सारेगमपच्या नव्या पर्वामुळे बच्चेकंपनी सध्या चांगलीच खूश आहे. या नव्या पर्वातील पहिल्याच भागात चिमुकल्या स्पर्धकांची तयारी पाहून प्रेक्षक आणि परिक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या नव्या पर्वात सारेगमप लिटिल चॅम्प्सचे १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यात आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. त्यांच्या सुरेख गाण्यांनी एक वेगळाच माहोल या लिटिल चॅम्प्सनी तयार केला. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धकांच्या टॅलेंटची झलक पाहून या कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड या यांच्यासाठी परीक्षण करणं हे खूप अवघड असणार आहे हे मात्र नक्की.
या भागात रंगणार लोकसंगीताचा जागर
गुरुवार ते शनिवार रात्री झी वाहिनीवर रात्री साडे नऊ वा. सारेगमप लिटिल चॅम्सचे प्रसारण केले जाते. यंदाच्या भागाची खासियत ही आहे की या मंचावर परिक्षक म्हणून बारा वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्सचे पर्व गाजवलेले पंचरत्न परिक्षक म्हणून लाभले आहेत. बारा वर्षापूर्वाच्या आठवणी आणि माहोल त्यामुळे प्रेक्षकांच्या समोर निर्माण होत आहे. जेव्हा एखाद्या स्पर्धकाच्या गाण्यानंतर परिक्षकांची मते विचारली जातात तेव्हा बारा वर्षापूर्वीचा हा काळच पुन्हा रिक्रिएट होत आहे असं वाटत राहतं. आता हे पंचरत्न मोठे झाले असले आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलं असलं तरी प्रेक्षक आजही त्यांना चिमुकल्या लिटिल चॅम्सच्या रूपात पाहत आहेत. त्यामुळे एक छान वातावरण या मंचावर निर्माण होत आहे. पहिल्या आठवड्यातील या लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सेस नंतर या आठवड्यात या मंचावर लोकसंगीताचा जागर होणार आहे. मुंबईची स्वरा जोशी म्हणजेच परीक्षकांचा लाडका रव्याचा लाडू हि आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांना क्लीन बोल्ड करणार आहे. तिच्या ‘शेजारणीने बरं नाही केलं ग बया’ या गाण्याने सर्वांना मंचावर ताल धरायला भाग पाडलं. परीक्षक देखील तिच्या या गाण्याने खूपच प्रभावित झाले. स्वरासोबत बाकी स्पर्धकसुद्धा परीक्षक आणि प्रेक्षकांनादेखील येत्या आठवड्यात लोकसंगीताने मंत्रमुग्ध करून टाकण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे या भागात एका पेक्षा एक परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
स्पर्धकांप्रमाणेच छोट्या वादकांनी केलं सर्वांना क्लीन बोल्ड
छोटे गायक तसंच अतिशय उत्तम छोटे वादक देखील आपल्याला या पर्वात पाहायला मिळत आहेत. नाशिकचा अविनाश गांगुर्डे कोगों तुंबा, कोल्हापूरची तन्वी धनंजय पाटीलला तर मेंडोलिन, जलतरंग हार्मोनियम, किबोर्ड, व्हायोलिन सर्वच वाद्य वाजवता येतात. कोल्हापूरचा सोहम सचिन जगताप संतूर वाजवताना दिसत आगेयय औरंगाबादचा सौहम उगले संबळ वाजवताना दिसेल. लोकसंगीताचा जागर सादर करण्यासाठी स्पर्धकांना या छोट्या वाद्यवृंदाची चांगलीच साथ मिळत आहे. त्यामुळे नवीन भागातील गाणी आणि संगीत पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आणि परिक्षक नक्कीच उत्सुक आहेत. शिवाय बारा वर्षा आधी गाजलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स पर्वाप्रमाणे हे पर्वही आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहणार असं वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
आपल्याच गाण्याचं प्रमोशन करतेय राखी, व्हिडिओ होतायत व्हायरल
‘मी बनू शकते उत्तम दिग्दर्शक’, कंगनाचा दावा
Hot and Sexy: भूषण प्रधानचे फोटो व्हायरल, कमेंट्सचा वर्षाव