Advertisement

DIY फॅशन

सिल्कची साडी धुवा घरी, जाणून घ्या सोप्या टिप्स

Dipali NaphadeDipali Naphade  |  Aug 24, 2020
सिल्कची साडी धुवा घरी, जाणून घ्या सोप्या टिप्स

Advertisement

 

पारंपरिक साडी नेसायची म्हटली की पहिल्यांदा मनात येते ती सिल्कची साडी. आपल्याकडे खास कार्यक्रमात नेसण्यासाठी हमखास सिल्कची साडी असते. अगदी अनेक अभिनेत्रीही सिल्कच्या साड्यांना पसंती देतात. सिल्कच्या साडीमध्ये एक वेगळीच चमक असते आणि आकर्षकताही. सिल्कची साडी मुळात महाग असते आणि त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे सिल्कची साडी नेसल्यानंतर बऱ्याचदा ती साडी धुण्यासाठी लाँड्रीमध्येच द्यावी लागते. सिल्कच्या साडीची योग्य काळजी घेतली नाही तर त्याची चमक निघून जाते आणि मग साडी चांगली दिसत नाही. त्यामुळे ही साडी घरी धुता येत नाही असा समज आहे. पण प्रत्येक वेळी साडी ड्रायक्लिनिंगला देणे प्रत्येकाला परवडू शकतेच असं नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमची सिल्कची साडी घरच्या घरी धुवायची असेल आणि तशीच चमक राखायची असेल तर आम्ही तुम्हाला साडी धुण्याची योग्य पद्धत या लेखातून सांगत आहोत. तुम्ही या पद्धतीचा वापर केल्यास, सिल्कची साडी उत्तम तर राहीलच त्याशिवाय त्याची चमकही राहील. 

हाताने साडी धुण्याची पद्धत

 

सिल्कची साडी तुम्ही घरच्या घरी हाताने धुऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायला हवे ते आम्ही इथे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगतो. त्याप्रमाणे तुम्ही पद्धत अवलंबली तर तुमची साडी तशीच्या तशी राहील. 

 • सिल्कची साडी धुण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही बादली पाण्याने भरून घ्या 
 • पाण्यात सिल्क साडीसाठी मिळणारे खास डिजर्टंज मिक्स करा 
 • तुमच्याकडे डिटर्जंट नसेल तर तुम्ही बेबी शँपूचा वापर करा
 • त्यानंतर साडी या पाण्यात पाच मिनिट्स बुडवून ठेवा 
 • त्यानंतर दुसऱ्या बादलीत पाणी घ्या आणि त्यात व्हाईट व्हिनेगर थोडंसं मिक्स करा 
 • व्हिनेगर घातल्याने साडीतील अतिरिक्त राहिलेला साबण निघून जाण्यास मदत  होते
 • या पाण्यातून साडी पुन्हा काढल्यावर तिसऱ्यांदा पुन्हा  बादलीत पाणी घ्या 
 • त्यामध्ये फॅब्रिक कंडिशनर मिक्स करा 
 • त्यानंतर स्वच्छ आणि सुक्या कपड्यावर धुतलेली सिल्क साडी ठेऊन तो कपडा रोल करून घ्या 
 • आता टॉवेल घेऊन हलक्या हाताने दाबून साडीतील अतिरिक्त पाणी काढून टाका. नेहमीसारखी पिळू नका. सिल्कच्या
 • साडीतील पाणी काढण्याची ही पद्धत योग्य आहे 
 • पुन्हा साडी दुसऱ्या सुक्या टॉवेलवर ठेवा आणि मग हवेवर सुकू द्या

सिल्कच्या साड्या जपण्यासाठी घ्या अशी काळजी, अन्यथा साड्या होतील खराब

सिल्कच्या साडीवर डाग पडल्यास

 

तुमच्या सिल्कच्या साडीवर एखादा डाग लागला असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे डाग काढून टाकण्यास सोपे जाईल. 

 • डाग लागल्यावर लगेच साफ करा 
 • डाग सुकल्यावर त्याचे पडलेले निशाण काढून टाकणं अत्यंत कठीण होतं. त्यामुळे तुम्ही व्हाईट व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाच्या मदतीने हा डाग काढू शकता. 
 • डाग पडलेल्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस चोळा. डाग त्वरीत निघून जाण्यास मदत मिळते

सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

याची घ्या काळजी

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

 

In frame @emy_kofficial ✨✨ Saree – @va_di_vu MUA – @kanchana_mua 📸 – @photonimage_by_daran Blouse design – @bespokeblousesdesigner Follow @south_saree_love DM for collaboration 👯‍♀️ Tag your pics to get featured ♥️ DM your pics for shoutout ♥️ Support us 😊 Spread happiness and love 💗 ‌#saree #southindiansareelove #sareelove #sareelovers #sareedraping #sareesofinstagram #sarees #sareeseduction #sareeblouse #sareesusa #indianwear #sixyardsofelegance #kanchipattu #silksaree #silksarees #indianmodel #mallugram #designersarees #designersaree #sleevelessblouse #sareeinspiration #southsareelove #pattusarees #indianmua #keralagram #sareegram #sareeuk #indianjewellery #weddingphotography

A post shared by South indian saree love (@south_saree_love) on Aug 24, 2020 at 3:27am PDT

 

सिल्क साडी धुण्याआधी त्याचा रंग जातो की नाही याची व्यवस्थित तपासणी करून घ्या. सिल्क साडीचा रंग जात असल्यास, तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते. सिल्क साडी धुण्यासाठी क्लिनिंग डिजर्टंज सॉफ्ट असणंही तितकंच गरजेचं आहे. कारण हार्ड डिटर्जंट आणि ब्लीच साडी खराब करू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी सिल्कची साडी घरी धुताना घेणं अत्यंत आवश्यक आहे. जुनी झाल्यावर साडीचा ड्रेसही शिवू शकता. 

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

साडीवरील मराठी स्टेटस

Old Sadicha Dress Design In Marathi