दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासनच्या विक्रम या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून आता हिंदीतही ‘विक्रम’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. सध्या दक्षिणेतील चित्रपटांना हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे बहुतांश चित्रपट इतर भाषांबरोबर हिंदीत देखील प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांना लक्षात घेऊन निर्मात्यांनी ‘विक्रम’ चित्रपटाचा ट्रेलरही हिंदीत रिलीज केला आहे. ज्यामध्ये अॅक्शनसोबतच जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी दिसून येत आहे.
कमल हसन चार वर्षांनी करणार पुनरागमन
कमल हसन तब्बल चार वर्षांनंतर ‘विक्रम’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. त्याचा हा चित्रपट ऍक्शन थ्रिलर असेल. त्याची प्रेक्षणीय झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसून आली आहे. ट्रेलरमध्ये कमल हसनची एन्ट्री होताच त्याचे डायलॉग्स आणि ऍक्शन सीन्स प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. कमल हसनने पुन्हा आपल्या दमदार कृतीतून पडदा कॅप्चर करत यश मिळवले आहे. या ट्रेलरमध्ये स्पेशल इफेक्ट्स आणि उत्कृष्ट एडिटिंग दिसून येत आहेत.
हे मातब्बर कलाकार विक्रममध्ये दिसणार आहेत
‘विक्रम’ चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, कमल हसन, विजय सेतुपती यांच्याव्यतिरिक्त विक्रममध्ये फहद फासिल देखील दिसणार आहे. कमल हासन, विजय सेतुपती आणि फहद फासिल पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. याशिवाय प्रसिद्ध अभिनेता सुर्या देखील या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार असल्याची बातमी आहे.विक्रममध्ये कालिदास जयराम, नारायण, अर्जुन दास आणि शिवानी नारायणन यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.अनिरुद्ध रविचंदर संगीतकार आहेत, तर गिरीश गंगाधरन सिनेमॅटोग्राफर आहेत आणि फिलोमिन राज संपादक आहेत.
कमल हासनचा हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट लोकेश कनागराज यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून राज कमल यांच्या ‘राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल’ या बॅनरखाली त्याची निर्मिती केली जात आहे.मुख्य भूमिका करण्यासोबतच, कमल हासन राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल बॅनरखाली आर महेंद्रन यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती देखील करत आहेत. दरम्यान, विक्रम निर्मात्यांनी चेन्नईमध्ये एका भव्य ऑडिओ लॉन्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये कॉलीवूड चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गज उपस्थित होते. चित्रपटाच्या टीमने मोठ्या प्रमाणावर चित्रपटाच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. हा चित्रपट 3 जून 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
कमल हसनने लिहिले चित्रपटासाठी एक गीत
कमल हसनने विक्रम चित्रपटासाठी एक गाणे लिहिले आहे व ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड देखील केले आहे. त्याने या चित्रपटासाठी पाठला पाठला या शीर्षकगीत लिहिले व ते गायले देखील आहे.चेन्नईतील संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या स्टुडिओमध्ये त्याने ९ मे रोजी हे गाणे रेकॉर्ड केले. उलगनायगनच्या स्टुडिओतील ही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली होती.
कमल हसन यांनी सोशल मीडियावर अनिरुद्धचे कौतुक केले आणि लिहिले, “तुम्ही कोणत्या महान वंशाचे आहात याबद्दल मी विचार करत होतो. तुमच्या आजोबांपासून तुमच्यापर्यंत, एकाच कुटुंबात किती विपुल प्रतिभा आणि कर्तृत्व आहे. तुम्ही खरोखरच तुमच्या कुटुंबाच्या उत्कृष्टतेच्या मानकांनुसार जगत आहात. माझ्या तरुण मित्रा, मोर पावर टू यू!”
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक