ADVERTISEMENT
home / Family
marriage-anniversary-wishes-in-marathi

Happy Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लग्नवाढदिवस हा प्रत्येक जोडप्यांसाठी खास असतो. तसंच दरवर्षी येणारा लग्नाचा वाढदिवस सुद्धा खास असतो. त्यामुळे लग्नवाढिवसाच्या शुभेच्छा (marriage anniversary wishes in marathi), पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (anniversary wishes for husband in marathi), लग्नवाढदिवसाचे मेसेजेस (anniversary msg in marathi) मित्रमंडळीकडून, लग्नवाढदिवसासाठी कोट्स (anniversary quotes in marathi) शोधणे, लग्नवाढदिवस लक्षात ठेवून लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोसाठी (anniversary wishes for wife in marathi) शोधणे, लग्नवाढदिवसासाठी स्टेटस (anniversary status in marathi) ठेवणे आणि लग्नवाढदिवस शुभेच्छा मुलीकडून आईबाबांना (aai baba anniversary wishes in marathi) किंवा इतरांनी देणे हे आलंच. यासाठीच या लेखात खास लग्नवाढदिवस शुभेच्छाचं संकलन केलं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल.

Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes In Marathi
Wedding Anniversary Wishes In Marathi

आपल्यापैकी प्रत्येकाचे एक ना एक तरी आवडतं जोडपे असतंच. त्यांच्या लग्नाच्या तयारीपासून जसं लग्नाचे मराठी उखाणे ते त्यांचा लग्नाचा वाढदिवस हा त्यांच्याप्रमाणेच आपल्यासाठी खास असतो. मग त्यांना marriage anniversary wishes in marathi, happy anniversary wishes in marathi देणं हे आलंच. 

  1. तुमची जोडी राहो अशी सदा कायम
    जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
    प्रत्येक दिवस असावा खास
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  2. जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
    जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
    तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
    हीच आहे सदिच्छा वारंवार 
  3. देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
    तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
    असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
    जसा प्रत्येक दिवस असो सण खास 
  4. सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
    जन्मभर राहो असंच कायम,
    कोणाचीही लागो ना त्याला नजर,
    दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 
  5. जशी बागेत दिसतात फूल छान
    तशीच दिसते तुमची जोडी छान
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  6. नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
    दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  7. दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
    आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  8. सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
    एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
    नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
    लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
  9. आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  10. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता 
    Made for each other वाटता
    तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
    हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी.

वाचा – नवरदेवाचे विनोदी उखाणे

Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes For Husband In Marathi
Anniversary Wishes For Husband In Marathi

प्रिय पत्नी जी आपलं घर सोडून नवऱ्यासाठी सासरी येते. तिच्यासाठी या नात्याला सुरूवात झालेला लग्नाचा दिवस हा अविस्मरणीय असतो. तुम्हीही द्या आपल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (anniversary wishes in marathi for husband).

ADVERTISEMENT
  1. आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
    आपल्या दोघांची साथ कायम राहो.
    आयुष्यातील संकटाशी लढताना
    आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  2. दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
    हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
    हॅपी अॅनिव्हर्सरी.
  3. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
    लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
    आनंदाने नांदो संसार आपला,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  4. एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
    धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
  5. इतक्या वर्षानंतरही…
    आजही माझ्या आयुष्यातील
    सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
     लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  6. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
    आज आणि नेहमीच
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  7. लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
    पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  8. I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
    जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
    जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
    तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
    हॅपी अॅनिव्हर्सरी
  9. कसे गेले वर्ष कळलंच नाही.
    लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
    हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  10. पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
    आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
    जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
    सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
    आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Beautiful Marriage Quotes In Marathi

Marriage Anniversary Msg In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Anniversary Msg In Marathi
Marriage Anniversary Msg In Marathi

लग्नाची व्याख्या ज्याला उमजली तो खरा साथीदार. लग्नाबाबत असंच उलगडून सांगणारे काही लग्न वाढदिवसासाठी मेसेजेस.

  1. प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
    पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  2. ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
    तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  3. माझा नवरा, माझा पार्टनर,
    माझा बाॅयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
    खूप खूप शुभेच्छा. हॅपी एनिवर्सरी हबी.
  4. आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
    तू जे मागशील ते तुला मिळो,
    प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण
    हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह.
  5. आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस
    कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
    हीच माझी आहे इच्छा खास. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.
  6. हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
    महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग.
  7. प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
    आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
    तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  8. आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.
    ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण,
    जे आपण एकमेकांसोबत घालवले,
    कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी.
  9. एनिवर्सरी जाईल-येईल, पण आपल्या आयुष्यात
    आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.
  10. आपण कितीही भांडलो, कितीही अबोला धरला
    तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marriage Anniversary Quotes In Marathi | लग्न वाढदिवसासाठी कोट्स

Marriage Anniversary Quotes In Marathi
Marriage Anniversary Quotes In Marathi

तुमच्या नातेवाईकांमधील किंवा ओळखींच्या कपल्सना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स.

  1. जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
    आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
    हीच प्रार्थना आहे देवाकडे
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  2. विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
    प्रेमाचा धाग हा सुटू नये
    वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
    फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
    एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
    हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
  4. घागरीपासून सागरापर्यंत
    प्रेमापासून विश्वासांपर्यंत
    आयुष्यभर राहो जोडी कायम
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  5. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
    विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
    प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
    तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
  6. या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
    हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
    ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
    थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल
  7. मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
    असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
    नजर न लागो कधी या प्रेमाला
    चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  8. देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
    प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
  9. तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आहेत खास 
  10. तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,
    आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
    हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो
    हीच मनी आहे एकमेव इच्छा.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi

पती जरी आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी तरी विसरत असेल पण जेव्हा त्याच्याकडून शुभेच्छा मिळतात तेव्हा त्या खास तर असणारच.

ADVERTISEMENT
  1. न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
    प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
    यालाच समजून घे माझी शायरी
    प्रेमपूर्ण हॅपी अॅनिव्हर्सरी बायको
  2. आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
    प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
    नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
    कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
    हॅपी अॅनिव्हर्सरी बायको
  3. माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
    ह्याला फक्त शायरी समजू नकोस
    माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे.
    हॅपी अॅनिव्हर्सरी प्रिये
  4. माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद
    आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची
    आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल
    चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस
  5. मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी
    आपण पहिल्यांदा भेटलो होतो
    लग्नदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
  6. तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करतो की,
    आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद
    आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
  7. तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
    ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
    आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
    तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  8. तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
    पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
    हॅपी अॅनिव्हर्सरी बायको.
  9. प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
    प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
    खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
    प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
    हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
  10. उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे
    नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
    डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ
    तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस. लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Wedding Anniversary Status In Marathi | लग्न वाढदिवसासाठी स्टेटस

Wedding Anniversary Status In Marathi
Wedding Anniversary Status In Marathi

तुमच्या जवळच्या जोडप्याच्या खास दिवशी तुम्हीही सोशल मीडियावर ठेवा हे स्टेटस.

  1. तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
    जे आयुष्यात आनंद भरतात.
    तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
    हॅपी अॅनिव्हर्सरी माय ब्रदर.
  2. ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी.
    तुमचं नातं गाठो आकाशाची उंची,
    येणारं आयुष्य असो सुखमय,
    घरात राहो आनंदाचा वास,
    सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  3. चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
    चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
    तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास.
  4. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
    प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,
    देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
    लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप.
  5. आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,
    तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी. लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
  6. साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
    तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
    हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
    आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
    हॅपी अॅनिव्हर्सरी स्वीट कपल.
  7. अतूट नातं हे लग्नाचं.. दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
    हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
    शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा.
  8. प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
    प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.
    प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
    लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो.
  9. तुम्ही दोघं दिसता सोबत छान,
    असंच एकमेकांवर प्रेम करा आणि
    आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा.
  10. प्रार्थना करते की, तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरही
    अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं.
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Aai Baba Anniversary Wishes In Marathi | आई बाबा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Aai Baba Anniversary Wishes In Marathi
Aai Baba Anniversary Wishes In Marathi

लग्नाचं नातं अजून पुढच्या पायरीवर नेणारी गोष्ट म्हणजे मुल जन्मणं. मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाला दिलेल्या या काही मनाला स्पर्श करणाऱ्या शुभेच्छा.

  1. मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा
    आम्ही माणसं…. माणसं बनतो ती नात्यांनी,
    आज मी माझ्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
    कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं
    तर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
    तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
    मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव
  2. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
    तुम्हाला भरभरून यश मिळो,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
    Wishing You a very Happy Wedding Anniversary !!
  3. प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
    प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
    आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.
  4. पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा
    त्यांची सोबत नसती तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला
    हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा.
  5. आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे
    तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे
    आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे
    तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
    लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.
  6. दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
    माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  7. समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
    एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
    हॅपी अॅनिव्हर्सरी आईबाबा.
  8. ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
    तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
    कधीही रागवू नका एकमेकांवर
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  9. तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
    देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
    दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
    दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव.
  10. सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
    जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
    कोणाची न लागो त्याला नजर,
    आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर.

25th Anniversary Wishes In Marathi | 25 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा

25th Anniversary Wishes In Marathi
25th Anniversary Wishes In Marathi

आपल्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस तर खास असतोच. पण त्यातही जर तो 25 वा वाढदिवस असेल तर ग्रँड सेलिब्रेशनसोबतच शुभेच्छाही तशाच सुंदर हव्या. तुम्हीही द्या आईबाबांना खालील शुभेच्छा.

  1. तुम्ही एकमेंकांच्या आयुष्य किती सुंदरतेने सावरलं आहे,
    लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा,
    कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे,
    लग्नाच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या खूप खूप शुभेच्छा.
  2. तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
    आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
    हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
    लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
    देव करो तुमच्यावर कोणी ना रूसो
    असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
    तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
    25 व्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा.
  4. मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी
    तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,,लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
    तुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय.
  5. तुमची जोडी सदैव राहो कायम
    हीच आहे आज देवाकडे मागणी
    हॅपी अॅनिव्हर्सरी
  6. हे नातं.. हा आनंद.. कायम राहा
    आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
    लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
    स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
    25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा
  7. फुलं जशी दिसतात सुंदर बागेत,
    तसंच तुम्ही दोघंही राहा सोबत,
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  8. प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
    देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
    आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
    हॅपी अॅनिव्हर्सरी
  9. आजच्या खास दिवशी आहे मनापासून आनंद
    कारण तुम्ही आमच्यासाठी आहात खास
    लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा
  10. जगात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो.
    त्यापैकीच तुमची जोडी, जी आज साजरी करतेय
    25 वी वेडिंग अॅनिव्हर्सरी.

50th Marriage Anniversary Wishes In Marathi | 50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा

50th Marriage Anniversary Wishes In Marathi
50th Marriage Anniversary Wishes In Marathi

लग्नाची गाडी 50 व्या वर्षांपर्यंत पोचणं ही खूप मोठी बाब आहे. मग 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच हव्या ना.

ADVERTISEMENT
  1. प्रत्येक समस्येवरील उत्तर आहात तुम्ही
    प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
    आम्हा मुलांच्या जीवनाचं सारं आहात तुम्ही
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा आईबाबा
  2. पृथ्वीवर आईवडीलच आहेत देवासमान
    ज्यांची साथ नसेल सगळं आहे विराण
    हॅपी 50th अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा
  3. आम्ही तुम्हाला पाहिलं आहे
    तुमचंच अनुकरण केलं आहे
    जीवनात आम्ही जे आहोत ते
    ते फक्त तुमच्यामुळे आहोत
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
  4. दिव्यासारखं प्रकाशमय असो तुमचं आयुष्य
    प्राण आणि श्वासासारखी जोडी असो तुमची
    असेच कायम राहा आमच्यासोबत
    हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा
  5. समुद्रापेक्षा खोल आहे तुमचं प्रेम
    हिमालयापेक्षा उंच आहे तुमचं प्रेम
    एकमेकांना असंच जपा
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
  6. विश्वासाचा दोर घट्ट राहो
    प्रेमाचं नातं अतूट राहो
    वर्षानुवर्ष ही जोडी कायम राहो
    लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीच्या शुभेच्छा
  7. चेहऱ्यावरचं हसू कायम असू द्या
    प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या
    एकमेंकावर कधीही रूसू नका
    50 वर्ष झाली आतातरी भांडू नका
    लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा आईबाबा
  8. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव कायम राहो
    देवाचा तुमच्यावर आशिर्वाद राहो
    कुटुंबाचा आधारस्तंभ आहात तुम्ही
    50 नंतर 100 वा लग्नाचा वाढदिवसही लवकर येवो
  9. सप्तपदीने बांधलेलं नातं, आयुष्यभर जपलेलं नातं
    कसा झाला तुमचा 50 वर्षांचा दीर्घ लग्नप्रवास
    हॅपी 50 वेडिंग ईयर्स टू मम्मी पप्पा
  10. विश्वासावर कायम आहे जग
    विश्वासावर कायम आहात तुम्ही
    असाच वाहू दे प्रेमाचा सागर
    हीच प्रार्थना आणि हीच शुभेच्छा
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Anniversary Caption In Marathi | लग्नवाढदिवसासाठी कॅप्शन्स

Anniversary Caption In Marathi
Anniversary Caption In Marathi

लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायच्या आहेत पण जास्त फापटपसारा नको असल्यास नक्की वाचा लग्नदिवसासाठी कॅप्शन्स.

  1. प्रत्येक लव्हस्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर
    पण माझी लव्हस्टोरी माझी फेव्हरेट आहे
    हॅपी अॅनिव्हर्सरी बायको
  2. ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याला बनवलं सुंदर
    त्या व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. आकाशातला चंद्र तुझ्या बाहूत असावा
    तू जे मागशील तुला मिळावी
    तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक स्वप्नं सत्य व्हावं
    नशिबाची प्रत्येक रेघ तुझ्या हातावर असावी
    हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह
  4. आयुष्य आहे थोडं दुःखदायी
    पण एकमेकांची साथ आहे
    लढवू किल्ला पूरेपूर
    जोपर्यंत एकमेकांची साथ आहे
    लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
  5. महत्त्व याला नाही की, आपलं एकमत आहे की नाही
    महत्त्व याला आहे की, आपल्यात प्रेम आहे की नाही
    लग्नाच्या वर्षपूर्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा
  6. आपलं घर आपल्याशिवाय अपूर्ण आहे
    आपल्या मुलांशिवाय कुटुंब अपूर्ण आहे
    तुझ्याशिवाय तर माझं आयुष्यच अपूर्ण आहे
    हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह
  7. आपण कितीही भांडलो, अबोला धरला
    पण आपल्यातलं प्रेम कायम आहे
    प्रिय प्रिये लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन
  8. जगणं काय आहे हे मला शिकवलंस तू
    शांत राहून ओठांना हसवलंस तू
    मी तर एकटाच निघालो होतो जीवनाच्या मार्गावर
    मला भेटून त्याला स्वर्ग बनवलंस तू
    लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
  9. नशीब आणि बायकोने कितीही त्रास दिला तरी
    तेच सोबत असतात आणि जगणं बदलतात
    माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद
  10. जीवनाच्या प्रत्येक पावलावर आनंदाने चालत जा.
    प्रत्येक बाजूला हास्य पसरत जा.
    जन्मोजन्मी हे नातं राहो कायम, प्रेमाचा सुगंधाने आयुष्य राहो असंच कायम.
    लग्न वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

Anniversary Wishes For Brother In Marathi | लग्नवाढदिवस शुभेच्छा भावासाठी

Anniversary Wishes For Brother In Marathi
Anniversary Wishes For Brother In Marathi

भावाचं स्थान आपल्या मनात कायम महत्त्वाचं असतं. लाडक्या भावाच्या लग्नासाठी नवरदेवाचे उखाणे शोधण्यापासून आपण तयारी केलेली असते. मग लाडक्या भावाच्या आणि वहिनीच्या लग्न वाढदिवसाला शुभेच्छा तर द्यायला हव्यात. खास लग्न वाढदिवस शुभेच्छा भावासाठी आणि वहिनीसाठी.

  1. तुमची जोडी कधी नये तुटू
    देव करो तुम्ही एकमेंकावर नका रूसू
    असेच एकत्र राहा आणि आयुष्याचा आनंद घ्या
    लग्न वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा दादा वहिनी
  2. फुलांसारखे सुंदर दिसता प्रेमाच्या बागेत
    दोघं छान दिसता एकमेकांच्या कवेत
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी
  3. तुम्ही एकमेकांच्या आयुष्याला सुंदर केलंत
    लग्नवाढदिवस धुमधडाक्यात करा
    कारण नात्याचं रूपांतर तुम्ही प्रेमात केलंत
    हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
  4. जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना आनंद द्या
    जिथे दुःख जाणवणार नाही असा सहवास द्या
    लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
  5. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
    आजच झाला होता हा सोहळा
    लगीनघाई करून दादाने आणलं
    वहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी
    लग्न वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी
  6. जीवनाच्या प्रत्येक वळणावर असेच सोबत राहा
    एकमेंकाना आनंद द्या आणि सुखी राहा
    लग्नवाढदिवसाचा सोहळा होवो वारंवार
    हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
  7. लग्नवाढदिवसाबद्दल तुम्हाला शुभेच्छा
    कारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी
    जे असतात सदैव सुखी Happy Anniversary
  8. देवाने जोडी बनवली आहे ही खास
    असं वाढत राहून प्रेमाचं हे झाड
    माझ्याकडून तुम्हा दोघांना
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  9. दिवा आणि वातीसारखं तुमचं नातं
    नातं हे असंच वृद्धींगत होत रहावं
    माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे
    लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन दादा वहिनी
  10. आला तो सुदिन पुनः एकदा,
    ज्या दिवशी तुम्ही घेतल्या शपथा,
    तुमचे आमच्या जीवनात एक वेगळे स्थान,
    तुम्हा दोघांना लग्नबंधनाच्या मनापासून शुभेच्छा.

Marriage Anniversary Shayari In Marathi | लग्नवाढदिवसासाठी शायरी

Marriage Anniversary Shayari In Marathi
Marriage Anniversary Shayari In Marathi

लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा शायरीतून देण्याची एक वेगळीच मजा आहे. म्हणून तुमच्यासाठी खास लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा शायरीच्या रूपात.

  1. देवाने वेळ काढून जेव्हा एक क्षण आला असेल
    तेव्हा तुम्हाला त्याने प्रेमाने बनवलं असेल
    न जाणो कोणती प्रार्थना पूर्ण झाली असेल
    जेव्हा त्याने आपल्याला एकत्र आणलं असेल
    हॅपी एनिव्हर्सरी माय स्वीट हार्ट
  2. देवाकडे आनंद मागते आहे
    प्रार्थनांमध्ये तुझं हास्य मागते आहे
    असं तर कोणतंही गिफ्ट महागडं वाटत नाही
    फक्त तुझ्याकडे आयुष्यभर प्रेम मागते आहे
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  3. आपल्या दोघांची जोडी देवाची कृपा आहे
    जिला आपण प्रेम आणि त्यागाने जपलं आहे
    कधी कमी न होवो हा प्रेमाचा ज्वर
    नेहमी कायम राहो हा प्रेमाचा बहर
    लग्नवाढदिवसाचे अभिनंदन
  4. चंद्र ताऱ्यांनी चमकत राहावं जीवन
    आनंदानी भरून जावो आपलं जीवन
    लग्नवाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा पार्टनर
  5. तुमची जोडी सलामत राहो
    आयुष्यात प्रेम वाढतच राहो
    प्रत्येक दिवस साजरा होवो सणासारखा
    तुमच्या लग्नवाढदिवसाला हीच आहे इच्छा
  6. कधी प्रेम कधी दुःख
    जीवनाचा हाच आहे नेम
    एकमेकांच्या प्रेमात राहा
    कारण आयुष्याचा नाही नेम
    आनंद, यश आणि खूप सुख मिळो
    प्रत्येक क्षण असाच खास होवो
    हॅपी अॅनिव्हर्सरी माझी आवडती जोडी
  7. उगवणारा सूर्य देवो तुम्हाला आशिर्वाद
    उमलणारं फुल देवो तुम्हाला सुगंध
    आम्ही तर काही देण्याच्या लायक नाही
    देव अनेक सुखं तुम्हाला देवो
    लग्नवाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा
  8. आयुष्याची बाग हिरवी राहो
    आयुष्यात प्रेमाची भरती येवो
    अशी जोडी राहो कायम आपली
    10 काय 100 वर्ष पूर्ण होवो
    लग्नवाढदिवस अभिनंदन सख्या
  9. आयुष्यात एकच इच्छा आहे
    सोबत तुझी असावी हीच ती आहे
    आयुष्य न संपो कधी आणि लग्नाचा वाढदिवस येवो दरवर्षी
  10. देवो करो आणि दरवर्षी येवो हा दिवस
    आपलं नातं नव्याने पुन्हा बहरवणारा हा दिवस
    असाच सुंगधित होवो वर्षातला प्रत्येक दिवस
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Funny Anniversary Wishes In Marathi | लग्नवाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

Funny Anniversary Wishes In Marathi
Funny Anniversary Wishes In Marathi

मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना अनेकदा तुम्ही अनेकदा लग्नविषयावरील अनेक विनोद ऐकले असतीलच ना. तशाच या काही लग्नवाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा. बुरा ना मानो बस एन्जॉय करो.

ADVERTISEMENT
  1. बायको – आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज मी चिकन बनवते,
    नवरा – चालेल. पण आपल्या चुकीची शिक्षा चिकनला का देत्येस?
  2. ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने, तुम्हाला मधुमेह झाला नाही,
    आपल्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो,
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. मी इतकी आनंदी आहे की,
    जन्मभर सतवण्यासाठी मला हक्काचा साथीदार मिळाला
    हॅप्पी अॅनिव्हर्सरी
  4. लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असते
    जिथे तुम्हाला युध्दासाठी सतत तयार राहावे लागते
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. तुमच्या दोघांची जोडीही देवाची देणगी आहे
    ती प्रेमाने आणि समर्पणाने तुम्ही जपली आहे
    कधी ना कमी होवो तुमच्यातील प्रेमाचा हा बहर,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे ट्रकभर.
  6. लग्नाचे दोन महत्वाचे नियम – बायको नेहमी बरोबरच असते
    जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चुकीची आहे
    तेव्हा स्वःताला मारा आणि पुन्हा पहिला नियम वाचा.
  7. तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप
    लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला मित्रा माझ्या खूप खास.
  8. तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी हीच आहे इच्छा,
    पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो मित्रा.
  9. लग्नाच्या प्रेमाची गाडी चालते चार पायांवर,
    दुचाकीची चारचाकी होणाच्या
    या दिवसाच्या तुला खूप शुभेच्छा माझ्या मित्रा.
  10. मैत्रिणी तुझ्या नवऱ्याची मीच आहे साली खास,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आणि जीजूंना शुभेच्छा एकदम खासमखास.
  11. सप्तपदी चालताना दिलीस मला साथ तशीच साथ
    आता महागाईच्या काळातही देशील ना राणी
    कारण मी तुझा राजा आणि तूच माझी राणी.

    Happy Anniversary Wishes In Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Anniversary Wishes For Husband In Marathi, Anniversary Wishes For Wife In Marathi, लग्नाचा वाढदिवस कविता, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Anniversary Quotes For Husband In Marathi, Anniversary Status For Husband In Marathi नक्की शेअर करा.

You Might Also Like

Marriage Quotes in English

Marathi Quotes On Love For Husband

22 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT