ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
लिंबू आणि कोरफडचे तीन अप्रतिम फायदे, केसांची वाढ होईल झटकन

लिंबू आणि कोरफडचे तीन अप्रतिम फायदे, केसांची वाढ होईल झटकन

 

प्रत्येक महिलेला आपले केस लांबसडक, सरळ आणि कोंडामुक्त असावे असे नक्कीच वाटत असते. पण आपली बदललेली जीवनशैली, खाण्याच्या उलटसुलट आणि वाईट सवयी, हिटिंग प्रॉडक्ट्सचा सततचा वापर आणि केसांची योग्य काळजी न घेणे यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात. हे ठीक करण्यासाठी मग पार्लरच्या फेऱ्या अथवा बाजारामध्ये आलेले अनेक उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण यामुळे केस पटकन वाढतात अथवा चांगले होतातच असं नाही. तुम्हाला जास्त खर्च न करता केसांना नैसर्गिक तऱ्हेने काळजी घ्यायची इच्छा असल्यास, घरच्या घरी कोरफडचा उपयोग आणि लिंबू या दोन पदार्थांचा उपयोग करून घेता येतो. हे मिश्रण कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. लिंबू आणि कोरफड जेल केसांना लावल्यावर केवळ केसांची चमकच परत येत नाही तर केस घनदाट, लांब, सरळ आणि कोंडामुक्तदेखील होतात. या लेखातून आपण याचा तीन गोष्टींसाठी कशाप्रकारे वापर करता येतो ते पाहणार आहोत. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

केसांच्या वाढीसाठी कसे वापरावे कोरफड जेल आणि लिंबाचा रस

Canva

 

बाजारामध्ये येणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये सांगण्यात येतं की याचा वापर केल्याने केसांची वाढ होईल. पण तुम्हाला केसांची वाढ नैसर्गिक तऱ्हेने हवी असेल तर तुम्हाला योग्य पोषणाची आवश्यकता असते. अशा वाढीसाठी तुम्ही कोरफड जेल आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 1 मोठा चमचा कोरफड जेल
  • 1 मोठा चमचा लिंबाचा रस 
  • 1 मोठा चमचा नारळाचे तेल

कृती 

  • एका बाऊलमध्ये कोरफड जेल, लिंबाचा रस आणि नारळाचे तेल नीट मिक्स करून घ्या
  • त्यानंतर हे मिश्रण केसांच्या मुळापासून लावा 
  • एक तासानंतर तुम्ही केसांना माईल्ड शँपू लाऊन धुवा 
  • हे  तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करून पाहा. तुमच्या केसांची वाढ झटपट होताना तुम्हाला दिसेल. इतकंच नाही तर तुमचे केस अधिक चमकदार होतील

केसांना अधिक घनदाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी वापरा मुलतानी माती

हेअर स्ट्रेटनिंग अर्थात सरळ करण्यासाठी कोरफड जेल आणि लिंबाच्या रसाचा प्रयोग

Shutterstock

ADVERTISEMENT

 

अँटिफंगल आणि  अँटिबॅक्टेरियल घटकांसह कोरफड जेलमध्ये प्रोटीन, विटामि्स आणि मिनरल्सदेखील जास्त प्रमाणात आढळतात. जे केसांना पोषण देतात आणि स्काल्पला डॅमेज सेलपासून वाचवतात. तर लिंबाचा रस हा केसांमधील फॉलिकल्स अनक्लॉग करतो आणि केसांची वाढ होण्यास फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या केस सरळ हवे असतील तर तुम्ही कोरफड जेल आणि लिंबाच्या रसाचे हे मिश्रण कॅस्टर ऑईल अर्थात एरंडेल तेलासह मिक्स करून लावा. यामुळे केस सरळ तर होतीलच पण केसांना मजबूतीही मिळेल. 

साहित्य

  • 1 मोठा चमचा कोरफड जेल
  • 1 मोठा चमचा लिंबाचा रस 
  • 2 लहान चमचे एरंडेल तेल अर्थात कॅस्टर ऑईल
  • 2 लहान चमचे मध 

कृती  

  • सर्वात पहिले केस स्वच्छ धुऊन ते व्यवस्थित सुकवून घ्या् 
  • केस सुकल्यावर एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि एक स्मूद पेस्ट (गुठळी न राहता) तयार करून घ्या
  • हे मिश्रण स्काल्पपासून ते केसांच्या अगदी खालपर्यंत लावा 
  • हे पूर्ण सुकेपर्यंत केसांवर तसेच राहू द्या
  • सुकल्यानंतर केस धुवा. असं केल्याने केस सरळ तर होतीलच पण तुमच्या केसांना अधिक चमक मिळते
  • आठवड्यातून एकदा याचा उपयोग केसांवर करा

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

ADVERTISEMENT

कोंडा दूर करण्यासाठी कोरफड जेल आणि लिंबाच्या रसाचा वापर

Shutterstock

 

कोणत्याही ऋतूमध्ये केसांमध्ये धूळ जमा होते आणि कोंड्याची समस्या वाढते. साधारण उपचारांनी काही वेळापुरती ही समस्या निघून जाते. मात्र पुन्हा पुन्हा ही समस्या येतच राहते. अशावेळी तुम्हाला कांदा, कोरफड जेल आणि लिंबाच्या रसाचा उपयोग करून घेता येतो. 

साहित्य

  • 1 मोठा चमचा कोरफड जेल
  • 1 मोठा चमचा लिंबाचा रस 
  • 1 मोठा चमचा कांद्याचा रस 

कृती 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिल्यांदा कांद्याचा रस काढून घ्या
  • त्यानंतर एका बाऊलमध्ये कोरफड जेल आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या आणि मग त्यात काढलेल्या कांद्याचा रस मिसळा
  • हे मिश्रण केसांना आणि स्काल्पला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा 
  • संपूर्ण दिवस हे केसांना असंच राहू द्या आणि मग सुकल्यावर केस माईल्ड शँपूने धुवा 
  • आठवड्यातून दोन वेळा किमान याचा प्रयोग तुमच्या केसांवर करा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT