ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
laal singh chaddha

लालसिंह चड्ढाचा ट्रेलर लाँच, क्रिकेटच्या मैदानावरही चालली आमिर खानची जादू

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर रविवारी लाँच करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये लाल सिंह चड्ढा या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. या ट्रेलरमध्ये आमिरसोबत करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग सारखे प्रसिद्ध स्टार्सही दिसत आहेत.

फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक 

आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तुम्ही काल हा ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला याची कथा कुठेतरी बघितल्यासारखी वाटेल. तुम्ही जर इंग्रजी सिनेमाचे फॅन असाल तर तुम्ही टॉम हँक्सचा द फॉरेस्ट गंप हा चित्रपट नक्कीच बघितला असेल किंवा ती कादंबरी वाचली असेल तर तुम्हाला ‘लाल सिंग चड्ढा’ ची कथा ओळखीची वाटेल. कारण हा चित्रपट ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपट ‘द फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. टॉम हँक्स स्टारर हा चित्रपट हॉलिवूडमध्ये 1994 साली प्रदर्शित झाला होता. आमिर खानची माजी पत्नी किरण राव या हिंदी रिमेकची सहनिर्माती आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंग भारतात शंभरहून अधिक ठिकाणी झाले आहे.

‘लाल सिंह चड्ढा’च्या ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आले आहे 

आमिर खान आणि करीना कपूर स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मोना सिंग आमिर खानच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे. यात आमिरच्या पात्राचा बालपण ते तारुण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये आमिर कधी सरदारच्या लूकमध्ये तर कधी सैनिकाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान प्रत्येक लूकमध्ये दमदार दिसतोय. लाल सिंह चड्ढाच्या ट्रेलरमध्ये युद्धाच्या सीक्वेन्सची झलकही पाहायला मिळाली आहे.याआधी आमिर खान आणि करीना कपूर ‘3 इडियट्स’ या चित्रपटात एकत्र दिसले होते, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.  ‘3 इडियट्स या चित्रपटात मोना सिंगची देखील महत्वपूर्ण भूमिका होती. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आमिर खान लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा असलेल्या मुलाच्या व्यक्तिरेखेत दिसतोय, परंतु त्याची आई त्याला नेहमीच प्रोत्साहन देताना आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसली. त्याचवेळी रूपाच्या भूमिकेत करीना कपूर एका वेगळ्याच रूपात दिसली.

ट्रेलर लाँच झाले अनोख्या पद्धतीने

लाल सिंग चड्ढा या चित्रपटाची कथा जितकी खास आहे  तितक्याच अनोख्या पद्धतीने या चित्रपटाचा ट्रेलर लाँच देखील करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 29 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2022 च्या अंतिम सामन्यादरम्यान लाँच करण्यात आला. यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यादरम्यान आमिर खानने हिंदी कॉमेंट्रीही केली. एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर जागतिक टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर आणि क्रीडा विश्वात लाँच होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे या चित्रपटात आणीबाणी, १९८३ क्रिकेट विश्वचषक, ऑपरेशन ब्लू स्टार, रथयात्रा आणि १९९९ कारगिल युद्ध इत्यादी भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात येणार आहेत. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

30 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT