ADVERTISEMENT
home / पालकत्व
तान्ह्या बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहावा यासाठी करा हे  सोपे उपाय

तान्ह्या बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहावा यासाठी करा हे सोपे उपाय

बाळाच्या जन्मानंतरही पुढे काही महिने त्याच्या शरीराचा विकास होतच असतो. जन्माच्या वेळी बाळाची कवठी पूर्णपणे विकसित झालेली नसते. ज्यामुळे जन्माच्या वेळी बाळाच्या डोक्याचा आकार पूर्ण गोल कधीच नसतो. शिवाय जन्माच्या वेळी त्याचे  डोके मऊ आणि ओबडधोबड शेपचे असते. मात्र नंतर  हळूहळू त्याची टाळू भरते आणि डोक्याचा आकार गोलकार होतो. बाळाच्या डोक्याचा शेप बिघडण्याची  कारणे अनेक असू शकतात. मात्र विशेषतः जर बाळाला झोपवताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्याच्या डोक्याचा शेप बिघडण्याची शक्यता जास्त असते. यासाठीच बाळाच्या डोक्याचा शेप गोल ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Instagram

बाळाच्या डोक्याचा शेप बिघडण्याची कारणे

बाळाचा जन्म होताना त्याचे शरीर गर्भाशयातून बाहेर पडण्यासाठी योग्य अशा पद्धतीचे असते. म्हणजेच त्याच्या डोक्याचा आकार ओबडधोबड आणि मऊ असतो. मात्र जन्मानंतर त्याच्या शरीराला हळूहळू मजबूती आणि बळकटपणा येऊ लागतो. बाळाच्या डोक्याचा आकार आणि कवठी जन्मानंतरच विकसित होत असते. यासाठीच जन्मानंतर बाळाची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. जर बाळाला चुकीच्या पद्धतीने झोपवलं तर त्याच्या डोक्याचा आकार बिघडण्याची शक्यता असते. बऱ्याचदा प्रि मॅच्युअर बाळाच्या डोक्याचा आकार अशा पद्धतीने बिगडण्याची जास्त शक्यता असते. प्रि-मॅच्युअर आणि जुळ्या, तिळ्या बाळांना अपुऱ्या जागेमुळे जन्म होताना गर्भात हालचाल व्यवस्थित न करता आल्यामुळे त्याच्या डोक्याचा शेप बिघडण्याची शक्यता असते. अशा अनेक कारणांमुळे बाळाच्या डोक्याचा आकार गोल नसू शकतो. मात्र जन्मानंतर मालिश आणि योग्य काळजी घेऊन तो नक्कीच बदलता येतो. 

ADVERTISEMENT

Instagram

बाळाच्या डोक्याचा विकास कधीपर्यंत होऊ शकतो –

जन्माच्या वेळी कवठी पूर्ण विकसित न झाल्यामुळे बाळाला टाळू असते. टाळू म्हणजे त्याच्या डोक्यात एक ते दोन ठिकाणी खूपच मऊपणा आढळतो. या भागांना फोंटनेल असं म्हणतात. जन्मानंतर त्याच्या डोक्याच्या पाठीमागचा भाग जवळजवळ सहा आठवड्यांमध्ये विकसित होतो तर वरील भाग विकसित होण्यासाठी 9 ते 18 महिन्यांचा  कालावधी लागू शकतो. म्हणूनच या कालावधीत बाळाच्या डोक्याचा शेप व्यवस्थित राहावा याची योग्य काळजी  घ्यावी लागते. कारण चुकीच्या पद्धतीने बाळाला झोपवल्यामुळे हा शेप बिघडू शकतो. 

ADVERTISEMENT

Instagram

बाळाच्या डोक्याचा शेप गोलाकार करण्यासाठी उपाय –

  • बाळ एकाच स्थितीत झोपणार नाही याची काळजी घ्या. जर तुमचे बाळ एकाच पोझिशनमध्ये झोपले तर त्याच्या डोक्याच्या तो भाग दाबला जाऊन चपटा होतो. म्हणून  त्याला  निरनिराळ्या पोझिशनमध्ये झोपण्याची सवय लावा.
  • बाळाची कुशी सतत बदलत राहा ज्यामुळे ते एकाच स्थितीत बराच वेळ झोपणार नाही. 
  • बाळाला पाळण्यापेक्षा झोळीत झोपवा ज्यामुळे त्याचे  डोके आणि शरीराला योग्य आकार मिळेल. 
  • झोपल्यावर बाळाच्या डोक्याच्या आजूबाजूने कापडाची गुंडाळी करून ठेवा. ज्यामुळे त्याचे डोके वळले जाणार नाही. यासाठी एखादी मऊ, सुती साडी अथवा ओढणीचा वापर करा.
  • पूर्वी बाळाला मोहरी भरलेली कापडी उशीवर झोपवले जात असे. ज्यामुळे बाळाच्या डोक्याचा आकार बदलत नाही. शक्य असल्यास बाळासाठी ही उशी बनवून घ्या. आजकाल बाळासाठी तयार उशाही बाजारात मिळतात.
  • बाळ मान सावरू लागल्यावर त्याला दिवसभरात कमीत कमी  तीस मिनीटे उपडी म्हणजेच पोटावर झोपवा ज्यामुळे त्याच्या डोक्याच्या पाठीकडील भागावर दाब येणार नाही.
  • बाळाला योग्य पद्धतीने मालिश करा. ज्यामुळे त्याच्या डोक्याचा शेप सुधारेल.
  • सहा महिन्यानंतरही जर बाळाच्या डोक्याचा शेप गोल झाला नसेल तर डॉक्टर त्यांना विशिष्ठ हेल्मेट घालण्याचा सल्ला देतात. 
  • मात्र हे हेल्मेट तुमच्या बाळाला घालण्याची वेळ पडू नये यासाठी वेळीच त्याची काळजी घ्या.

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

बाळासोबत प्रवास करताय, मग या गोष्टींची घ्या काळजी

बाळंतपणानंतर स्ट्रेचमार्क्स दूर करण्यासाठी असा वापर करा कॉफीचा

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

07 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT