दातांमधील फटी कमी करण्यासाठी तारा लावण्याशिवाय पूर्वी कोणत्याही वेगळ्या पद्धती नसायच्या. त्यामुळे ब्रेसेस शिवाय पर्याय नसायचा. ब्रेसेस लावल्यानंतर काही काळ दात आणि हिरड्यांमधून चांगलीच सणक जायची. काही खायलाही व्हायचे नाही. त्यामुळे खूप जण दातांच्या समस्या असून देखील डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला अजिबात बघत नाही. पण आता अशा काही ट्रिटमेंट्स आल्या आहेत ज्यामुळे दुखापत होत नाही पण हवे तसे दात नक्कीच करुन मिळतात. आज आपण जाणून घेणार आहोत ‘इन्विझिलाईन’ (Invisalign) या ट्रिटमेंटबद्दल. दातांवर लावल्यानंतर या ब्रेसेस दिसत नाहीत. पण अगदी काही महिन्यातच तुमच्या दातांमधील फटी कमी करुन तुम्हाला योग्य दात देण्यासाठी मदत करतात.
इन्विझिलाईन (Invisalign) म्हणजे काय?
इन्विझिलाईन या प्लास्टिकच्या ब्रेसेस असतात.त्या तुमच्या दाताला फिट बसतात. याचे काही सेट्स तुम्हाला दिले जातात. जे तुम्हाला काही काळानंतर बदलायचे असतात. य प्लास्टिकच्या इन्विझिलाईन घातल्यानंतर तुमचे दात आपली जागा बदलू लागतात. हा बदल ब्रेसेस जशा बदलतात तसा होऊ लागतात. या ब्रेसेस दिसत नसल्यामुळे तुम्ही दिवसभर त्या घालू शकता. दिवसातील जास्तीत जास्त वेळ तुम्हाला हे ब्रेसेस घालायचे असतात. त्यानंतरच दातांवर परिणाम झालेला दिसून येतो. वेगेवगळ्या ठिकाणी इन्विझिलाईन करुन मिळतात. जर तुम्हाला इच्छित दात हवे असतील तर तुम्ही असे इन्विझिलाईन करुन घेऊ शकता.
तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का
अशी केली जाते पूर्वतयारी
इन्विझिलाईन लावण्याआधी तुम्हाला इन्विझिलाईन लावणाऱ्या स्पेशल डेंटिस्टचीच गरज असते. आर्थोडेंटल तुम्हाला या विषयी अधिक माहिती देऊ शकतात. दातांची तपासणी केल्यानंतर तुमच्या दातांची बाईट कशी आहे. कोणत्या दातांना बदलायची गरज आहे. हे तपासले जाते. वर वर ही तसासणी केल्यानंतर योग्य पद्धतीने चाचणी करण्यासाठी एक रिपोर्ट मागवला जातो. जो तुमच्या संपूर्ण दातांचा असतो. हा एक प्रकारे दातांचा थ्रीडी एक्स रे असतो. हा काढल्यानंतर तुमच्या दातांची ठेवण नेमकी कशी आहे ते कळते. त्यानुसार तुमच्या दातांमध्ये कसा बदल होईल हे दाखवले जाते. त्यामुळे तुमचे दात कसे बदलणार आहेत हे देखील आपल्याला कळते.
दात सरळ करण्याच्या या डेंटल पद्धती आहेत फारच फायद्याच्या
इन्विझिलाईन लावल्यानंतर
आता तुम्ही इन्विझिलाईन लावण्याचा निर्णय घेतला असेल. तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात
- इन्विझिलाईन लावल्यानंतर तुम्हाला खाता येत नाही. हे लावल्यानंतर तुम्ही कधीही काहीही खाऊ नका. कारण त्यामुळे इन्विझिलाईन खराब होण्याची शक्यता असते.
- पहिल्यांदा इन्विझिलाईन लावल्यानंतर दातांवर थोडे वेगळे वाटते. काहीजणांना काहीतरी लावल्याची देखील जाणीव होऊ लागते. पण तुम्ही तरी देखील त्या काढू नका. कारण असे केल्यास तुम्हाला दातांमध्ये कोणताही फरक जाणवणार नाही. म्हणजेच तुम्हाला त्याचा फायदा होत नाही.
- इन्विझिलाईन दातांवर किमान 8 ते 9 तासांसाठी ठेवायच्या असतात. तरच त्याचा फायदा तुम्हाला होतो. त्यामुळे ज्या ज्या वेळी तुम्हाला असे वाटेल की, तुम्हाला काही खायचे आहे त्यावेळीच तुम्ही ते काढा. पुन्हा दात स्वच्छ करुन मगच इन्विझिलाईन लावा. म्हणजे दातांची स्वच्छता राखली जाईल.
- इन्विझिलाईन लावण्यासोबतच त्यांची स्वच्छता राखणे देखील गरजेचे असते.रोज रात्री लावताना किंवा काढताना त्या पाण्याखाली स्वच्छ करा. स्वच्छ पुसून घ्या.म्हणजे त्या स्वच्छ राहण्यास मदत मिळेल.
आता दातांची ट्रिटमेंट करताना अशा पारदर्शक ब्रेसेस नक्की लावा.
दातांची स्वच्छता करण्यासाठी असा करा फ्लॉसचा उपयोग