ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
वाढतं वय लपवायचंय तर नक्की वाचा या अँटीएजिंग टीप्स

वाढतं वय लपवायचंय तर नक्की वाचा या अँटीएजिंग टीप्स

सुंदर दिसणं आणि नेहमी तरूण राहणं हे कोणाला नाही आवडत? प्रत्येकालाच आपण नेहमी तरूण दिसावं आणि राहावं असं वाटत असतं. पण असं होणं शक्य नसतं. जसजसं आपलं वय वाढत जातं तसं म्हातारपण जवळ येतं. पण नेहमी तरूण राहू शकत नसलो तरीही आमच्याकडे  अशा काही टीप्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचं वाढतं वय लपवता येऊ शकतं. अशा या एँटिएजिंग टीप्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. Anti Aging ही खरं तर सर्वच मुलींसाठी एक मोठी समस्या असते. पण ही समस्या सोडवण्याचे उपायही असतात. तुम्ही हे उपाय करून आपलं वाढतं वय लपवण्याचा आणि तरूण राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता.

वय वाढणं वाईट नाही – Ageing is Truth

Priyanka Reception 3
वय वाढणं ही प्रक्रिया चुकीची नाही आणि वाईटही नाही. ही गोष्ट बऱ्याच कमी लोकांना समजते आणि आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी उगीच लोक वय वाढतं म्हणून दुःखी होत असतात. जसं वय वाढतं तसं खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्याची मजा घेतली पाहिजे. वास्तविक हे सर्वात मोठं सत्य आहे की, प्रत्येक महिला नेहमी तरूण दिसण्याचा आणि सुंदर दिसण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तुम्हाला बोटोक्स करायला नक्कीच आवडणार नाही. पण तरीही तुम्ही आपल्या बऱ्याच गोष्टींकडे नेहमीच लक्ष देत राहता. आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहोत ते अर्थात कमी खर्चिक आणि तुमची त्वचा नेहमी तरूण दाखवणारे आणि तुम्हाला अधिक सुंदर करणारे आहेत.

चष्म्याचा योग्य वापर करा – Specs Are Good

ADVERTISEMENT

Antiageing 4
स्वतःला कमी वयाचं दाखवण्याचा मुख्य पर्याय आहे तो म्हणजे चष्मा. आतापर्यंत तुम्हाला हे नक्की माहीत असेल की, जेव्हा वय वाढतं तेव्हा चष्मा वापरावा लागतोच. तुम्हाला कदाचित चष्मा घालायला आवडत नसेल पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की, तुम्हाला हाच चष्मा घातल्यामुळे तुमचं वय चार ते पाच वर्षांनी कमी दिसू शकतं. चमकले ना तुमचेही डोळे? पण हे खरं आहे. वास्तविक जेव्हा तुम्ही चष्मा घ्यायला जाल तेव्हा नेहमी एका चांगल्या फ्रेमचीच निवड करा. तुमच्या चेहऱ्याला चांगल्या दिसणाऱ्या फ्रेमची तुम्ही निवड करणं गरेजचं आहे. त्यामुळे तुम्ही योग्य फ्रेम निवडल्यास, चेहऱ्याला थोडा उंच लुक देऊन अजून तरूण दिसू शकता. हा पर्याय नक्की करून बघा.

हेअर स्टाईल बदला – Change your Hairstyle

Haircare Tips for hair styling 2116725
कितीतरी वर्षांपासून तुम्ही एकच हेअरस्टाईल करत असाल, तर आता ती बदलण्याची वेळ आली आहे. हवं असल्यास, तुमच्या केसांना वेगळ्या तऱ्हेचा हेअरकट द्या, कलर करून घ्या अथवा अल्टरेशन करा. नेहमी लक्षात ठेवा की, हेअरकट हा आपल्या चेहऱ्याचा आकार आणि कट पाहून त्याचप्रमाणे करावा. केसांचा आंबाडा बांधणं अथवा केसांना मधून भांग पाडणं अशा तुमच्या हेअरस्टाईल्समुळे तुमचं वय जास्त दिसतं. त्यासाठी तुम्ही अशा तऱ्हेची हेअर स्टाईल करणं टाळा. साईड स्वेप्ट बँग्ज, हनी हायलाईट्स, रोमँटिक व्हेव्हज अशा हेअरस्टाईल्स नक्कीच तुम्हाला एकदा ट्राय करून बघायला हव्या.

स्टायलिश कम्फर्टेबल फुटवेअर – Stylish Footwear

ADVERTISEMENT

Cracked Heels 2
आता तुम्ही जर हायहील चप्पल घातल्यावर तुमच्या पायांमध्ये दुखत असेल. पण ड्रेसबरोबर हायहील चांगली दिसत असेल. डॉक्टरांनी मात्र तुम्हाला ऑर्थोपेडिक फुटवेअर घालण्याचा सल्ला दिला आहे. असं असताना नक्की काय करायचं? तुम्हाला जर वाटत असेल की, अशा तऱ्हेचे फुटवेअर अजिबातच स्टायलिश नसतात. तर असं काही नाही. आता बाजारामध्ये अशा तऱ्हेचे फुटवेअर लाँच करण्यात आले आहेत. जे ऑर्थोपेडिकसह डिझाईनरदेखील आहेत. बऱ्याच ब्रँड्सने अशा तऱ्हेचे फुटवेअर डिझाईन्स केले आहेत. त्यामुळे तुम्ही फॅशनेबल स्टायलिश कम्फर्टेबल फुटवेअर घालून अजूनही तरूण असल्याचं दाखवू शकता.

योग्य फिटिंगची ब्रा – Bra Fitting

Habits for weightloss 1
वय वाढण्याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्ही तुमचे अंडर गारमेंट्स सैल घालाल. योग्य फिटिंग असणारे अंडर गारमेंट्स, विशेषतः ब्रा तुम्हाला योग्य कम्फर्ट देतात. इतकंच नाही तर तुम्हाला स्लिमिंग इफेक्टदेखील देतात. तर खराब फिटिंगची ब्रा चा स्ट्रॅप तुमची स्किन खूपच टाईट ठेवते आणि मग ब्रा च्या कप्समुळे बूब्स बाहेर येऊन अतियश खराब लुक देतात. त्यामुळे तुमचा पूर्ण लुक खराब होतो याकडे तुमचं लक्ष असायला हवं.

योग्य तऱ्हेने बसणं – Correct Posture
तुम्ही जर योग्य तऱ्हेने बसत नसाल तर तुमच्या मानेला आणि डोक्याला नक्कीच ताप होऊ शकतो. यामुळे तुमचं डोकं रोज दुखण्याची शक्यता असते. शिवाय तुम्ही नीट न बसल्यामुळे लवकरच तुम्हाला प्रौढत्व येतं याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते. नीट ताठ बसल्यामुळे तुम्हाला लवकर प्रौढत्व येत नाही हे सत्य आहे. शिवाय तुम्ही बसलेल्या पोश्चरमध्ये तुमचा आत्मविश्वासही दिसत असतो. योग्य तऱ्हेने बसल्यामुळे तुमच्याजवळ कोणताही आजार फिरकत नाही आणि शिवाय प्रौढत्व येत नाही.

ADVERTISEMENT

व्यायामाची साथ – Exercise
व्यायामामुळे तरूण राहण्यास मदत होते कारण व्यायाम तुमचा मूड आणि झोप या दोन्ही गोष्टी समतोल ठेवतो. वर्कआऊट केल्यामुळे तुमची त्वचा व्यवस्थित ताठ राहते आणि तरूण दिसते. बऱ्याच शोधानुसार हेदेखील खरं आहे की, जे लोक नियमित व्यायाम करतात ते अधिक तरूण दिसतात. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की, तुम्ही जर आऊटडोअर व्यायाम करत असाल तर, तुम्ही त्वचेवर नेहमी सनस्क्रीनचा वापर करावा.

भरपूर झोप – Good Sleep

sleep
ब्यूटी स्लीप हे फक्त सांगण्यातच येत नाही तर हे सत्य आहे. कमी झोप असल्यास, त्वचा एकदम कोरडी होते, शिवाय ब्रेकआऊट, लाल ओरखडे येणं आणि डोळ्यांच्या खाली काळं दिसणं या कमी झोपेमुळे उद्भवणाऱ्या समस्या आहेत. तुमच्या वयानुसार या गोष्टी अधिक वाढत जातात. नियमितपणे रोज योग्य वेळी झोप घेणे आणि बेडरूममधील इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बाजूला ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या झोपेचा एक पॅटर्न यामुळे राहतो आणि भरपूर झोप घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा टिकून राहतो.

पाठीवर झोपा – Sleep on your Back
केवळ डोळे बंद करून झोपणं हे योग्य नाही. तुम्ही कशाप्रकारे झोपता हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पोटावर झोपत असाल तर, तुमच्या चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या येतील हे लक्षात घ्या. तुम्ही नेहमी तुमच्या पाठीवर झोपणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पाठीवर झोपलात तर चेहऱ्याला सूज येत नाही. शिवाय तुमचं शरीर अतिशय रिलॅक्स राहतं, डेड स्किन सेल्सची समस्यादेखील दूर होते. सुरकुत्यांपासून लांब राहायचं असल्यास, हा सर्वात चांगला पर्याय  आहे. शिवाय पाठीवर झोपल्यामुळे तुम्ही तजेलदार आणि ताजेतवाने दिसता.

ADVERTISEMENT

हायड्रेशन गरेजचं – Hydration

lady drinking water %28500x332%29
डिहायड्रेशन तुमच्या त्वचेला अगदी कोरडं बनवतं आणि तुम्हाला म्हातारं बनवण्यात डिहायड्रेशनचा मोठा वाटा असतो. डिहायड्रेशनमुळे तुमची त्वचा अगदी थकलेली दिसते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी योग्य ठेवायला हवी. तुमच्याबरोबर असं काही होणार नाही याची काळजी स्वतःच घ्यायला हवी. घराबाहेर जाताना नेहमी आपल्याबरोबर आपली पाण्याची बाटली जवळ ठेवायला हवी. शिवाय थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहायला हवं. कितीही कामात असलात तरीही शरीराला आवश्यक तितकं पाणी पोटात जायलाच हवं. दिवसाला निदान दोन बाटलीपेक्षा अधिक पाणी अर्थात 7-8 ग्लास पाणी प्यायला हवं.

त्वचेमध्ये ओलावा – Moisture in Skin

Antiageing Tips 2
वयानुसार तुमची त्वचा पातळ होत जाते आणि त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहणं कठीण असतं. याच कारणामुळे तुम्ही रोज तुमच्या दैनंदिन आयुष्यात मॉईस्चरायझरचा वापर करायला हवा. मॉईस्चरायझरमुळे तुमच्या त्वचेवरील ओलावा व्यवस्थित राहतो. ज्याप्रमाणे तुमच्या शरीरासाठी पाण्याची आवश्यकता असते तशीच तुमच्या शरीराला मॉईस्चरायझरची देखील आवश्यकता असते. मॉईस्चरायझर हे तुमच्या त्वचेतील ओलावा जपतात आणि त्वचेला कोणतीही हानी पोहचवण्यापासून रोखतात. मॉईस्चरायझरमुळे तुम्हाला सुरकुत्या लवकर पडण्याचा त्रासही कमी होतो.

ADVERTISEMENT

सनस्क्रीनचा उपयोग – Use of Sunscreen
तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी सनस्क्रिन लावून सुरु केली नसेल तर आता लवकरात लवकर सुरु करा. अनुवंशिकरित्या तुमच्या शरीरातील होणारे बदल अर्थातच कोणीच थांबवू शकत नाही. पण तुम्हाला तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच सनस्क्रिनचा वापर करायला हवा. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेला सर्वात जास्त नुकसान होत असतं. त्यामुळे तुम्ही 30 एसपीएफ सनस्क्रीन युक्त मॉइश्चराइजर रोज वापरणं गरजेचं आहे. रोज लावल्यास, हायपर पिगमेंटेशनबरोबरच तुमच्या त्वचेचं टेक्स्चर सुधारण्यास मदत होते. केवळ चेहऱ्यावरच नाही तर तुमच्या मानेवर, हातावर आणि तुमच्या शरीराच्या उघड्या जागेवर तुम्ही सनस्क्रिन लावायला हवं.

भरपूर न्यूट्रीशनची आवश्यकता – Nutrition

Top Diet rules
न्यूट्रीशनयुक्त जेवण नेहमी जेवायला पाहिजे हे तुम्ही नेहमीच ऐकत आला आहात. पण तुम्हाला जर स्वस्थ आयुष्य जगायचं असेल तर संतुलित डाएट करणं आवश्यक आहे. तरूण त्वचेसाठी सर्वात जास्त महत्त्वाचं विटामिन असतं. अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अध्ययनानुसार, विटामिन सी युक्त जेवण जेवणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी दिसतात आणि त्यांची त्वचा त्यामानाने कमी कोरडी दिसते. या अभ्यासानुसार, प्रत्येक वयाच्या लोकांना यामध्ये सामील करण्यात आलं होतं. दालचिनी, मिरची पावडर आणि आलं या गोष्टी चांगल्या त्वचेसाठी चांगला पर्याय आहे. आपल्या जेवणामध्ये या पदार्थांचा नक्की समावेश करून घ्या आणि नेहमी पदार्थांमध्ये या वस्तूंचा वापर करा.

अल्कोहोलला नको म्हणा – No Alcohol

ADVERTISEMENT

रोज दारू पित असल्यास, तुमच्या शरीरावर याचा नकारात्मक परिणाम होत असतो. अल्कोहोलचे बरेच दुष्परिणाम आहेत. बीबीसीच्या एका अहवालानुसार, दारू तुम्हाला डिहायड्रेट करते. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. दारू ही शरीरातील लोहस्तरदेखील खेचून घेते. त्यामुळे केसांवर याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे तुम्हाला जर तरूण दिसायचं असेल तर तुम्ही दारू पिण्यावर तारतम्य ठेवायला हवं.

धूम्रपानपासून राहा दूर – No to cigarette
धुम्रपान तुमच्या आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हीसाठी हानिकारक आहे. सिगरेट तुमच्या त्वचेवर नकारात्मक दृष्टीकोनातून परिणाम करत असते. चेहऱ्यावर सिगारेटचे दुष्परिणाम स्पष्ट दिसतात. सिगारेटमुळे ओठांचा रंग काळा होतो आणि थकवा लवकर येतो. तुमच्या चेहऱ्यावर जर सर्वात जास्त थकवा दिसत असेल तर त्याचं मुख्य कारण सिगारेट आहे.

सेक्स करणं आवश्यक – Sex is Compulsory

Antiageing
बऱ्याच शोधानुसार जे लोक सर्वात जास्त सेक्स करतात ते त्यांच्या वयापेक्षा जास्त तरूण दिसतात. वास्तविक समाधान देणारं सेक्स नेहमीच माणसाला तरूण ठेवतं. सेक्स करणं म्हणजे चांगलं आरोग्य आणि स्वस्थ आणि योग्य जीवन जगणं. तरूण दिसण्यासाठी तुम्ही नेहमीच सेक्स करत राहणं आवश्यक आहे. सेक्समुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स नियंत्रणात राहतात आणि त्यामुळे तुमची त्वचादेखील जास्त तजेलदार राहते.

ADVERTISEMENT

कमी ताण घ्या – No Tension
तणाव तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करतो. डिप्रेशन, थकवा, भीती या सगळ्यामुळे हृदयरोग होतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला तणावापासून जितकं दूर ठेवता येईल तितकं दूर ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत राहायला हव्या. तुम्हाला हवं तर तुम्ही मेडिटेशन करू शकता वा तुमच्या मित्र अथवा कुटुंबाबरोबर नातं सुधारण्याचा प्रयत्न. त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्हाला ज्या व्यक्ती आवडतात त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे तुम्ही मनाने पूर्णतः पोखरले जाता आणि त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर आणि विशेषतः चेहऱ्यावर होतो. तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसतात, डोळ्याखाली काळं जमा होतं, शिवाय तुमचे केसही गळू लागतात. त्यामुळे तणावापासून दूर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा.
तरूण त्वचेसाठी फळांशी करा मैत्री – Friendship with Good Eatables
तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील गोष्टींच वापर करूनदेखील तुमची त्वचा तरूण आणि सुंदर ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही. काही फळं आणि भाज्यांच्या सेवनाने तुमचं हे काम अधिक सोपं होऊ शकतं.

सफरचंद – Apple

Antiageing 8
या फळातून विटामिन सी मिळतं. यामुळे त्वचा कोमल ठेवण्यासाठी मदत होते आणि त्वचा व्यवस्थित टोनदेखील होते. शिवाय सफरचंदामुळे फ्री रॅडिकल डॅमेजपासून बचाव होतो. त्वचेच्या छिद्रांनाही सफरचंद अतिशय चांगलं ठेवतं आणि चेहऱ्यावर दिसणारं प्रौढत्व तुम्ही थांबवू शकता. सफरचंदामध्ये पॅक्टिनदेखील असतं. ज्यामुळे अॅक्नेपासून तुम्ही दूर राहू शकता.

गाजर – Carrot
उत्कृष्ट एँटीएजिंग, सुरकुत्यांपासून दूर आणि विटामिनच्या उत्कृष्ट स्रोतासाठी गाजर आपल्या डाएटमध्ये सामावून घ्यायला हवं. यामध्ये बीटा कॅरोटिनचा स्तर अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे आपल्या शरीराला विटामिन ए च्या मात्रेमध्ये बदल करण्यास गाजर उपयुक्त ठरतं. स्वस्थ आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी विटामिन ए ची आपल्या शरीरारा आवश्यकता असते. त्यामुळे गाजर खाल्ल्याने तुमची त्वचा चांगली राहून तुम्ही अधिक तरूण दिसता.

ADVERTISEMENT

स्ट्रॉबेरी  – Strawberry

Anti Ageing
स्ट्रॉबेरी मॅश करून त्यामध्ये मध, अॅव्होकॅडो आणि दही मिसळून त्वचेवर लावा. त्वचेचं सौंदर्य वाढण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड असल्यामुळे नैसर्गिक स्वरुपात व्हाईटनिंग स्वरुपात हे मिश्रण काम करते.

किवी – Kiwi

किवी हे असं फळ आहे हवं तर तुम्ही खाऊही शकता आणि हवं तर तुमच्या त्वचेला अर्थात चेहऱ्याला लावूदेखील शकता. उत्तम, चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही किवीचा उपयोग करू शकता. यामध्ये पॅक्टिन आणि फायबरचा योग्य मेळ असतो. त्यामुळे पचनतंत्र मजबूत होते. शिवाय सुरकुत्या काढून टाकण्यास आणि ब्लेमिशेजपासूनदेखील किवी वाचवते.

ADVERTISEMENT

पपई आणि पीच – Papaya
पपई नैसर्गिक स्वरूपात एक्सफॉलिएशनचं काम करते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही डाग राहत नाही आणि यामध्ये असणाऱ्या विटामिन ए मुळे त्वचा तजेलदार राहते. तर पीचमध्ये कोमलता असल्यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेला कोमलता देण्याचं काम पीच करतं. तुम्ही जर तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये पीचचा वापर केलात तर तुम्हाला मॉईस्चरायझर क्रिमची आवश्यकता भासणार नाही.

आवळा – Amla

Amla benefits for hair
विटामिन ए चे उत्कृष्ट स्रोत म्हणजे आवळा आहे. हे विटामिन कॅलरीजच्या निर्माणाकरिता आवश्यक फळ आहे. यामुळे त्वचा तरूण राहतेच पण त्याशिवाय त्वचेला उत्कृष्ट बनवण्यास आवळ्याची खूप मदत होते. तुम्ही जर उपाशी पोटी आवळा खाल्ला तर त्याचा गुण चांगला येतो. तुमच्या शरीरारासाठी आवळा हे अत्यंत गुणकारी आहे. तुमची त्वचादेखील आवळा खाल्ल्यामुळे चांगली राहते.

हेदेखील वाचा 

ADVERTISEMENT

त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया

त्वचा आणि सौंदर्यजतनासाठी बाबा रामदेव यांचे पतंजलि प्रोडक्ट्स

म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या या मागील कारणे आणि उपाय

01 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT