ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
mercury retrograde 2022

Mercury Retrograde-बुध झालाय वक्री, तुमच्या राशीवर काय परिणाम होणार

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला महत्त्वाचा ग्रह मानला जातो. या ग्रहाला राजपुत्राची उपाधी मिळाली आहे. म्हणजेच बुद्धाला ग्रहांचा राजकुमार म्हटले गेले आहे. पंचांगानुसार, बुध 10 मे रोजी संध्याकाळी 5:16 वाजता वृषभ राशीत वक्री झाला आहे आणि तो 3 जून 2022 रोजी पुढे मार्गक्रमण करेल. 2 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. बुध ग्रहाच्या प्रतिगामी प्रभावामुळे ज्यांच्या जन्मपत्रिकेत शुभ घरामध्ये गोचर होत आहे त्यांच्यासाठी याचे काहीसे अशुभ फळ मिळू शकते आहे, परंतु बुद्ध ज्यांच्या पत्रिकेत अशुभ घरामध्ये गोचर आहे त्यांना फारसे  परिणाम जाणवणार नाहीत. वाचा तुमच्या राशीला  Mercury Retrograde म्हणजे बुद्ध वक्री झाल्याने काय फळ मिळणार आहे. 

Mercury Retrograde
Mercury Retrograde

मेष

आर्थिकदृष्ट्या बरीच उलथापालथ होऊ शकते. तुमच्या भाषण कौशल्याच्या मदतीने तुम्ही विचित्र परिस्थितींवर सहज नियंत्रण ठेवू शकाल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण या काळात तुमचा अपमान करण्याची एकही संधी तुमचेच लोक सोडणार नाहीत. कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. 

वृषभ

ADVERTISEMENT

मानसिक अस्वस्थता होईल, परंतु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काम चांगले होईल. जर तुम्हाला कोणतेही मोठे काम सुरू करायचे असेल किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर त्या दृष्टीकोनातूनही हा काळ उत्तम आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. 

मिथुन

तुम्हाला जास्त धावपळ आणि खर्चाचा सामना करावा लागेल. वादविवाद, न्यायालयीन खटले टाळा. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क

ADVERTISEMENT

तुम्हाला अनेक अनपेक्षित फळे मिळतील, कामात काही अडथळे येतील, पण शेवटी निकाल तुमच्या बाजूनेच लागेल. उच्च अधिकार्‍यांशी संबंध बिघडू देऊ नका, कुटुंबातील वरिष्ठ आणि मोठे भाऊ यांच्याकडून सहकार्याचे योग आहेत. नवदाम्पत्यासाठी अपत्यप्राप्तीचे योगही आहेत.

सिंह 

तुमच्या काम-व्यवसायात सुस्ती येईल व तुमच्या उत्पन्नावर परिणाम होईल पण कुठेतरी आर्थिक प्रगतीही होईल. महागड्या वस्तू खरेदी कराल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. घर किंवा वाहन खरेदीचे योग.

कन्या

ADVERTISEMENT

तुमच्या मनात धर्म आणि अध्यात्माविषयी उदासीनता येऊ शकेल. तुमच्या साहस आणि पराक्रमाच्या मदतीने तुम्ही अशा परिस्थितीवर सहज नियंत्रण ठेवू शकता. परदेशी कंपन्यांमध्ये सेवा आणि नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

Mercury Retrograde
Mercury Retrograde

तूळ

आरोग्याबाबत विशेषत: औषधांच्या प्रतिक्रिया आणि पोटाशी संबंधित विकारांबाबत काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. न्यायालयीन प्रकरणे आपापसात सोडवणे शहाणपणाचे ठरेल. 

वृश्चिक

ADVERTISEMENT

लग्नाशी संबंधित सुरू असलेल्या चर्चेत थोडा अधिक विलंब होऊ शकतो. काम पूर्ण करताना अडथळे येऊ शकतात, पण निराश होऊ नका, शेवटी यश मिळेल. वैवाहिक जीवनात कटुता येऊ देऊ नका. 

धनु

गुप्त शत्रूंचा पराभव होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अधिक पैसे खर्च होतील, परंतु निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत जागरूक रहा. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता.

मकर

ADVERTISEMENT

तुमचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते, काळजी घ्या. शैक्षणिक स्पर्धेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. प्रेमविवाहाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे. कुटुंबातील वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

कुंभ

कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्वस्थता होऊ शकेल. नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता. सावधपणे प्रवास करा.  अनावश्यक वादांपासून दूर राहा. 

मीन

ADVERTISEMENT

अनेक अनपेक्षित फळे मिळतील. व्यवसायात प्रगती होईल, कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्या दृष्टीनेही ग्रह-संक्रमण अनुकूल राहील. परदेशी कंपन्यांमध्ये सेवा किंवा नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील.

टीप- हे राशीफळ ढोबळमानाने दिलेले आहे. तरी प्रत्येकाला मिळणारी फळे आपापल्या पत्रिकेतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ज्ञांची मदत घ्या. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
13 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT