ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Kojagiri Purnima Wishes In Marath

50+ Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi | 2021 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो. भारतीय परंपरेत कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे ते पाहते असा समज आहे. जागणे या शब्दाचा अर्थ फक्त जागरण करणे असा नसून सावध आणि दक्ष असणे असा आहे. आयुष्याबाबत सजग आणि जागृत असलेल्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होते अशी मान्यता आहे. यासाठीच कोजागिरीला जागरण करत माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय चंद्रप्रकाशाचे प्रतिक म्हणून दूधाचे प्राशन केले जाते. चंद्रप्रकाशातील दूध कोजागिरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे. यावर्षी अशी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी सर्वांना द्या कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा (Kojagiri Purnima Wishes In Marathi), कोजागिरी पौर्णिमा कोट्स (Kojagiri Purnima Quotes In Marathi), (कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा) Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha, कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठीतून (Kojagiri Purnima Status Marathi), कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज (Kojagiri Purnima Marathi Sms), कोजागिरी पौर्णिमा मराठी कविता (Kojagiri Purnima Marathi Kavita) नक्की शेअर करा.

Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

Kojagiri Purnima Wishes In Marathi

कोजागिरीची रम्य मनमोहक रात्र सर्वांसोबत जागवण्यासाठी सर्वांना द्या या कोजगिरीच्या शुभेच्छा (Kojagiri Purnima Marathi Wishes)

  1. शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी  सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. दूध हे केशरी, कोजागिरीचे खास, वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात, परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात  असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. प्रत्येकाचा जोडीदार, त्याचा चांदोबा असतो,परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात, एकमेकांचे होऊन जाऊ…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

6. कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव, उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव, शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो… हिच आमची मनोकामना…कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा

10. आज कोजागिरी पौर्णिमा हा सण तुम्हाला सुखसमाधान कारक आणि आनंदाची उधळण करावा असावा हिच परमेश्वर चरणी सहिच्छा..कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Quotes In Marathi | कोजागिरी पौर्णिमा कोट्स

Kojagiri Purnima Wishes In Marathi

कोजागिरीची रात्र म्हणजे प्रत्येकाच्या मनात आनंद आणि उत्साह निर्माण करणारी एक रम्य निशा… या सुंदर वातावरणाला चार चॉंद लावण्यासाठी खास कोजागिरी पौर्णिमा कोट्स (Kojagiri Purnima Quotes In Marathi) 

ADVERTISEMENT
  1. दूध केशरी, चंद्र – चांदणे,  कोजागिरीचे रूप आगळे…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो हिच आजच्या दिवशी प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू य सण कोजागिरीचा…कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4. कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा, उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

6. कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला, दीर्घायुष्य देणारी, सुखशांतीसमाधान आणि समृद्धीची भरभराट करणारी ठरो हिच प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. कोजागिरीची रात्री लखलखते, दुधात देखण्या चंद्राचे रूप दिसते….अशा या शरद पौर्णिमेला तुमची आमची साथ लाभते….कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

8. कोजागिरी चे जागरण हे जीवनातील सकारात्मकेचे, सौम्यतेचे, सौदर्यानुभवाचे, सजगेचे कारण आणि हिच या उत्सवाची सार्थकता…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. कोजागिरीच्या चांदण्या रात्री, पूर्ण चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात, केशरबदाम मिश्रित आटीव दुधाचा आस्वाद घेणे… म्हणजे खरे सुख…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

10. मंद प्रकाश पौर्णिमेच्या रात्रीचा, जागूनी रात्र आज, घेऊ या आर्शीवाद माता महालक्ष्मीचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha | कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha

शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरीच्या रात्र सर्व चांगल्या  कामांसाठी शुभ मानली जाते. यासाठी आपल्या जवळच्या लोकांना द्या या खास कोजागिरीच्या शुभेच्छा (Kojagiri Purnima Chya Hardik Shubhechha).

  1. चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. साखरेचा  गोडवा केशरी दुधात, विरघळला तुझ्या माझ्या नात्यात, रेंगाळत राहो अंतर्मनात, स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची वरात, चंद्राची शितलता मनात, मंद प्रकाश अंगणात, आनंद तराळला मनामनात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

4. कोजागिरीच्या  साक्षीने,चंद्रही उजळून निघाला आकाशातकोरोनाचे संकट मिटून,आपणही बहरू शीतल प्रकाशात… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

6. मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

7. चंद्राचा नूर आज दिसेल खूप खास, कारण… कोजागिरीची रात्र आहे आज…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

8. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

9. कोजागिरीचा चंद्र अन तुझं रूप, जणू एकच भासतं… आणि केशरी दुधामध्ये मला तुझंच प्रतिबिंब दिसतं…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

10. मंद गतीने पाऊलं उचलत, चांदण्याचा प्रवास सुरू झाला, दडला होता ढगात हा चंद्र, पदरात जसा मुख चंद्रर लपलेला…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Navratri Marathi Status| नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Kojagiri Purnima Status Marathi | कोजागिरी पौर्णिमा स्टेटस मराठीतून

Kojagiri Purnima Marathi Wishes

आजच्या खास दिवशी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी हे कोजागिरी पौर्णिमा स्टेटस (Kojagiri Purnima Status Marathi) तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत. 

  1. चांदण्यात न्हावून निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

2. चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी रासलीला, मुग्ध धरती सारी रंगली पाहून त्यांना…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

3. चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो, पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

5. कितीही रात्री जागल्या तरी, पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

6. तुझे आणि माझे जुने प्रेम झाले, किती दाट त्या घट्ट सायीपरी, तरि केशराचा नवा गंध देतो, नवे रूप कोजागिरीच्या परी….कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

7. तोच नेहमीचा चंद्रमा नभी, अन चांदणी माझ्या दारी उभी, कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी, जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. शारदाची रात जागवता, शुभ्र चांदण्यात चंद्रही रमला, मोहक सुगंध सुवास पसरला, चांदण्यांच्या विळख्यात विरला

9. कोजागिरीचा चंद्र गालात हसत होता, गुणगुणत वाऱ्यासवे झुल्यावरी झुलत होता

10. आकाशगंगा तेजोमय झाली, नभात चंद्रफुलांची उधळण झाली, कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतूर झाली…

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत (Diwali Wishes In Marathi)

ADVERTISEMENT

Kojagiri Purnima Marathi Sms | कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज

Kojagiri Purnima Marathi Wishes

कोजागिरीसाठी एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी शेअर करत आहोत खास कोजागिरी पौर्णिमा मराठी मेसेज (Kojagiri Purnima Marathi Sms).

  1. कोजागिरीचा चंद्र जसा चांदण्यासमवेत रमतो, त्याला पाहतात मला तुझा भास होतो… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा 

2. लिहून झाली कविता तरी, वाटते त्याला अधुरी आहे, कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय आज रात्र अपूरी आहे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

3. कोजागिरीचा चंद्र तोच पण वाटे नवा नवा, कितीही क्षण एकत्र घालवले तरी वाटे मज तुझा सहवास हवा हवा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

4. कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात, चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

5. कोजागिरीला दिसतो जो चंद्रमा नभात, रोज मी पाहत असतो त्याला तुझ्या रूपात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

6. मावळतीची घाई झाली सूर्यास, कारण आज चमकण्यास आला आहे कोजागिरीचा चंद्र नभात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

7. थकलेला दिनकर मग हळू हळू निद्राधीन होतो, आभाळाच्या पटलावरतील कोजागिरीचा चंद्र उगवतो…कोजागिरीच्या शुभेच्छा

Kojagiri Purnima Marathi Kavita | कोजागिरी पौर्णिमा मराठी कविता

Kojagiri Purnima Wishes In Marathi

कोजागिरीचे वातावरण अतिशय सुंदर आणि रोमॅंटिक असते. अशा वातावरणात एखाद्याला कविता नाही सुचली तर नवल… यासाठीच वाचा या कोजागिरी पौर्णिमा मराठी कविता (Kojagiri Purnima Marathi Kavita)

ADVERTISEMENT
  1. विझवून आज रात्री
    कृत्रिम दीप सारे
    गगनात हासणारा तो 
    चंद्रमा पाहा रे
    असतो नभात रोज
    तो एकटाच रात्री
    पण आजच्या निशेला
    ताच्या सवे राहा रे
    चषकातुन दुधाच्या 
    प्रतिबिंब गोड त्याचे
    पाहून साजरी ही
    कोजागिरी करा रे
    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

2. कोजागिरीच्या रात्री
क्षीर किरणांच्या सरी
आल्या नाचत भूवरी
आज असे कोजागिरी
रथ चंद्राचा आगळा
नभी चमके दीपमाळा
गीत रोहिणीचे गळा
साजे लावण्य मखरी
खुले शरदाचा संसार
कळ्या फुलांचा शृंगार
रजकाचा वाहे पूर
श्वेत वस्त्र अवनीधरी
नभी सूर्य चंद्र जोडी
गाडी ब्रमांडाची ओढी
दुग्ध अमृताची गोडी
गोपी निघाल्या बाजारी

3. शरदाचं टिपूर चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दुधाचा गोडवा, नात्यामध्ये येऊ दे
आनंदाची उधळण. आपल्या नात्यात होऊ दे

4. नाजूक गोऱ्या दंडात माझ्या
राया चंद्रकोर ही गोंदवा
रात झोंबते अंगाशी बघा
अन देहास जाळी हा चांदवा
शृंगार हा केला तुमच्यासाठी
नका घालवू वेळ वाया
सरत चालली रात इश्काची
कसं कळेना तुम्हा राया
का अशी करा सैल मिठी
जागवू या ना रात सारी
केशरी हे दूध घ्या
करू साजरी कोजागिरी
कवि – पांडुरंग जाधव

5. चंद्र हा  हसला
रात्रीच्या वेळेला
देईल प्रकाश 
साऱ्या दुनियेला
रातराणीचा सुगंध भारी
त्याच्या सोबतीला
हा दिवस त्याचा न्यारी
शोभून दिसे तो दुधात भारी
सण हा आनंदाचा
कोजागिरी पौर्णिमेचा
कवियित्री – कविता गवारी

ADVERTISEMENT

6. बहरून आली रात
मंडळी जमली अंगणात
जशा जमल्या चांदण्या
सभोवती चंद्राच्या नभात

7. पांढऱ्या शुभ्र दुधात
दिसे पौर्णिमेचे चांदणे
वाढो स्नेह मनातला
जसा वाढला कोजागिरीचा चंद्र

8. कोजागिरीचा शशी उगवला नभात
तेजाने उजळले सारे नभांगण
तेजोमय झाल्या दाही दिशा
शरदाच्या चांदण्यात न्हावून निघाल्या जशा
हवेतला हा सुखद गारवा
नेहमीच वाटे मज हवा हवा

9. अशा या मंद धुंद रात्रीच्या प्रहरी
आपली प्रीत नकळत बहरली
कोजागिरीची रात अशी ही फुलली
नकळत सुख स्वप्नांना कवेत घेऊन आली
कवियित्री – प्राची साठे

ADVERTISEMENT

10. चांदणे आतूुरतेने पसरले क्षितीजावरी
सखर आणि मेवा घेऊन केसर पडले दुधावरी
तो निरागस चंद्रमा केव्हा येईल हो अंबरी
जागते आहे कविता मामझी करण्या साजरी कोजागिरी

वाचा – जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

19 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT