ADVERTISEMENT
home / पालकत्व
lord-hanuman-names-for-baby-in-marathi

भीमरुपी महारुद्रा… मुलांसाठी खास हनुमानाची नावे | Lord Hanuman Name For Baby Boys In Marathi

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना…. आकाशात तेजस्वी सूर्याचा गोळा ज्याला चेंडूप्रमाणे भासला म्हणून ज्याने आकाशात थेट झेप घेऊन तो सूर्याचा गोळा हातात पकडण्यासाठी जे बाळ धावले ते बाळ म्हणजे मारुती, हनुमान… लाडक्या हनुमानाच्या पराक्रमाचे किस्से ऐकावे तेवढे कमी आहेत. ज्याने आपल्या शेपटीने लंका जाळली आणि माता सीतेचे प्राण वाचवले अशा हनुमानाप्रमाणे आपले बाळ ताकदवाद, बलवान आणि कोणालाही न घाबरता संकटांना सामोरे जाणारे पण तितकेच संस्कारी असे आपले बाळ असावे असे प्रत्येकाला वाटते. बुद्धी, शौर्य, मैत्री आणि प्रेम या सगळाचे प्रतिक म्हणजे बजरंगबली हनुमान. जसे भगवान शिवावरुन मुलांची नावे ठेवली जातात. स वरुन मुलांची नावेर वरुन मुलींची नावे अशी ठेवण्यात येतात. आज आपण मुलांसाठी हनुमानाची बारा नावे जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया हनुमानाची नावे.

प्रचलित अशी हनुमानाची बारा नावे – Famous Hanuman Names In Marathi

हनुमानाची बारा नावे - Famous Hanuman Names In Marathi
प्रचलित अशी हनुमानाची बारा नावे

खूप भीती वाटत असेल. मनावर कशाचे तरी दडपण आले असेल तर अशावेळी खूप जण मनातील भीती जाण्यसाठी प्रचलित अशी हनुमानाची बारा नावे तुम्हाला माहीत असायला हवीत. अशी हनुमानाची बारा नावे देखील तुम्हाला तुमच्या मुलांसाठी ठेवता येईल.

हनुमानाची नावेनावांचे अर्थ
हनुमानमारुतीचे एक नाव
 अंजनीसुतहनुमानाच्या आईचे अंजनी होते. त्यावरुन त्याला अंजनी सूत म्हणजे अंजनीचा मुलगा यावरुन नाव देण्यात आले.
वायूपुत्रहनुमानाकडे आकाशात विहार करण्याची ताकद होती. अगदी लहानपणीच तो सूर्याकडे झेपावला होता. त्याच्या अंगातील ही गती त्याला पवनदेवाच्या कृपेमुळे आहे. त्यांचा आशीर्वाद देखील त्याला आहो म्हणून  हनुमानाला वायूपुत्र म्हणून देखील ओळखले जाते
महाबलज्याच्या अंगात महाबळ आहे असा. रावणाच्या सोन्याच्या लंकेला एकटा पुरुन उरलेला असा हनुमान आपल्याला माहीत आहे. त्याच्या अंगात असलेले प्रंचड बल हे आपण सगळेच जाणतो.
 रामेष्ठहनुमान हा रामभक्त होता. त्याच्यासाठी रामाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ होती. त्यामुळे त्या नावावरुन रामेष्ठ नाव ठेवलेले आहे.
 फाल्गुनसखा-अर्जुनाचा मित्र
 पिंगाक्षलाल डोळ्यांचा. हनुमान जितके शांत तितकेच ते चुकीच्या विरोधात क्रोधित असे होते. त्यामुळे त्याचे डोळे लाल होते. 
अमितविक्रमवीरतेची साक्षात मूर्ती असलेला. हनुमानाच्या वीरतेच्या अनेक कथा आहेत.
उदधिक्रमणसमुद्र लांघणारा. सीतेचे प्राण वाचवण्यासाठी समुद्र पार करुन गेलेल्या हनुमानाची साहसकथा आपण अनेकांनी ऐकली असेल त्यावरुन पडलेले हे नाव.
सीताशोकविनाशनमाता सीतेच्या शोकाचे नाश करणारा, सीताहरण झाल्यानंतर रावणाच्या तावडीत असलेल्या सीतेला वाचवण्यासाठी रावणाची लंका जाळणारा असा 
लक्ष्मणप्राणदातालक्ष्मणाचे प्राण वाचवणारा, लक्ष्मणासाठी संपूर्ण मेरु पर्वत उचलून हनुमानांनी आणला त्यामुळेच लक्ष्मणाचे प्राण वाचले. 
दशग्रीहवणाशी दोन हात केलेला, रावणाची घमेंड तोडणारा
Famous Hanuman Names In Marathi

पौराणिक अशी हनुमानाची नावे – Pauranik Names Of Hanuman In Marathi

पौराणिक अशी हनुमानाची नावे

पुराणात हनुमानाची बरीच अशी नावे आहेत. मुलांसाठी तुम्हाला हनुमानाची पौराणिक अशी नावे ठेवायची असतील तर तुम्ही ही नावे देखील ठेवू शकता. याशिवाय बाळकृष्णाची नावे देखील मुलांना ठेवू शकतात.

हनुमानाची नावे नावांचे अर्थ
मारुतीमारुत म्हणजे वारा किंवा पवन.. हनुमानाला पवनपुत्र म्हणतात त्यावरुन आलेले नाव. या शिवाय हनुमानाचे लहानपणीचे नाव म्हणजे मूळ नाव म्हणून मारुतीचेच नाव आहे.
बजरंगबलीज्याच्या बाहुत बळ  आहे असा
पवनपुत्रवाऱ्याचा पूत्र ज्याला म्हणतात असा
रामभक्तहनुमान हे रामभक्त होते त्यावरुन हे नाव
 पवनसुतज्याच्यावर पवनाची कृपा आहे असा.त्याचा पूत्र म्हणून ज्याला ओळख मिळाली असा. 
केसरीनंदनभगवान केसरी यांचे पूत्र
मणासुंदर
राजाबक्षा नागपुरातील मारुतीचे एक नाव
 मारोतीमारुतीचा अपभ्रंक्ष होऊन तयार झालेले नाव
शेंदूरलाल शेंदूर माथी लावलेला
ज्ञानसागर हनुमानाची ओळख ज्ञानसागर अशी देखील केली जाते. कारण त्याच्याकडे ज्ञानाचा साठा होता. 
कपिसेनायककपि म्हणजे वानर. वानरांची सेना चालवणारा आणि त्यांना मार्गदर्शन करणारा असा 
Pauranik Names Of Hanuman In Marathi

बाळासाठी हनुमानाची लेटेस्ट नावे (Latest Hanuman Names For Baby In Marathi)

Latest Hanuman Names For Baby In Marathi
बाळासाठी हनुमानाची लेटेस्ट नावे

तुमच्या लाडक्या बाळासाठी लेटेस्ट नावे ठेवायची असतील तर तुम्ही  लेटेस्ट नावं ठेवायचा विचार करत असाल तर तुम्ही हनुमानाची काही लेटेस्ट नावे देखील ठेवू शकता. बाप्पावरुन मुलांची नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर अशी नावे देखील ठेवू शकता.

ADVERTISEMENT
हनुमानाची नावेनावांचे अर्थ
अंजनायामाता अंजनीचा पूत्र
चिरंजीवीअमर अशी व्यक्ती
 मनोजव्यहवेसारखा गतिमान
 दीनबंधावेअत्याचारापासून लोकांना वाचवणारा
योगमिनचांगला प्रवक्ता
 वज्रनाखा मजबूत असा
कलानभाकाळाचा संयोजक
सर्वोगहारासर्व आजारांपासून मुक्त
मारुत्मजाज्याची आकाशातून पूजा केली जाते
कपेश्वरमाकडांचा परमेश्वर. हनुमानाचा चेहरा इतर देवांसारखा नाही तर तो वानरांसारखा आहे. वानरांचा राजा किंवा त्यांचे सर्वकाही  अशी त्यांची एक ओळख आहे. 
संजयतुमच्या मुलाचे नाव स वरुन ठेवायचे असेल आणि ते हनुमानावरुन ठेवायचे असेल तर संजय याचा अर्थ जिंकणारा असा होतो.
कामरुपिणहनुमान इच्छेनुसार रुप धारण करु शकत होते. त्यावरुनच त्यांचे नाव कामरुपिण असे पडले. जे रुप घ्यायचे ती इच्छा मनीशी बाळगली की, ते रुप बदलू शकत होते. 
बाळासाठी हनुमानाची नावे

हनुमानाची आधुनिक नावे मुलांसाठी (New Hanuman Names For Baby In Marathi)

बाळासाठी हनुमानाची नावे
बाळासाठी हनुमानाची नावे

 खूप जणांना आधुनिक नावे ठेवायला खूप आवडतात.  मुलाचे नाव हनुमानावरुन असावे पण ते आधुनिक असावे असे तुम्हाला वाटत असेल तर हनुमानाची आधुनिक नावे तुम्ही मुलांसाठी नक्की ठेवू शकता.

हनुमानाची नावेनावांचे अर्थ
 रीतमहनुमानासारखा पवित्र आणि सुंदर मनाचा. हनुमान हे खूपच निर्मळ अशा मनाचे होते.
रुद्रांक्षहनुमानाला भगवान शिवाचा अंश मानला जातो. 
शौर्य न घाबरणारा
अतुलितज्याची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही असा
महाध्युतजो तेजस्वी प्रकाशाने ओजस्वी दिसतो
 प्रभवेराजबिंडा, प्रसिद्ध आणि सुंदर असा
 शूरन घाबरणारा
 विजितेंद्रीयसगळ्या इंद्रावर नियंत्रित ठेवणारा
अजेशआयुष्य जगणारा
तेजसउज्वल, चमचमणारा 
बाळासाठी हनुमानाची नावे

आज आपण हनुमानाची बारा नावे त्यांचे अर्थ आणि हनुमानाची नावे इतर जाणून घेतली आहेत. आता तुमच्या मुलांची वेगळी नावं ठेवायची असतील तर तुम्ही ही काही नावे नक्की ठेवू शकता. 

15 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT