घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव ठेवण्यासाठी आणि त्याचे नक्की नाव काय ठेवायचे यासाठी एक चर्चा नक्कीच होते. बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पाच्या, विष्णूच्या नावावरून तर काही जणांकडे शंकरभक्त असल्यामुळे भगवान शिव वरून मुलांची नावे ठेवली जातात. भगवान शंकराची नावे अनेक आहेत. विशेषतः गणपतीची आणि शंकराची 108 नावे आपल्याकडे मराठी माणसांना माहीत असतात. महादेवाची नावे त्यांच्या अर्थासह अनेक बाळांची ठेवली जातात. बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला देवाची नावे तर हवीच असतात. गणेशाच्या नावावरून बाळांची नावे ठेवली जातात पण तेदेखील काही आधुनिक नावे अथवा रॉयल नावांचाही आपल्याला शोध असतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव भगवान शिव वरून ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी हा लेख नक्कीच उपयोगी ठरेल. जाणून घेऊया भगवान शिव वरून मुलांची नावे(lord shiva names for baby boy in marathi). तसंच श अक्षरावरून मुलांची नावं ठेवण्यासाठी इतर नावांचे पर्यायही वाचा.
Unique Lord Shiva Names For Baby Boy In Marathi
महादेवाचे अनेक भक्त आहेत. विशेषतः भारतातील उत्तर भागांमध्ये शिवाची अनेक मंदिरेही आहेत आणि तिथे शिवभक्तही अधिक आहेत. अनेक ठिकाणी भगवान शिव वरून मुलांची नावे ठेवण्यात येतात. आपल्याकडेही खूपच नावे आहेत. त्यापैकी काही युनिक नावे अर्थासह जाणून घेऊया.
नावे | अर्थ |
शिव | महादेवाचे नाव, भाग्यशाली, शुभ, नेहमी शुद्ध असणारा, दैवी, सर्व सामावून घेणारा |
आदिनाथ | सर्वोच्च स्वामी |
अनघ | निष्कलंक |
भैरव | भीतीचा नाश करणारा असा |
जतीन | ज्याच्या केसांचा गुंता झालेला आहे असा |
कैलास | शांती प्रदान करणारा |
स्कंद | वेदांचा प्रकाशक |
वरद | वर देणारा |
आशुतोष | नियमित आनंदी असणारा |
अचिंत्य | आकलना पलिकडील असणारा |
अजा | चिरंतन असा |
अमरेश | देवांचा देव |
औगध | अशी व्यक्ती जो जीवनात प्रत्येक क्षणात आनंद घेतो |
ध्रुव | अढळ, तारा |
देवेश | देवांचा देव, देवाच्या राजाने केलेली स्तुती |
मृत्युंजय | मृत्यूवर विजय मिळवणारा देव |
ओमकार | ओम हा अदिम ध्वनी आहे, पृथ्वीची निर्मिती करणारा |
परम | सर्वोच्च, जो परमार्थ आहे असा |
प्रणव | ज्याने व्युत्पत्ती केली असा |
पुष्कर | निळ्या रंगाचे पोषण करणारा, कमळाप्रमाणे |
सर्वशिवा | अत्यंत सुंदर |
शिवम | शिवाचे नाव, महादेव |
शंभू | आनंदाचा स्रोत |
शूलिन | त्रिशूळ चालवतो तो |
अर्ह | भगवान शिव, पूजा |
अरिहंत | शत्रूचा नाश करणारा |
भूदेव | पृथ्वीचा देव, निर्माता |
दक्षेश | दक्षांचा देव, शिवाचे एक प्रतीक |
धन्वीन | भगवान शिव, संपत्ती असणारा |
दुर्जय | जिंकण्यास कठीण, अबाधित |
ईशान | भगवान शिव, सूर्य, शासक, समृद्धीस कारणीभूत |
गिरीक | डोंगराचा रहिवासी, नागांच्या सरदाराचे नाव |
हिमानिश | पार्वतीचा पती, भगवान शिव |
जपेश | जपाचा धनी |
कशिश | वाराणसीचा राजा, काशीचा राजा |
केदार | एक राग, हिमालयाचे टोक, कुरण |
क्रिवी | भगवान शिवाचे एक नाव |
माधवन | महादेव |
मदेश | नशेची देवता |
मृगस्य | शिव, मकर राशीचे चिन्ह |
वाचा – K Varun Mulanchi Nave Marathi
बऱ्याचदा भगवान शिवाचे नाव ठेवताना अनेक जुनी नावे आहेत असंही वाटतं. पण त्यातही तुम्हाला रॉयल नावे हवी असतील तर त्यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतो. भगवान शिव वरून मुलांची नावे तुम्ही रॉयलदेखील ठेऊ शकता.
नावे | अर्थ |
प्रांशूळ | भगवान शिवाचे नाव, त्रिशूळातील प्राण |
रूद्र | भीतीदायक, महाकाय, भयंकर, वादळाचा देव |
रूद्रेश | रूद्राचा अंश |
रूद्राक्ष | भगवान शिवाचे डोळे, रूद्राप्रमाणे डोळे |
राणेश | युद्धात जिंकणारा देव |
शिवराज | नाश करणारा |
सिद्धांत | शिवाचा अंश |
सोपान | पायऱ्या, शिव |
त्रिजल | शिवाचे नाव |
उदिष | उड्डाणांचा देव, शिवाच्या मंत्राचा समावेश असणारा |
उमेश | उमाचा पती |
वर्धन | आशिर्वाद, भगवान शिव, समृद्धी, संपत्तीत वाढ |
वृषांक | कोणतेही पाप न केलेला, शिवाचे नाव |
यजत | पवित्र, शिवाप्रमाणे शुद्ध, प्रतिष्ठित, शिवाचे दुसरे नाव |
व्योम | आकाशाचा देव, शिव, महादेवाचे नाव |
व्रतेश | धार्मिक तपस्येचा परमेश्वर, शिवाचे नाव |
विलोहित | गडद लाल, अग्निचे आणि भगवान शिवाचे नाव |
विधातृ | निर्माता, सृष्टी निर्माण करणारा, शिव |
ईश्वर | देवांचा देव |
शशांक | भगवान शिव, शिवाचा अंश |
ऋतूध्वज | सर्व ऋतूंमध्ये राहू शकणारा |
अभिरू | भगवान शिवाचे नाव, आदिस्वरूप |
त्रिचक्षु | तीन डोळे असणारा |
तरस्वी | तपस्वी |
सोम | भगवान शिव, शंकाराचे नाव |
हिरण्य | महादेवाच्या नावांपैकी एक |
आदीह | पहिला, सर्वप्रथम |
आद्य | पहिला, देवांमधील पहिला |
असत | कारण, शिवाचे नाव |
अत्रिह | मंगळ, महादेवाचे नाव |
अव्यग्रह | तिसरा डोळा असणारा, अत्यंत केंद्रीत व्यक्ती, ज्याचे लक्ष विचलित होत नाही असा |
पिनाकी | शस्त्राने सज्ज असणारा, धनुष्याने सज्ज आहे असा |
अभिराम | योगी, भगवान शिव |
अक्षत | ज्याला चिरडणे अथवा तोडणे शक्य नाही असा |
अमृतजीत | अमृत जिंकून आणणारा |
अनिरूद्ध | न थांबणारा |
भव्य | धिप्पाड, भयानक, मोठा, शिवाचे नाव |
देवार्षिश | देवाचा आशिर्वाद, महादेव |
दुर्वास | कठीण ठिकाणी वास्तव्यास असणारा |
इदाय | कौतुकास्पद, शिव |
वाचा – Nag Panchami Information In Marathi
आधुनिक नावदेखील पाहिजे आणि त्यामध्ये आपण भक्ती करत असणाऱ्या भगवान शंकाराच्या नावाचा अर्थही असायला हवा असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशीचा काही आधुनिक नावे खास तुमच्यासाठी. स वरून मुलांची नावे आम्ही आधीच दिली आहेत. तुम्ही त्याचा पण वापर करू शकता.
नावे | अर्थ |
कौशिक | प्रेम आणि आपुलकीची भावना |
निरांजन | निष्कलंक, शुद्ध, महादेव |
प्रियदर्शन | ज्याचे दर्शन झाल्यावर आनंद मिळतो. आवडता |
व्योमकेश | आकाशाइतके केस असणारा, मोठे केस |
अनुराज | तल्लख, भक्त, शिवाचा भक्त |
हार्दिक | मनापासून, महादेवाचे नाव |
कौस्तव | एक रत्न, भगवान शिव |
नंदिश | ज्याचे वाहन नंदी आहे अशा, नंदीचा ईश्वर, शिव |
ओजस | तकाकी, तेज, चमक, अलौकिक बुद्धिमत्ता |
निर्भय | शूर, कोणतीही भीती नसणारा |
निलय | शिवाचे नाव, स्वर्ग, घर |
सात्विक | शुद्ध, शुद्धता, शिव |
सर्विन | प्रेमाची देवता |
संभव | जन्म देणारा, प्रकट होणारा |
सार्थक | यशस्वी, महादेवाचे नाव |
शिवांश | शिवाचा अंश, शिवाचा भाग |
साकेत | स्वर्ग |
युवान | शंकराचे नाव, तरूण, शिव |
प्रज्ञान | सर्वोच्च बुद्धिमत्ता असणारा |
इनाह | राजा, राज्य करणारा |
ओम | निर्माता, आयुष्याचा गंध, शिव |
आदिक | शिवाचे नाव, सुरूवात |
आदित | भगवान शिव, महादेव, सुरूवात, आद्य |
आरव | शांत, शांतता, नीरव |
अयुर | शिवाचे नाव |
भाव | भावना, शिव, महादेव |
जती | तपस्वी, शिव, शंकराचे रूप |
नील | निळा रंग, विष प्राशन केलेला, शिवशंकर |
सांज | संध्याकाळच्या रंगाप्रमाणे असणारा, शंकर, महादेव, शिव |
तोष | मजबूत असणारा सैनिक, लढवय्या |
अभव | शूर, भयभीत न होणारा |
आदिश | आगीचा देव, देवांचा देव, सुरूवात करणारा |
अद्विक | वेगळा, सर्वांपेक्षा वेगळा, सर्वात वरचढ |
अज्ञेय | कोणालाही न कळणारा, शिव |
अर्नाज | इच्छा, भगवान शिवाचे नाव |
आस्विक | महादेवाचे नाव, शिवाचा भाग |
अविश | राजा, आयुष्य देणारा, शिव |
सियान | शिवाचा भाग, शिव |
दक्षित | शिव भगवान, महादेव, दक्षांमध्ये असणारा |
गतिक | अत्यंत वेगवान, शिव, पुढे जाणारा, पुरोगामी |
घरात बाळ झाल्यानंतर अनेकांना जुनी नावे ठेवावी असं वाटत नाही. त्यांना नावात देवाचा अंश तर हवा असतो पण नावे मात्र नवी हवी असतात. त्याच त्याच नावांचा कंटाळा येतो. त्यामुळे भगवान शिव वरून मुलांची काही नवी नावे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.
नावे | अर्थ |
हितेज | शिव, महादेवाचे नाव |
इयान | देवाकडून भेट मिळालेला, शिव भगवान |
महत | महान, शिवाप्रमाणे मोठा |
ओमिश | शिवाचा महान भक्त, शिवभक्त |
रियान | राज्य करणारा, शिव |
रूध्व | शिवाचे नाव, महाकाय |
रूदिक | शिवाचा विचार, सतत शिवाचा विचार करणे |
साहू | शिवाचे नाव, महादेव |
साम्य | समान, शिव, महादेवाचे नाव |
शैव | शिवाचा भक्त, शिवाचा अंश, शिवाचा शिष्य |
सोहन | सुंदर दिसणारा, शिवमुखी, शिवासारखा |
श्रिष | भगवान शिव, देव |
सुहील | भगवान शिवाचे एक नाव |
सुवीर | वीर, विरासह, शिव |
वनिज | भगवान शिवाचे एक नाव, वनात वास्तव्य करणारा |
विराट | भव्य, महाकाय, शिवाचे एक रूप |
वृष | शिवाचा अंश, शिवाचे एक नाव |
योगित | सर्व काही जमवून आणणारा, सृष्टीचा निर्माता, शिवशंकर |
आदियन | भक्त, शिवभक्त |
अहिजित | सर्पकार, सर्पांसह राहणारा, शिव |
अक्षिव | भगवान शिवाचे एक नाव, शिवाचा अंश |
अनिकित | छापलेला, मनात राज्य करणारा |
अर्शिव | महादेवाचे नाव, शिव |
भार्गव | अग्नी, शिवाचे एक नाव |
भाविष | शिवाचे नाव, पृथ्वीचा भाग |
भवय | शंकराशी संबंधित असा, शंकाराचा भक्त |
धितीक | हुशार, विचार करणारा, शंकराप्रमाणे असणारा |
द्रुहान | शिवाचे गुण अंगी असणारा |
इथ्विक | भगवान शिव, महादेवाचे नाव |
हरय | शिवाशी संबंधित, शिवाशी जोडला गेलेला |
हेत्विक | शिवभक्त, शिवाशी संबंधित |
इशांक | शिवाचा अंश, सूर्य |
इशांत | लहान बाळ, अत्यंत सुंदर, लोभसवाणे, शिवाचे नाव |
इव्यान | देवाची कृपा, शिवाची कृपा |
कैरव | हिमालयाच्या टोकावर राहणारा, हिमालयाचे टोक |
कार्तिक | अत्यंत मजबूत असणारा, शिवाचा अंश, शिवाच्या मुलाचे नाव |
कियांश | शिवाचे आधुनिक नाव, शिवाचा अत्यंत लहान अंश |
महंत | ज्ञान, महान, शिवाचे नाव |
मल्हार | शिवाचा अवतार, विजेता, खंडेराया |
निशिव | शिवाचा भाग, शिवाचा लहानसा अंश |