ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
कलमकारी ब्लाऊज

कलमकारी आणि इकत ब्लाऊजचा वापर करुन दिसा ट्रेंडी

 साडी नेसायला तुम्हाला आवडत असेल तर साडीवरील सगळ्या स्टाईल कॅरी करायला तुम्हाला नक्कीच आवडतात. साडी कशी नेसायची हे जाणून घेतल्यानंतर साडीवरील ब्लाऊज हा सगळ्यात जास्त महत्वाचा आणि तुमच्या लुकचा गेम चेंजर असा घटक असतो. तुम्हाला नव्या ट्रेंडी आणि लेटेस्ट अशा फॅशन कॅरी करायला आवडत असतील तर अगदी कोणत्याही सीझनसाठी तुम्ही कलमकारी आणि इकत ब्लाऊजची स्टाईल कॅरी करायला हवी. यामुळे तुमच्या लुकमध्ये बराच फरक पडतो. साडयांचे प्रकार वेगवेगळे आहेत. या साड्यांच्या प्रकारानुसार तुम्ही कोणत्या साडीवर या पैकी कोणता ब्लाऊज घालायला हवा ते जाणून घेऊया.

कलमकारी ब्लाऊज 

कलमकारी ब्लाऊज

कलमकारी हा चित्रकलेचा एक प्रकार आहे. यामध्ये कपड्यावर वेगवेगळी चित्रे काढली जातात. अनेक ठिकाणी कलमकारी करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. आदल्या दिवशी कपडा रंगाच्या पाण्यात भिजवला जातो. त्याने चांगला रंग घेतला आणि तो वाळला की मग त्यावर वेगवेगळी चित्रे काढली जातात. काही ठिकाणी याचे छापे मिळतात. ते डिझाईनचा विचार भरले जातात.  अशा प्रकारे कलमकारी कापड तयार केले जाते. आता कलमकारी ही खरीखुरी कॉटनवरच केली जाते. त्यामुळे याचे ब्लाऊज हे कॉटन असतात. लेहंगा आणि साडीसाठी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला माहीत असायला हवेत. वेगळ्या शेड्समध्ये आणि डिझाईन्समध्ये मिळणारे हे कलमकारी पीस तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या पॅटर्ननुसार शिवू शकता. या कलमकारी ब्लाऊजवर चांगल्या दिसणाऱ्या साड्या

  • कोणतीही प्लेन कॉटन साडी 
  • सिल्क साडी 
  • कलमकारी साडी ( त्यावर कॉन्ट्रास ब्लाऊज)

इकत ब्लाऊज

इकत ब्लाऊज

प्रत्येक महिलेला आवडणारा असा कपड्याचा प्रकार म्हणजे इकत ब्लाऊज. इकत हा एक डायिंगचा प्रकार आहे. जो इंडोनेशियामधून आला आहे. ज्याच्या बेसवर एखादा गडद रंग असतो आणि त्यावर स्ट्रोक्सच्या लाईट रंगाच्या डिझाईन्स असतात. याच्या रंगामुळेच खूप जणांना हा प्रकार जास्त भावतो. इकतमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील. हल्ली कॉटन वगळता वेगळ्या काही मटेरिअलमध्ये अशा डिझाईन्स मिळतात. पण कॉटन ब्लाऊजला कशाचीच तोड नसते.  त्यामुळे तुमच्या कोणत्याही साध्या साडीचा लुक रिच होण्यास मदत मिळते. तर खणाच्या साडीचा आणि खणाचे ब्लाऊज शिवण्याचाही ट्रेंड आला आहे. इकतमध्ये हल्ली अनेक ठिकाणी रेडिमेेड प्रकारातील ब्लाऊज मिळतात. जे फिटिंगलाही चांगले बसतात. असे कॉटन हँडलुम ब्लाऊज तुम्हाला घेता येतील या शिवाय हल्ली अनेक ठिकाणी इकतचे चांगले कापडही मिळते. ते देखील तुम्ही अगदी हमखास खरेदी करु शकता. 

  • कॉटन साडी 
  • सिल्क साडी 
  • प्लेन साडीचा कोणताही प्रकार 

ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही ही या प्रकारात स्टायलिश ब्लाऊज शिवला तर तो अधिक चांगला उठून दिसेल. तुमची साडी कितीही साधी असली तरी देखील हे ब्लाऊज त्याला एक वेगळा न्याय नक्कीच देऊ शकतील.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

जाणून घ्या प्री प्लेटिंग साड्यांचा ट्रेंड, चापून चोपून बसतात या साड्या

वेडिंग ड्रेसेससह तुम्ही वापरा असे जॅकेट्स, दिसा अधिक स्टायलिश

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT