ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कविता लाड मेढेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, म्हणणार ‘लव्ह यु जिंदगी’

कविता लाड मेढेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, म्हणणार ‘लव्ह यु जिंदगी’

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कविता लाड हे नाव नक्कीच कोणाला नवं नाही. मोठा पडदा असो वा लहान पडदा कविता लाड मेढेकर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. कविता लाड मेढेकर हे रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री. कविता लाड मेढेकर म्हणाल्यावर त्यांचं प्रत्येकजण कौतुकच करतो इतकं प्रेम  आजवरील आपल्या कामांतून, व्यक्तिमत्वातून त्यांनी मिळवलंय. काही काळ सिनेमापासून, नाटकांपासून कविताने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कार्यरत झाल्या असून एकीकडे मालिका राधा प्रेमरंगी रंगलीमध्ये काम करत असून, दुसरीकडे रंगभूमीवर काम करत असताना त्यांचा “लव्ह यु जिंदगी” हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहेरेदेखील या चित्रपटात कविताबरोबर प्रमुख भूमिकेमध्ये आहेत.

kavita FI
कविता चित्रपटाबद्दल उत्सुक

या चित्रपटाबद्दल कविता लाड मेढेकरने फारच उत्साहात सांगितलं. दिग्दर्शक मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा त्यांना ऐकवल्यावर त्यांना कथा फार आवडली आणि कविताने चित्रपट करण्यास होकार दिला. याशिवाय सचिन पिळगावकरांसोबत त्यांना काम करण्याची फार इच्छा होती ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण या  चित्रपटात काम करण्यामागे आहे असंही तिने सांगितलं. ‘लव्ह यु जिंदगी’ चित्रपटात त्यांचं नलू नावाचं पात्र आहे. चित्रपटात त्या सचिन पिळगावकर यांच्या बायकोची भूमिका करत आहेत. हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजक असून यांत नलू या त्यांच्या पात्राचे दोन्ही भावनिक पैलू दर्शवले आहेत. नवऱ्यावर कायम विश्वास ठेवणारी, त्याला पाठिंबा देणारी, नवऱ्याला हवं ते करायला मुभा देणारी, नवऱ्याच्या तरुण राहण्याच्या प्रयत्नांचं कौतुक आणि कुतूहल वाटणारी साधी पण कणखर नलू त्यांनी चित्रपटात साकारली आहे. चित्रपटातील नलू आणि वैयक्तित आयुष्यातील कविता यांच्यामध्ये साम्य असल्याचंही कविताने मान्य केलं आहे. याव्यतिरिक्त नवऱ्यावर विश्वास टाकणारी नलू आणि विश्वासाचा भंग झाल्यावरची नलू दोन्ही साकारताना त्यांना मजा आली असं कविता म्हणाल्यात.

sachin and kavita

ADVERTISEMENT

मुलांची लग्न झाल्यावर होतो पालकांच्या मानसिकतेत बदल

मुलीचा किंवा मुलाचा विवाह होतो तेव्हा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मानसिक स्तरावर बदल होत असतो. एक वेगळीच परिपक्वता आणि हुरहूर जाणवू लागते. पण एका वडिलांच्या मुलीचं लग्न ठरतं किंवा होतं तेव्हा त्यांच्यातही एक मानसिक स्तरावर सूक्ष्म बदल होत असतो हेदेखील प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे अशावेळेला आयुष्यात मागे बघत वजाबाकी केली जाते.  काहीतरी सुटलंय मागे, ही जाणीव मनाला होते. काहीजण, कशाला बहुतेकजण, “आयुष्य असंच असतं, चालायचंच म्हणून ते स्वीकारतात. मुलामुलींच्या आयुष्याला आपलं आयुष्य समजून“बॅक फूट” वर येऊन जगू लागतात. आजूबाजूचे लोक, कुटुंबीय, मित्र वय झाल्याची सतत जाणीव करून देत असतात. यानंतर ठराविक आयुष्य जगण्याचे सल्ले देतात. पण क्वचित कोणीतरी मागे राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करायचा विचार करतो. आयुष्य पुन्हा एकदा नव्या पद्धतीने “फ्रंट फूट” येऊन जगायचा निर्णय घेतात आणि तसं जगण्याचा प्रयत्नही करतो. “लव्ह यु जिंदगी” या चित्रपटातून हाच संदेश देण्याचा एक सकारात्मक प्रयत्न करण्यात आला आहे.

निखळ मनोरंजनाचा चित्रपट

हा चित्रपट का बघावा हे विचारल्यावर कविताने सांगितलं की, निखळ कौटुंबिक मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. आजच्या धकाधकीच्या काळात निखळ मनोरंजन कमी होत चाललंय, ज्याची व्यक्तीला फार गरज आहे, ती गरज पूर्ण करणारा हा चित्रपट नक्कीच आहे. चित्रपटात काम करताना रंगभूमीच्या कामाचादेखील खूप फायदा होतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं म्हणतात. चित्रपटातदेखील त्यांचा वावर, त्यांनी साकारलेलं नलूचं पात्र बघताना कविता लाड मेढेकर यांचं अभिनयावरील संपूर्ण नियंत्रण आणि रंगभूमीवर वावरण्याचा त्यांचा अभ्यास स्पष्टपणे जाणवतो. कविता लाड मेढेकर सध्या मालिका, नाटक आणि चित्रपट तिन्हीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाही ही एक पर्वणीच आहे. 11 जानेवारीला ‘लव्ह यु जिंदगी’ प्रदर्शित होत आहे.

ADVERTISEMENT

 

09 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT