बिग बॉस (Bigg Boss) हा असा रियालिटी शो आहे जो एकदा बघायला सुरूवात केली की, त्याची एक प्रकारची धुंद चढते. मग खेळाडू कोणीही असो आपल्या वागण्याबोलण्याने आणि खेळाने या कार्यक्रमाला रंगत आणतातच. मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi Season 3) सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि आता खरी खेळ रंगायला सुरूवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात गोड आणि एकमेकांशी चांगले असणारे स्पर्धक आता खऱ्या अर्थाने आपले रंग आणि आपला खेळ दाखवू लागले आहेत. यामध्ये सध्या वरचढ आहेत ते म्हणजे विकास पाटील (Vikas Patil) आणि विशाल निकम (Vishal Nikam). या दोघांची मैत्री बघून हिंदी बिग बॉसमधील राहुल वैद्य आणि अली गोनीची (Rahul Vaidya and Aly Goni) आठवण आल्याशिवाय राहात नाही. तसंच दोघेही टिकायला इथे आले आहेत हे स्पष्ट होतंय. तर पहिल्याच आठवड्यात छाप पाडणारा जय दुधाणे (Jay Dudhane) मात्र मीरा जगन्नाथ आणि गायत्री दातारच्या (Meera Jagannath and Gayatri Datar) नादाला लागून आपला खेळ खराब करून घेत आहे असं वाटू लागलं आहे.
अधिक वाचा – Biggboss मराठी 3 : स्नेहा आणि आविष्कारमध्ये पडणार वादाची ठिणगी
जय चुकीच्या ट्रॅकला
मैत्री असणं आणि खेळ खराब करणं यात फरक आहे. जयची गायत्री आणि मीराबरोबर चांगली मैत्री आहे पण या दोघांच्या या मैत्रीमुळे जयचा खेळ सध्या खराब होत असून त्याची इमेज प्रेक्षकांमध्येही खराब व्हायला वेळ लागणार नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. पहिल्याच आठवड्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वेध या दोघींमुळे नक्कीच मागे राहू शकतो असंही म्हणावं लागेल. वेळीच जयने सावध होत आपला खेळ सुधारायला हवा. हल्ला बोल या टास्कमध्ये जयचं वागणं नक्कीच खटकणारं होतं. मात्र एक स्पर्धक म्हणून तो अत्यंत उत्तम आहे. गायत्री आणि मीरामुळे जयचा खेळ खराब होतोय असं अनेकांना आता वाटू लागलं आहे. मात्र याची जाणीव जयला होणंही गरजेचे आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जो टिकतो त्याचे एकमेकांसह नाते सतत बदलत असते. त्यामुळे आता त्यांची मैत्री कितपत राहणार हे पाहवं लागेलच. पण जयने आपल्या खेळाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असंही आता सोशल मीडियावर सांगितले जात आहे.
अधिक वाचा – Biggboss Marathi season 3 : लहानपणी खूप खोडकर होता बिग बॉस मराठी मधला हा स्पर्धक
चावडीवर नक्की काय होणार
या आठवड्यात घडलेल्या घटनांमुळे आता शनिवार आणि रविवारी नक्की महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या चावडीवर काय होणार याचीच आता प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. मागच्या आठवड्यात मीरा आणि गायत्रीची कानउघडणी केल्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक जाणवलेला नाही. उलट या आठवड्यात गायत्रीचा उद्दामपणाच जास्त दिसून आला आहे आणि त्याला जयची साथही मिळाली आहे. त्यामुळे यावेळी सर्व काही जयच्या अंगाशी येणार का? असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र जयचा खेळ चांगला व्हायला हवा असेल तर त्याने योग्य लोकांची साथ ठेवायला हवी असं त्याच्या चाहत्यांनाही वाटत आहे. गायत्री आणि मीराची साथ देऊन नक्कीच त्याचा खेळ चांगला होणार नाही असंही आता म्हटलं जात आहे. त्यामुळे आता शनिवार आणि रविवारी नक्की काय घडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक वाचा – श्वेता तिवारीची बिघडली तब्येत, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक