चांगल्या आरोग्यासाठी काय खावं आणि काय नको हा सगळ्यांना पडलेला प्रश्न…पण जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर तुम्ही काही नियमांचे हमखास पालन करायला हवे. तुम्ही दुपारी काय जेवताय याकडे तुमचे लक्ष हवे. कारण तुम्ही दुपारी जो आहार घेता त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. तुम्ही गृहिणी असा किंवा नोकरी करणारे तुम्ही दुपारच्या आहारात या गोष्टींचा समावेश अगदी हमखास करायला हवा.
बटाट्याशिवाय तुमचेही जेवण होत नाही पूर्ण, मग वाचाच
दुपारचे जेवण का महत्वाचे?
आता अनेकांना असे वाटते की, आम्ही घरी आल्यानंतर चांगल्या गोष्टी खातो. मग दुपारी जेवणात काय असतं याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. पण हा विचार करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. जेवणासंदर्भातील नियम सांगताना नेहमी असे सांगितले जाते की, दुपारचे जेवण हे राजासारखे असायला हवे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे. त्यामागे कारण आहे तुमची पचनशक्ती. दुपारी तुम्ही जे खाता ते पचण्यास मदत मिळत असते. त्यामुळे तुम्ही जितक्या पौष्टिक गोष्टी खाल त्याचा तुम्हालाच फायदा मिळत असतो. आता दुपारच्या जेवणात नेमक्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात त्या पाहुया.
दुपारच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश
भाजी- पोळी
सर्वसाधारणपणे अगदी सगळ्याच नोकरदारवर्गांच्या डब्यात भाजी-पोळीच असते. ही खूप चांगली सवय आहे. तुम्हाला आवश्यक असलेले फायबर, प्रोटीन यातून मिळत असतात. काहींना पोळी तोडायला ती चावून खायचा कंटाळा असतो. अशांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, पोळी ही आरोग्यासाठी चांगली असते. त्यामुळे किमान दोन मध्यम आकाराच्या पोळ्या तरी तुम्ही तुमच्या आहारात असायलाच हव्यात. पोळी ऐवजी भाकरी आणि भाजी ऐवजी नॉनव्हेज असेल तर चालू शकेल.
उन्हाळ्यातील बोअरींग जेवणाला करतील ही झटपट लोणची चटकदार
वरण- भात
जर तुम्हाला वरण-भात खायचा असेल तर तुम्ही तो दुपारी खा. काहीजणांना भाताशिवाय अजिबात करमत नाही. अशांना जर भात खायचा असेल तर त्यांनी दुपारी खावा. डाळ गरम करण्याची सोय असेल तर फार उत्तम. पातळ वरण, भात, तूप, लिंबू असे कॉम्बिनेशन फारच छान लागते. सोबत लिंबाचे लोणचे वा वा क्या बात है. तुम्ही भात खाऊ असाल तर तुमच्या जेवणात किमान दोन ते तीन घास तरी भात असू द्या.
भरपूर सॅलेड
आता निरोगी आरोग्याचा विचार करत असाल तर तुमच्या आहारात या सगळ्यासोबतच भरपूर सॅलेड असायला हवे. तुम्ही जास्तीत जास्त सॅलेड खाल तितके तुम्हाला हलके वाटेल. काकडी, टोमॅटो,बीट हे अगदी बेसिक सॅलेड तुमच्या आहारात असायला हवे.
अॅल्युमिनिअमच्या भांड्यात जेवण करताय, मग एकदा वाचाच
दही किंवा ताक
काहींना जेवणानंतर दही किंवा ताक प्यायची सवय असते. जर तुम्हाला ही सवय असेल तर ही खूप चांगली सवय आहे तुम्ही अगदी आवर्जुन तुमच्या जेवणात ताकाचा समावेश करा. ताकात जर तुम्हाला पुदीन्याची पाने टाकता आली तर फारच उत्तम
दुपारी जेवायचे आहे म्हणून खूप जेवू नका. पोटात थोडी जागा कायम रिकामी असून द्या. जर तुम्ही अशा पद्धतीने जेवण केले तर तुम्हाला निरोगी आरोग्य मिळेल. मग आता दुपारच्या आहारात काहीही खाण्यापेक्षा आवश्यक असलेल्या पदार्थांचा समावेश करा.