठवा
लॉकडाऊनच्या आधी तुम्ही नक्कीच चांगला काळ घालवला असेल. पण आता आहे त्या परिस्थितीला स्विकारुन चांगला काळ आठवा. कधीकधी जुन्या गोष्टींचा आनंद हा देखील तुम्हाला काही काळासाठी शांत करतो. तुमची भेटण्याची तीव्र इच्छा थोडी फार का असेना कमी करतो. त्यामुळे साजरे केलेले वाढदिवस, एखादी भेट आणि त्याचे फोटो शेअर करा. त्यामुळे तुम्हाला तुमचे नाते आठवते. एकमेकांपासून दूर जाण्याचा विचार करत असाल तर तो विचार थोडासा मागेच राहील.
रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या
भविष्याचे प्लॅनिंग करा
भविष्याचा विचार हा नेहमी नव उर्जा देणारा असतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा भविष्याचे प्लॅनिंग करा. भविष्याचे प्लॅनिंग केल्यामुळे सध्या घडत असलेल्या काही कुरबुरींचाही विसर पडतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा भविष्याचे प्लॅनिंग करा. तुम्ही लग्न कसे करणार? तुम्हाला काय काय खरेदी करायची आहे त्याचा विचार करा. त्यामुळे भविष्याचे प्लॅनिंग करा त्यामध्ये आपला वेळ घालवा.
सकारात्मक विचारांची देवाणघेवाण
दिवसभरात तुमच्यासोबत काय चांगल्या घटना घडल्या याची माहिती एकमेकांना द्या. त्यामुळे तुम्ही चांगल्या विचारांची देवाणघेवाण करा. त्यामुळेही तुमचा तो वेळ चांगला जातो. सकारात्मक विचारांनी एकमेकांबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यामुळे ब्रेकअप हा पॅच विसरायला होतो. त्यामुळे सकारात्मक विचार शेअर करा.
रिलेशनशीप चँलेजेस घ्या
जर तुम्हाला सोशल मीडिया फॉलो करायला आवडत असेल तर तुम्ही सोशल मीडियावरील वेगवेगळे चॅलेंजस घेत राहा. जसं मजेदार रिलेशनशिप स्टेट्स ठेवणे. त्यामुळे तुमचा वेळ निघून जाईल. सध्या याच गोष्टीमुळे अनेकांनी नवंनवे चॅलेंजेस घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा दुरावा ही कमी झाला आहे.
आता कोरोना काळात नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचे नाते टिकवा.
हेही वाचा –
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आहे या गोष्टींंची गरज (How To Deal With Breakup)