कपिल शर्माने आपल्या कॉमेडीने घराघरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही जणांना कपिलचा शो आवडतो तर काही जण या शो ला वाह्यात म्हणतात. पण या शो मुळे अनेक जणांच्या चेहऱ्यावर हसू येते हे नक्कीच विसरता येणार नाही. दर शनिवारी आणि रविवारी न चुकता आणि त्याचे रिपीट टेलिकास्ट पाहणारे प्रेक्षकही आहे. कपिल आणि गिन्नी पुन्हा एकदा नव्या पाहुण्याच्या तयारीसाठी सज्ज झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. कपिलने स्वतः या गुड न्यूजबद्दल सांगितले नसले तरीही काही दिवसांपूर्वी भारतीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये गिन्नी पुन्हा एकदा गरोदर असल्याचे दिसून आले असून जानेवारीमध्ये कपिलच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
Bigg Boss 14 : कॅप्टन्सी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता
गिन्नीची सध्या तिसरी ट्रिमस्टर सुरू
कपिल आणि गिन्नीने डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले आणि लगेच एका वर्षात गिन्नीने अनायराला जन्म दिला. अनायरा पुढच्याच महिन्यात एक वर्षांची होणार आहे. कपिल नेहमीच अनायरासह व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अनायरा अतिशय क्यूट असून तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलच्या बायकोची तिसरी ट्रिमस्टर सध्या चालू असून कपिलची आईदेखील अमृतसरवरून मुंबईला आली आहे. काही दिवसांपूर्वी कपिल अमृतसरला गेला होता आणि त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. गुरुद्वारा आणि सिद्धूच्या घरी जाऊन कपिलने भेटही दिली होती. त्यानंतर कपिला या खास कारणासाठी आईला मुंबईत घेऊन आला आहे असंही म्हटलं जात आहे. तर गिन्नीच्या घरचेही तिची काळजी घेण्यासाठी आले आहेत असंही म्हटलं जात आहे. जानेवारी 2021 मध्ये गिन्नी बाळाला जन्म देईल असंही सांगण्यात येत आहे. गिन्नी अथवा कपिलने हे स्पष्ट केलं नसलं तरीही कॉमेडियन भारती सिंहने पोस्ट केलेल्या करवा चौथच्या एका व्हिडिओमध्ये गिन्नी पुन्हा एकदा गरोदर असल्याचे दिसून आले आहे. तसंच दिवाळीला कपिलने शेअर केलेल्या फोटोतही गिन्नीच्या चेहऱ्यावरील तेज दिसत असून ती पोट लपवत असल्याचे दिसून येत आहे.
Bigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो
कपिलची कॉमेडी एक्स्प्रेस तुफान सुरू
कपिल शर्मा सध्या द कपिल शर्मा शो मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत असून त्याची कॉमेडी एक्स्प्रेस जोरदार सुरू असते. कपिलचे अनेक चाहते आहेत आणि गेले 8 वर्ष कपिल प्रेक्षकांना हसविण्याचे काम करत आहे. त्याच्या करिअरमध्येही अनेक चढउतार आले. मात्र गिन्नीशी लग्न झाल्यापासून कपिल स्वतःकडे जास्त लक्ष देत असून कपिलने लॉकडाऊनमध्ये 12 किलो वजन कमी केले आहे. कपिल आता स्वतःच्या आरोग्याकडेही गिन्नीमुळे व्यवस्थित लक्ष देत असून अनेक सेलिब्रिटींनी त्याला लग्न मानवल्याचेही सांगितले आहे. आता या न्यूजमुळे अजून एका गरोदर सेलिब्रिटीची भर पडल्याचे दिसून येत आहे. तर कपिलचे चाहतेही आता कपिलकडे नवा पाहुणा नक्की कोण येणार याबाबत उत्सुक आहेत. दरम्यान कपिल या गुड न्यूजची कधी घोषणा करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनायरला येणाऱ्या भावंडाबद्दल ऐकायला सगळेच उत्सुक आहेत हे नक्की.
हेल्मेटशिवाय बाईक चालवणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं भारी, भरावा लागला दंड
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक