ADVERTISEMENT
home / xSEO
Janget Khaj Yene Upay In Marathi

जांघेत खाज सुटणे उपाय | Janget Khaj Yene Upay In Marathi

पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरात जास्त घाम येणे आणि खाज येणे सामान्य आहे. खास करून आपल्या स्किन फोल्ड्समध्ये किंवा जिथे त्वचेचे घर्षण होते तिथे घाम व खाज येणे सामान्य आहे. जर तुमच्या जांघेत खाज सुटत असेल तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, जर तुमचे वजन जास्त असेल किंवा स्कर्ट, साडी इत्यादी घालायला आवडत असेल, तर जॉक इच म्हणजेच जांघेत खाज सुटणे तुम्हाला आणखी त्रास देऊ शकते. हे फंगल इन्फेक्शनमुळे होऊ शकते. पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु वेळेवर उपचार न केल्यामुळे ही समस्या वाढते. मानवी शरीरात व आपल्या त्वचेवरही लाखो सूक्ष्मजीव आहेत. त्यांच्या संख्येत असंतुलन झाले तर त्यामुळे त्वचेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बुरशीजन्य संसर्गाचे म्हणजेच फंगल इन्फेक्शनचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक जॉक इच आहे, जो गुप्तांगांवर, मांडीच्या आतील भागात होतो. या ठिकाणी खाज सुटल्याने अस्वस्थता वाढते.

सहसा या प्रकारचा संसर्ग स्वच्छतेची काळजी न घेतल्याने होतो. म्हणूनच अंघोळ करताना किंवा कपडे घालताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला या समस्येकडे लोक दुर्लक्ष करतात. परंतु यावर उपचार न केल्यास इन्फेक्शन पसरू लागते व त्रास वाढू लागतो  याची अनेक लक्षणे आहेत, ज्याची माहिती घेतल्यावर तुम्ही सहज उपचार करू शकता. तसेच संसर्ग कमी प्रमाणात असेल तुम्ही सुरुवातीला जांघेत खाज सुटणे उपाय (Janget Khaj Yene Upay In Marathi)  करून बरे करू शकता. सूक्ष्मजीवांचा एक बुरशीजन्य गट आपल्या त्वचेवर राहतो, ज्याला डर्माटोफाइट्स देखील म्हणतात. हे सूक्ष्मजीव उष्ण किंवा दमट भागात वाढतात.जॉक इच हा एक प्रकारचा संसर्ग आहे जो बुरशीच्या या गटामुळे होतो. हे सहसा मांडी, नाभी, कंबर, अंतर्गत भाग किंवा इतर ठिकाणी होते. असे मानले जाते की पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा त्रास कमी होतो, परंतु महिलांनी स्वच्छतेची काळजी न घेतल्यास त्यांनाही हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. 

जांघेत खाज येणे लक्षणे – Jock Itch Symptoms In Marathi

जांघेत खाज सुटणे उपाय (Janget Khaj Yene Upay In Marathi)
जांघेत खाज सुटणे उपाय

जॉक इच हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो तुमच्या गुप्तांग, मांड्या आणि नितंबांवर होतो. शरीराचे हे भाग झाकलेले राहतात त्यामुळे त्याठिकाणी खूप घाम येतो. बुरशीमुळे खाज सुटते, लाल पुरळ उठतात ज्याचा आकार अनेकदा गोल असतो.या संसर्गाला जॉक इच असे म्हटले जाते कारण ते खेळाडूंसारख्या सहसा खूप घाम येणाऱ्या लोकांमध्ये आढळते. हा संसर्ग वजन जास्त असणाऱ्या लोकांना देखील होऊ शकतो. जांघेत खाज सुटल्याने आपल्याला अस्वस्थ वाटते. परंतु ही फार गंभीर समस्या नाही. तुमचे जननेंद्रियाचे क्षेत्र स्वच्छ ठेवा आणि तेथे घाम साठू देऊ नका. बुरशीविरोधी औषधांचा वापर करून जॉक इच बरे होते.

वाचा –  गजकर्ण कारणे, लक्षणं आणि घरगुती उपाय.

ADVERTISEMENT

जॉक इचची सुरुवात अनेकदा त्वचेच्या लालसरपणापासूनहोते. हा संसर्ग जननेंद्रियापासून मांडीच्या वरच्या भागापर्यंत अर्धचंद्राच्या आकारात पसरतो. पुरळाच्या बाहेरील बाजूस लहान, सुजलेले पुरळ विकसित होते. या ठिकाणी अनेकदा खाज सुटते आणि दाह होतो. कधी कधी घर्षणामुळे त्वचा खूप कोरडी होते ज्यामुळे तिचा वरचा थर सोलला जातो. जर तुमच्या त्वचेवर आलेले  पुरळ घरगुती उपाय करूनही दोन आठवडे बरे होत नसेल किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यानंतरही काही दिवसांनी ती परत येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना सल्ला घेणे आवश्यक आहे. खाज सुटण्याबरोबर दाह होणे, त्वचेवर पुरळ उठणे  ज्याचा रंग सामान्य त्वचेपेक्षा वेगळा असतो, 

प्रभावित क्षेत्रातील त्वचेत बदल होणे, खाज सुटल्यामुळे सतत खाजवण्याची इच्छा होणे, प्रभावित क्षेत्रातील त्वचा क्रॅक होणे किंवा सोलली जाणे ही जांघेत खास येण्याची किंवा जॉक इचची लक्षणे आहेत. 

वाचा – त्वचेच्या समस्या आणि त्यावरील झटपट उपाय

जांघेत खाज सुटणे कारणे – Janghetil Khaj Karne Marathi

तुमचा क्रॉच एरिया, म्हणजेच तुमच्या दोन पायांमधील क्षेत्र, अ नेक प्रकारच्या बुरशींसाठी प्रजनन भूमी म्हणून काम करते. असे घडते जेव्हा कठोर परिश्रम किंवा व्यायामामुळे तुमच्या मांड्याभोवती खूप घाम येतो किंवा तुम्ही त्याठिकाणी स्वच्छता नीट पाळत नाही. व्यायाम केल्यानंतर लगेचच आंघोळीसाठी वेळ नसेल, तर तुमच्या क्रॉच एरियावर वाढणारे बॅक्टेरिया व इतर जंतू नष्ट होऊ शकत नाहीत आणि त्यांची वाढ होते. ज्यामुळे तुम्हाला हा संसर्ग होतो. ज्याला आपण जॉक इच म्हणतो.जॉक इच हा बुरशीमुळे होतो जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. एकमेकांचे घाणेरडे कपडे आणि टॉवेल वापरून हा संसर्ग पसरतो. जॉक इच त्याच प्रकारच्या फंगसमुळे  होते ज्यामुळे ऍथलेट्स फूटचा त्रास होतो. हा संसर्ग पायांपासून गुप्तांगापर्यंत टॉवेल किंवा हाताने पसरू शकतो. जॉक इचचे जंतू हे बंद आणि ओलसर ठिकाणी राहतात. हे त्वचेचे विकार आयुर्वेदिक उपाय करून बरे होऊ शकतात.

ADVERTISEMENT
जांघेत खाज सुटणे उपाय (Janget Khaj Yene Upay In Marathi)
जांघेत खाज सुटणे उपाय

तुम्हाला जॉक इच होण्याचा धोका जास्त आहे जर –

  • तुम्ही पुरुष असाल तर कारण स्त्रियांना ते होण्याचा धोका कमी असतो
  • तुम्ही घट्ट अंडरवेअर घालत असाल 
  • तुमचे वजन जास्त असेल 
  • तुम्हाला खूप घाम येत असेल 
  • तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असेल 
  • तुम्हाला त्वचेशी संबंधित काही इतर समस्या असतील 

व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची कारणं आणि घरगुती उपचार

जांघेत खाज येत असल्यास अशी घ्या काळजी – Jock Itch Prevention In Marathi

आपण अशा प्रकारे जांघेत खाज येत असल्यास काळजी घेऊ शकता व बुरशीजन्य संसर्ग टाळू शकता. 

  • दररोज स्नान करा. विशेषत: अशा वेळी आंघोळ करणे टाळू नका  जेव्हा तुमचे शरीर घामाने ओले असेल. उदाहरणार्थ, खेळल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर किसून उन्हातून आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा. 
  • इतरांचे टॉवेल वापरू नका. 
  • कपडे घातल्यानंतर लगेच धुवा. खास करून तुमचे अंडरगारमेंट्स रोज धुवा.
  • तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुमच्या या समस्येबद्दल डॉक्टरांशी बोला. तुमचे डॉक्टर तुम्हाला त्यासाठी काही औषधे देतील. 
  • तुमचे प्रायव्हेट पार्टस कोरडे ठेवण्यासाठी पावडर वापरा. घाम आल्यावर किंवा आंघोळीनंतर त्या भागावर सुगंध नसलेली पावडर लावा.पावडर (उदा. टॅल्कम पावडर) किंवा अँटीफंगल पावडर दिवसातून एकदा किंवा दोनदा वापरा. समस्या वाढल्यास डॉक्टरांना भेटा.
  • टॅल्कम पावडर त्वचेतील ओलावा शोषून घेते. हे तुमची मांडीचा भाग स्वच्छ ठेवते आणि घाम देखील दूर ठेवते. टॅल्कम पावडर लावल्याने तो भाग कोरडा आणि स्वच्छ राहील, जर तुम्हाला घाम येत नसेल तर तुम्हाला त्वचेवर पुरळ आणि जॉक इच होणार नाही.
  • घट्ट बसणारी किंवा सिंथेटिक (उदा. रेयॉन किंवा नायलॉन) अंतर्वस्त्रे घालणे टाळा. त्याऐवजी लूज-फिटिंग, कॉटन अंतर्वस्त्रे घाला.

जांघेतील खाजेवर घरगुती उपाय – Home Remedies For Itching In Private Area 

जांघेत खाज सुटत असेल तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही ओटीसी रिलीफ उत्पादनाचा थेट तुमच्या त्वचेवर वापर करू शकता. परंतु काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही प्रथम अँटी फंगल वॉश घ्या आणि त्याद्वारे तुमची त्वचा धुवा. नंतर आपले क्षेत्र पूर्णपणे कोरडे होऊ द्या. हे करावे लागेल कारण या भागात राहणारा ओलावा हे या संसर्गाचे मुख्य कारण आहे. याशिवाय तुम्ही या त्रासासाठी काही घरगुती उपाय देखील करून बघू शकता. 

ADVERTISEMENT
जांघेत खाज सुटणे उपाय (Janget Khaj Yene Upay In Marathi)
जांघेत खाज सुटणे उपाय

लिस्टरिन

यात अँटीसेप्टिक, अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ गुणधर्म आहेत, जे जॉक इच बरे करण्यास मदत करतात. कापसाच्या बोळ्याच्या मदतीने प्रभावित भागावर लावा. सुरुवातीला तुम्हाला जळजळ होईल. तरी हळूहळू आराम मिळेल. आपण इच्छित असल्यास, हा उपाय आपण दिवसातून तीन ते चार वेळा करू शकता. हा एक चांगला उपाय आहे .परंतु जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ते करणे टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

खोबरेल तेल

सतत खाजवल्याने त्वचेततील ओलावा निघून जातो, त्यामुळे आणखी खाज सुटू लागते, अशा परिस्थितीत तुम्ही बहुगुणी नारळाचं तेल वापरू शकता. कापसाच्या बोळ्याच्या मदतीने, खोबरेल तेल प्रभावित भागात  लावा. तेल सुकण्यासाठी सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करा. हा उपाय दिवसातून दोनदा करा.

ओटमील 

ओटमील हे सूज आणि खाज कमी करण्यास मदत करते. थंड पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये दोन कप ओटमील घाला. बाथटबमध्ये रिलॅक्स करताना प्रभावित भागाला पाण्याने मालिश करा. रात्री अंघोळ करताना हे करा. 

कॉर्न स्टार्च

कॉर्न स्टार्च हे कोरडे करणारे एजंट म्हणून काम करते आणि प्रभावित क्षेत्राभोवती मॉइश्चरायझर टिकवून ठेवण्यास मदत करते. याशिवाय, यामुळे त्वचेला थंडपणाची अनुभूती मिळते, ज्यामुळे खाज येणे किंवा जळजळ यासारख्या समस्या कमी होतात. प्रभावित भागात दर तीन तासांनी किंवा जेव्हा ते कोरडे होऊ लागते तेव्हा कॉर्न स्टार्च लावा.

ADVERTISEMENT

हे घरगुती उपाय करूनही जर खाज बरी होत नसेल तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. हा त्रास चार-पाच दिवसांपेक्षा जास्त असेल तर एकदा डॉक्टरांना नक्की भेटा. या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. त्वचेवर खाज सुटणे तुमच्या जीवनशैलीवरही परिणाम करते. कारण ते तुमच्या झोपेत व्यत्यय आणते आणि चिंता किंवा नैराश्य निर्माण करते. म्हणूनच वेळीच औषधी उपचार सुरु करा. 

वाचा – लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपाय

जांघेत खाज येण्यासंबंधी पडणारे काही सामान्य प्रश्न – FAQ 

प्रश्न- जॉक इचची चाचणी कशी केली जाते?

उत्तर-  बर्‍याच प्रकरणांमध्ये, पुरळ पाहूनच डॉक्टरांना कळते की तुम्हाला जॉक इच आहे. जर डॉक्टरांना खात्री करून घ्यायची असल्यास ते तुमच्या त्वचेचा एक छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात किंवा चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात. या चाचणीला “कल्चर” असे म्हणतात.

ADVERTISEMENT

प्रश्न – जॉक इच वर उपचार काय आहे?

उत्तर-  जर जॉक इचचा संसर्ग वाढला नसेल, तर डॉक्टर पुरळांवर लावण्यासाठी क्रीम, लोशन, स्प्रे किंवा पावडर यांसारखी अँटी फंगल औषधे लिहून देऊ शकतात. या उपचारामुळे पुरळ पूर्णपणे बरे होऊ शकते, परंतु बरे झाल्यानंतर 1-2 आठवड्यांपर्यंत हे उपचार सुरू ठेवा.

प्रश्न- तुम्हाला जॉक इच होते तेव्हा तुम्ही काय करू नये?

उत्तर- जोपर्यंत तुमचा संसर्ग पूर्णपणे बरा होत नाही सैल-फिटिंगचे सुती कपडे घाला. घट्ट अंडरवेअर, पँट घालणे टाळा. प्रत्येकवेळी वापरल्यावर आपले कपडे आणि शॉर्ट्स धुवा. इतर लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून आपले कपडे, क्रीडा उपकरणे, टॉवेल किंवा चादरी इतरांना वापरण्यास देऊ नका. 

ADVERTISEMENT

प्रश्न – जॉकची इच पूर्णपणे बरे झाले आहे हे कसे कळेल?

उत्तर – जेव्हा त्वचा सामान्य होते, लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ होणे आणि सुजणे पूर्णपणे थांबते तेव्हा समजावे की तुम्ही बरे झाला आहात.  

प्रश्न- जॉक इच बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?

उत्तर – योग्य निदान आणि उपचार केल्यानंतर जॉक इच एक ते आठ आठवड्यांत पूर्णपणे बरे होते. 

ADVERTISEMENT

लक्षात ठेवा बुरशीजन्य संसर्गाची समस्या केवळ जांघेतच नाही तर त्वचेच्या अनेक भागांवर होऊ शकते. ही समस्या वाढण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.  जांघेत खाज सुटणे उपाय (Janget Khaj Yene Upay In Marathi)  करून बरे होत नसेल किंवा अधिकच वाढत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून तुमच्या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवता येईल.

Photo Credit – istock

अधिक वाचा – 

घाम कमी येण्यासाठी उपाय

ADVERTISEMENT
27 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT