ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Laal Singh Chaddha

आयपीएल फायनल मॅचमध्ये लाँच होणार लाल सिंह चढ्ढाचे ट्रेलर

आमिर खान हा सर्वात यशस्वी भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याची कारकीर्द तीन दशकांहून अधिक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंह चड्ढा हा त्याचा पुढचा चित्रपट या वर्षी रिलीज होत आहे आणि चित्रपटातील ‘कहानी’ आणि ‘मैं की करा’ ही दोन गाणी YouTube वर यापूर्वीच रिलीज झाली आहेत. चित्रपटाच्या प्रचार मोहिमेची सुरुवात करणारे पहिले गाणे ‘कहानी’ रेडिओ पॉडकास्टवर लाँच करण्यात आले. आता, या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच लाँच करण्यात येणार आहे. आमिर खानने सोशल मीडियावर आमिर खान प्रॉडक्शनद्वारे शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे याची पुष्टी केली आहे. 

आयपीएलच्या फायनलच्या दिवशी रिलीज होणार ट्रेलर 

सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये, आमिर खानने त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलरशी संबंधित विशिष्ट तपशील सांगितले. त्याने माहिती दिली की लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर 29 मे रोजी 2022 च्या आयपीएल फायनलच्या दिवशी रिलीज होईल. तो म्हणाला की आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या मोक्याच्या वेळी ट्रेलरचे अनावरण केले जाईल याचा अर्थ असा की ट्रेलर अंतिम सामन्याच्या दिवशी रात्री 8:45 च्या सुमारास लाँच करण्यात येईल.

Laal Singh Chaddha
Laal Singh Chaddha

11 ऑगस्टला प्रदर्शित होणार चित्रपट 

रक्षाबंधनाच्या खास दिवशी म्हणजेच येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हा चित्रपट सुरुवातीला ख्रिसमस 2020 ला रिलीज होणार होता परंतु कोविड -19 मुळे, ही तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात करीना कपूर खान आणि नागा चैतन्य यांच्याही मुख्य भूमिका आहेत. करीना कपूर खानने YouTube पॉडकास्टमध्ये खुलासा केला की तिच्या मते, लाल सिंह चड्ढा हा आमिर खानचा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असणार आहे. आमिर खानने देखील अलीकडेच रेडिओ पॉडकास्टमध्ये खुलासा केला की त्याच्या आईला लाल सिंह चड्ढा खूप आवडला. हा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होईल त्याच दिवशी आनंद एल राय यांचा रक्षाबंधन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Laal Singh Chaddha
Laal Singh Chaddha

चाहते ट्रेलरची आतुरतेने वाट बघत आहेत 

आमिर खानचा कॉमेडी-ड्रामा लाल सिंग चड्ढा हा वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे आणि चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या परफेक्शनिस्ट स्वभावासाठी ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाही. लाल सिंह चड्ढाचेही प्रमोशन सध्या जोरदार सुरु आहे. यावेळी आमिर खानने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणखी एका अनोख्या कल्पनेचा विचार केला आहे. तो लाल सिंग चढ्ढा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी त्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या अंतिम फेरीचा दिवस 29 मे 2022 निवडला आहे. प्रेक्षकांमध्ये असलेला आयपीएलच्या उत्साहाचा फायदा घेत, आमिर खान स्टारर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आयपीएलच्या फायनलच्या दिवशी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे चित्रपट आणि क्रिकेटच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. मार्केटिंग आणि जाहिरातींच्या जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षक अशा थेट क्रिकेट समारंभात प्रमोशनल लॉन्च पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ADVERTISEMENT

हा ट्रेलर 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्याच्या दुसर्‍या मोक्याच्या वेळेत स्टार स्पोर्ट्सवर टेलिव्हिजनवर थेट प्रवाहित केला जाईल. यामुळे जाहिरात आणि विपणन जगात क्रांती आणि नवीन बेंचमार्क निर्माण होणार आहे. कारण असे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा चित्रपट 1994 चा प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट फॉरेस्ट गंपपासून प्रेरित आहे जो विन्स्टन ग्रूमच्या 1986 मधील फॉरेस्ट गंप नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

26 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT