ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
वापरलेल्या लिंबाच्या साली फेकू नका, गृहिणींनी असा करून घ्या फायदा

वापरलेल्या लिंबाच्या साली फेकू नका, गृहिणींनी असा करून घ्या फायदा

लिंबाचा रस काढून झाल्यानंतर आपण सहसा लिंबाची सालं (lemon peels) फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का? या लिंबाच्या सालांचा आपण अन्य उपयोगही करून घेऊ शकतो. लिंबाच्या सालामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. केवळ खाण्यासाठी अथवा सौंदर्यासाठीच लिंबाचा उपयोग होतो असं नाही. तर लिंबाच्या सालांचा उपयोग तुम्ही स्वच्छता करण्यासाठीही (Cleaning) करून घेऊ शकता. आम्ही या लेखातून तुम्ही लिंबाच्या सालीचे काही उपयोग सांगणार आहोत. ज्याची तुमच्या रोजच्या कामातही मदत होऊ शकेल. याबाबत अधिक जाणून घेऊया. 

लिंबाच्या सालीचा क्लिनर कसा बनवाल? (how to make cleaner from lemon peel)

लिंबाच्या सालीचा क्लिनर कसा बनवाल? (how to make cleaner from lemon peel)

(how to make cleaner from lemon peel)

लिंबाच्या सालीचा उपयोग आपण क्लिनर बनविण्यासाठीही करून घेऊ शकतो. याचा नक्की कसा वापर करायचा ते आपण पाहूया. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • दीड लीटर पाणी
  • 1 किलो लिंबाची साल
  • 1 चमचा डिशवॉश 
  • 1 चमचा बेकिंग सोडा 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिल्यांदा तुम्ही पाण्यात लिंबाची साले उकळून घ्या. कमीत कमी 10 मिनिट्स तुम्ही मंद आचेवर पाणी उकळवा. त्यानंतर पाणी थंड करा आणि लिंबाच्या सालातील पाणी पिळून घ्या 
  • त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. जेणेकरून लिंबाची बी आणि लिंबाचा पल्प यातून निघून जाईल. हे पाणी त्यानंतर एका स्प्रे बॉटल मध्ये भरा. अगदी वरपर्यंत भरू नका
  • पाणी भरल्यावर त्यात बेकिंग सोडा आणि डिशवॉश मिक्स करा. त्याचा फेस कमी होण्याची वाट पाहा. तुमचे क्लिनर तयार आहे. 

कोणत्या कामासाठी वापरता येईल हे क्लिनर (How to use lemon peels cleaner)

कोणत्या कामासाठी वापरता येईल हे क्लिनर (How to use lemon peels cleaner)

(How to use lemon peels cleaner)

ADVERTISEMENT
  • एखाद्या भांड्याला गंज चढला असल्यास या क्लिनरचा वापर करून काढता येतो 
  • टाईल्सच्या स्वच्छतेसाठी 
  • गॅस, स्टोव्ह आणि प्लॅटफॉर्मच्या स्वच्छतेसाठी 
  • या क्लिनरने तुम्ही स्टीलच्या भांड्याची स्वच्छता करू शकता 
  • या क्लिनरने तुम्ही तुमच्या कारची स्वच्छताही करू शकता 
  • प्लास्टिकचे सामान अर्थात टेबल, खुर्ची, स्वयंपाकघरातील डब्बे इत्यादी तुम्ही याने स्वच्छ करू शकता

टीप – लक्षात ठेवा हे क्लिनर तुम्ही लाकडी सामानावर वापरू नका. अन्यथा लाकडी वस्तू फुलेल आणि खराब होईल. त्याशिवाय कोणत्याही काचेच्या सामानावरही हे क्लिनर वापरू नका. कारण तसं केल्यास, याचे निशाण काचेवर तसंच राहील. 

लिंबाच्या सालीचे बनवा झटपट लोणचे

लिंबाच्या साली तुम्ही जेव्हा वापरला तेव्हा एका डब्यात भरून ठेवा आणि तुम्ही याचा वापर घरच्या घरी झटपट लोणचे बनवण्यासाठीही करू शकता. लिंबाचे लोणचे जितके स्वादिष्ट असते तितकेच स्वादिष्ट लोणचे त्याच्या सालीपासूनही बनवता येते. त्यामुळे ही साल फेकून न देता पटकन लोणचे कसे बनवता येईल ते पाहूया. 

साहित्य 

  • राईचे तेल (आवश्यकतेनुसार)
  • 2 चमचा पिवळी मोहरी 
  • 1 लहान चमचा ओवा 
  • पाव चमचा हिंग
  • 1 लहान चमचा हळद पावडर 
  • 1 मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर 
  • चवीनुसार मीठ आणि काळे मीठ (सैंधव)
  • 2 चमचे पीठी साखर
  • 1 किलो लिंबाचे साल 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिले लिंबाची साले बारीक कापून घ्या. तुम्हाला हव्या तो आकार घ्या 
  • लक्षात ठेवा यातून लिंबाच्या सर्व बी काढून टाका. अन्यथा लोणचे कडवट लागेल
  • आता दोन भाग करा आणि दोन काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवा
  • एका बरणीत खाली लिंबाचा रस आणि मीठ घालून उन्हात ठेवा. साधारण 8-10 दिवस उन्हात ठेवावे लागते. पण तुम्हाला पटकन लोणचे बनवायचे आहे तर तुम्ही लिंबाच्या सालींना उकडून घ्या आणि मग काचेच्या बरणीत भरा
  • दुसऱ्या बरणीत लिंबाच्या सालींमध्ये तुम्ही मीठ मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात तुम्ही लाल मिरची पावडर, लोणचे मसाला, लिंबाचा रस एक चमचा, थोडीशी पिठी साखर मिक्स करून घ्या
  • एका पॅनमध्ये 2 चमचे राईचे तेल गरम करा. त्यात, मोहरी, ओवा, हिंग घाला. ही फोडणी वरून लोणच्याला द्या आणि मिक्स करून बरणीत भरून ठेवा. तुमचे लोणचे तयार 

सौंदर्यासाठी लिंबाच्या सालींचा वापर

सौंदर्यासाठी लिंबाच्या सालींचा वापर

सौंदर्यासाठी लिंबाच्या सालींचा वापर

सर्वात जास्त लिंबाच्या सालीचा वापर हा हाताचा कोपरा आणि पायाचा गुढघा काळा झाला असेल तर त्यासाठी करतात. लिंबाची साल यावर रगडल्याने काळेपणा दूर होतो. तसंच तुम्ही लिंबाची साल नेहमी फेकून देण्याच्या आधी चेहऱ्यालाही लावली तरीही तुमचा चेहरा अधिक चमकदार होण्यास मदत मिळते. 

अधिक वाचा – त्वचेसाठी लिंबाचा वापर आणि त्याचे होणारे अप्रतिम फायदे – How To Use Lemon For Face

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT