ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Malaika Arora Arjun Kapoor planning to get married this year in Marathi

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या बॉलीवूडचं सर्वात जास्त चर्चेत असलेलं कपल आहे. कैतरीना- विक्की, आलिया – रणबीरच्या लग्नानंतर आता चाहत्यांना अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायका आणि अर्जुन यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. मलायका आणि अर्जुनला एकमेकांच्या प्रेमात पडून आता चार वर्ष झाली आहेत. सर्वांसमोर त्यांनी याची जाहीर कबुली सुद्धा दिली आहे. त्यामुळे सहाजिकच आता त्या दोघांना लग्न करून एकमेकांसोबत संसार करायचा आहे. 2022 वर्षाच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाचा बार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कसा असेल लग्नाचा थाटमाट

मलायका आणि अर्जुनने एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा विचार पक्का केला आहे. म्हणूनच येत्या नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये ते लग्न करण्याचा घाट घालणार आहेत. मात्र जास्त गाजावाजा न करता अगदी साधेपणाने हे लग्न होण्याची शक्यता आहे. विक्की- कतरिना आणि रणबीर- आलियाप्रमाणेच हे लग्नही सिक्रेट पद्धतीने केलं जाणार आहे. लग्नाच्या चर्चा सुरु होताच अर्जुनने त्याच्या इन्स्टा पोस्टमधून याबाबत हिंटसुद्धा दिली आहे. त्यामुळे आता या चर्चेला आणखी उधाण येण्याची शक्यता आहे. 

मलायकाला हवंय साधं लग्न

अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यावर आता मलायका दुसऱ्यांदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. म्हणून कदाचित तिला लग्नाचा गाजावाजा करायचा नाही. दोघांनाही भव्य दिव्य म्हणजे आलिशान लग्नाचा थाटमाट करण्याची इच्छा नाही. त्यामुळे साधेपणाने म्हणजेच रजिस्टर मॅरेज करून मित्रमंडळी आणि जवळच्या नातेवाईकांना फक्त ग्रॅंड पार्टी दिली जाणार आहे. नातेवाईकांमध्ये कपूर घरातील सर्व नातेवाईक आणि मलायकाकडून तिचे आईवडील आणि बहिणीचं कुटुंब लग्नात आमंत्रित असेल. मित्रमंडळींमध्ये करिना कपूर आणि करिश्मा कपूरला मात्र अगत्याचं आमंत्रण असेल. कारण करिना आणि करिश्मासोबत त्या दोघांची घनिष्ठ मैत्री आहे. मलायकाला तिच्या लग्नाच्या पेहरावावरही विशेष खर्च करायचा नाही. त्यामुळे वधू वरांचे कपडे फार महागडे नसतील. रजिस्टर लग्नासाठी तर मलायका साडी आणि अर्जुन कुर्ता घालण्याची शक्यता आहे. पार्टीसाठी मात्र दोघंही वेस्टर्न आऊटफिटची निवड करणार आहेत अशी चर्चा आहे. थोडक्यात दोघांनी लग्नाचा विचार केला असून कपूर आणि अरोरा कुटुंबात लगीन घाईला सुरूवात झालेली आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
18 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT