ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
vikram movie 2022

प्रदर्शित होण्याआधीच ‘विक्रम’ ने केली इतक्या कोटींची कमाई

कमल हसन सध्या त्याच्या ‘विक्रम’ चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहे. साऊथ सुपरस्टारचा हा आगामी चित्रपट याच आठवड्यात 3 जून रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाद्वारे कमल हसन तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. म्हणूनच प्रेक्षकांमध्ये ‘विक्रम’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात कमल हसन थरारक ऍक्शन करताना दिसणार आहे, या ऍक्शनची झलक चाहत्यांना ट्रेलरमध्येच दिसली होती. म्हणूनच या चित्रपटाचे कलेक्शन उत्तम असेल असा दावा केला जात आहे. याची सुरुवात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच झाली आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच चांगला व्यवसाय केला आहे.

रिलीजपूर्वीच केली 200 कोटींची कमाई 

ट्रेड पंडितांच्या मते, कमल हसनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने रिलीजपूर्वीच 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. ट्रेड ऍनालिस्ट रमेश बाला यांनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, ‘विक्रम’ हा कमल हसनचा रिलीजपूर्वी सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने सॅटेलाइट अधिकारांसह ओटीटी अधिकारांमधून 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

VIKRAM 2022
VIKRAM 2022

3 जूनला होणार चित्रपटगृहात दाखल 

कमल हासनचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. पण या दिवशी इतर दोन मोठे चित्रपटही थिएटरमध्ये दाखल होत आहेत, पहिला म्हणजे अक्षय कुमारचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’, ज्यामध्ये मानुषी छिल्लर हिंदी चित्रपटांत पदार्पण करणार आहे आणि दुसरा चित्रपट म्हणजे आदिवी शेष यांचा ‘मेजर’. हा चित्रपट 26/11 च्या हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे आयुष्य दाखवण्यात येणार आहे. चाहत्यांमध्येही ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘मेजर’ची जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे यावेळी 3 जून रोजी थिएटरमध्ये तीन चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा होणार आहे. 

लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘विक्रम’ या चित्रपटात कमल हसन, विजय सेतुपती, शिवानी नारायण यांच्याशिवाय फहद फासिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता सूर्याही कॅमिओमध्ये दिसणार आहे. कमल हसन 4 वर्षांनंतर चित्रपटात दिसणार असल्याने चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

ADVERTISEMENT

चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु 

VIKRAM 2022
VIKRAM 2022

चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ‘विक्रम’च्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू आहे. पहिल्या दिवसाचे बुकिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असून, तिकिटे वेगाने विकली जात आहेत. ‘विक्रम’ला अनेक ठिकाणी खास शोसाठी परवानगी मिळाली आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडणार आहे असा अंदाज लावला जात आहे. सध्या कमल हसन ‘विक्रम’च्या प्रमोशनमध्ये खूप गुंतले आहेत आणि 67 वर्षीय अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चोवीस तास काम करून चाहत्यांना प्रभावित केले आहे.

संगीतकार अनिरुद्ध रविकंदर यांनी ‘विक्रम’साठी संगीत दिले असून, त्यांनी या चित्रपटातील दमदार गाण्यांनी चाहत्यांना अचंबित केले आहे. चाहत्यांना या डायनॅमिक संगीतकाराकडून सुंदर पार्श्वसंगीताची अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली आहे. ‘विक्रम’ या आठवड्यात अनेक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओपनिंग करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. 

विक्रमच्या रिलीजच्या अगोदर, वीकेंडला कमल हसनने रजनीकांत यांची भेट घेतली. दिग्दर्शक लोकेश यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला. लोकेशने या फोटोबद्दल दोघांचे आभार मानले आणि त्यांची मैत्री प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शुक्रवारी रिलीज होणाऱ्या विक्रमचे गेल्या नोव्हेंबरमध्येच शूटिंग पूर्ण होणार होते. पण कमल हसनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शूटिंग पुढे ढकलावे लागले होते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
31 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT