ADVERTISEMENT
home / Care
केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग

केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग

कोथिंबीरचा उपयोग स्वाद वाढविण्यासाठी भाजी अथवा चटणीमध्ये करण्यात येतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण केसांसाठी कोथिंबीरचा उपयोग हे ऐकल्यावर थोडं विचित्र वाटतं ना? पण कोथिंबीर केसांच्या विकासासाठी आणि केस अधिक चमकदार करण्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक उपायांपैकी एक आहे. केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कोथिंबीरचा उपयोग वेगवेगळ्या तऱ्हेने केला जातो. कोथिंबीरचा उपयोग हा केसांच्या वाढीसाठी आणि केसांना आवश्यक पोषक तत्व मिळण्यासाठी करून घेता येतो.  कशाप्रकारे याचा घरच्या  घरी उपयोग करून घ्यायचा  याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीदेखील याचा उपयोग करून केसांची चमक अधिक वाढवू शकता. केस स्वच्छ करताना हातांची काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यासाठी वापरा MyGlamm चे वाईटपआऊट. 

कोथिंबीरच्या पानांची पेस्ट

Shutterstock

ताज्या कोथिंबीरची पानं घ्या. अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या.  ही पेस्ट थोडी जाडसर राहू द्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही आपल्या स्काल्पला लावा. ही पेस्ट अगदी मुळापासून लागली आहे की नाही ते पाहून घ्या.  त्यानंतर साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा आणि केसांना शँपू लावा आणि केस धुवा.  हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दन वेळा करू शकता. एक आठवड्यानंतर केसांवर झालेला परिणाम पाहा. साधारण तीन ते चार आठवड्यानंतर तुम्हाला केस अधिक मजबूत आणि चमकदार दिसून येतील. तसंच ही पेस्ट केसांची वाढ करण्यासाठीही उपयोगी ठरते.  

ADVERTISEMENT

मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई (How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair)

कोथिंबीरच्या पानांचा रस

Shutterstock

कोथिंबीरची ताजी पानं घ्या आणि त्याची पेस्ट करा.  पेस्ट तयार झाल्यावर ही  पेस्ट थोडी पातळसर करा आणि एका कपड्यात घालून त्याचा रस भांड्यात पिळून काढा.  याचा रस वेगळा काढला की तुम्ही  तो रस स्टोअर करून ठेवा.  आपल्या हेअरब्रशने हा रस केसांना लावा. साधारण अर्धा तास लाऊन ठेवा आणि मग केसांना माईल्ड शँपूने धुवा. हा रस आठवड्यातून दोन वेळा तुम्ही केसांना मुळापासून लावा. यामुळे केस अधिक चमकदार होतील आणि केसगळती कमी होऊन केसांची वाढही होईल. 

ADVERTISEMENT

‘या’ आजारांवर गुणकारी ठरते कोथिंबीर, जाणून घ्या फायदे

कोथिंबीरच्या बियांची अर्थात धणे पावडर

Shutterstock

सुके धणे अर्थात ज्याला कोथिंबीरच्या बियादेखील म्हटले जाते ते वाटून त्याची पावडर करून घ्या.  ही पावडर एका भांड्यात घ्या आणि त्यात तेल मिक्स करा. ही पेस्ट तुम्ही केसांना लावा आणि मसाज करा. साधारण एक तासाने तुम्ही केस माईल्ड शँपूने धुवा.  तुम्हाला मऊ मुलायम आणि चमकदार केस मिळतील. केसांची वाढ होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहू शकता. 

ADVERTISEMENT

कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण (Coriander Benefits In Marathi)

कोथिंबीरच्या पाण्याने धुवा केस

Shutterstock

तुम्ही कोथिंबीरच्या पाण्यानेही केस धुऊ शकता. यासाठी काही ताज्या कोथिंबीरची पाने घ्या आणि साधारणतः 15-20 मिनिट्स पाण्यात कोथिंबीर उकळून घ्या. नंतर पानं बाहेर काढा आणि पाणी थंड करून बाटलीत भरून ठेवा.  केसांच्या मुळाला हे  पाणी लावा आणि साधारण 10-15  मिनिट्स मसाज करून नंतर माईल्ड शँपूने केस धुवा. केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.  तसंच हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. केसांना चमक देण्यासह केसांना मजबूतीदेखील कोथिंबीरच्या या पाण्यामुळे मिळते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त केसांसाठी याचा वापर करून घेऊ शकता.  

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

पुढे वाचा – 

Health Benefits of Coriander in Hindi

29 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT