ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
संकटकाळात मराठी सेलेब्सही देत आहेत मदतीचा हात

संकटकाळात मराठी सेलेब्सही देत आहेत मदतीचा हात

एकीकडे कोरोनासाठी बॉलीवूड सेलेब्सच्या कोट्यवधी रूपयांची मदत केल्याच्या बातम्या येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही मराठी सेलेब्स आपापल्या परीने या संकटकाळात मदतीचा हातभार लावत आहेत. देशव्यापी लॉकडाऊन आधीच महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले होते. या लॉकडाऊनमुळे अनेक रोजंदारी करणारे कामगार आणि समाजातील आर्थिकरित्या हलाखीत जगणाऱ्या लोकांचं काय हा प्रश्न उभा राहिला. तसंच या संकटामुळे राज्यातल्या अर्थकारणावरही भार पडलाय.

मराठी सेलेब्सने केली मदत आणि लोकांनाही केलं आवाहन

मराठी सेलिब्रिटीजचे भरपूर फॅनफोलोइंग सोशल मीडियावर आहे. याचाच वापर करत त्यांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. तसंच राज्यासाठी निधी उभारण्याबाबतही ते लोकांना सांगत आहेत. या सेलिब्रिटीजच्या पोस्ट्सवर फॅन्सही उत्तम प्रतिसाद देत आहेत. अगदी काही फॅन्सनी तर त्यांच्या मदतनिधीचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या ट्वीटर हँडलवर पुढील पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहीलं आहे की, ‘मी देवाचे आणि माझ्या आई-बाबांचे आभार मानते की, या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे, माणसं आहेत. पण ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. ती किती आहे यावर चर्चा होऊ नये म्हणून सांगत नाही.’

अभिनेत्री सई ताम्हणकरनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1.5 लाख रूपये दिले आहेत.

ADVERTISEMENT

तर अभिनेत्री दिपाली सय्यदनेही जीवनावश्यक वस्तूंसाठी 50 लाखांची मदत दिली आहे.

तसंच अभिनेता सुबोध भावेनेही कोरोनासाठी मुख्यंमत्री सहाय्यता निधीला कशी रक्कम देता येईल, यासाठीची सर्व माहिती त्याच्या ट्वीटरवर शेअर केली आहे.

Lockdown च्या काळातील अनोखी लॉकआऊट कोरोना स्पर्धा

खूप मोठ्या प्रमाणात क्रिडा, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तीमत्व पुढाकार घेत कोरोनाविरूद्धच्या लढाईत राज्याला आणि देशाला मदत देऊ करत आहेत. बॉलीवूडमध्ये अक्षय कुमार, सलमान खान, वरूण धवन आणि शाहरूख यासारख्या अनेक सेलेब्सनी आर्थिक मदत दिली आहे. तर आता याच चांगल्या कार्यात मराठी सेलिब्रिटीही पुढे येऊन मदत देत आहेत. तुम्हीही कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात कलाकारांप्रमाणे मदत निधीत योगदान देऊ शकता.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या सावटातही सेलिब्रिटीजचं जोरदार गुढीपाडवा सेलिब्रेशन

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

30 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT