ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Migraine Home Remedy In Marathi

मायग्रेनची लक्षणे व घरगुती उपाय (Migraine Symptoms In Marathi)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारिरक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे. सतत होणारी ही डोकेदुखी अचानक मायग्रेनचं (migraine) रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. यासाठी मायग्रेनच्या समस्या, मायग्रेनची लक्षणे (migraine symptoms in marathi) आणि उपाय अवश्य वाचा.

मायग्रेन म्हणजे काय (Migraine Meaning In Marathi)

मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे. मायग्रेनमध्ये तुम्हाला मळमळ अथवा उलटीचा त्रासही होण्याची शक्यता असते. काही वेळा मायग्रेनमुळे तुमचे डोके जोरजोरात थडथडत आहे असे वाटू लागते. काही जणांचा रक्तदाबही यामुळे वाढू शकतो. मात्र काहीही असलं तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी मायग्रेनमुळे होणारी आहे का हे समजू शकतं. कारण प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे मुळीच नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण निरनिराळे असू शकते. मायग्रेन एक अनुवंशिक समस्या आहे.  मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

What Is Migraine

मायग्रेनचे दोन प्रकार आहेत (Types Of Migraine In Marathi)

मायग्रेनची लक्षणे आणि कारणे जाणून घेण्यापूर्वी त्याचे हे मुख्य दोन प्रकार समजून घ्या. कारण त्यामुळे त्यावर उपचार करणं सोपे जाईल.

क्लासिकल मायग्रेन आणि नॉन क्लासिकल मायग्रेन (Classical And Non-Classical Migraine)

क्लासिकल मायग्रेनमध्ये डोकेदुखी सुरू होण्याआधी काही लक्षणे जाणवतात. नॉन क्लासिकल मायग्रेनमध्ये मात्र अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. कोणत्याही प्रकारचा मायग्रेन असला तरी त्यावर डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या डोकेदुखीवर कोणतेही पेनकिलर घेणं चुकीचे ठरेल.

ADVERTISEMENT

मायग्रेन कशामुळे होतो (Reasons Of Migraine In Marathi)

मायग्रेन कशामुळे होतो

मायग्रेनचा त्रास होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा ही डोकेदुखी प्रखर उजेड, एखादा उग्र वास, चिंता-काळजी अथवा कर्णकर्कश आवाज यामुळे सुरू होऊ शकते. मात्र या व्यतिरिक्त अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं डोकं दुखू शकतं

1. उच्च रक्तदाब

2. अपूरी झोप

3. ताण-तणाव

ADVERTISEMENT

4. अधिक प्रमाणात पेनकिलर घेणं

5. वातावरणातील बदल

6. अॅलर्जी

7. धूर

ADVERTISEMENT

8. हॉर्मोन्समधील बदल

9. सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे

10. मासे, शेंददाणे किंवा लोणचं खाण्यामुळे

प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनचे  कारण वेगळे असू शकते त्यामुळे यावर उपचार करण्याआधी त्याचे कारण अवश्य जाणून घ्या.

ADVERTISEMENT

ब्रेन ट्यूमरची लक्षणे (Symptoms Of Brain Tumor In Marathi)

मायग्रेनची लक्षणे (Migraine Symptoms In Marathi)

मायग्रेनची लक्षणे
कोणत्याही आजाराच्या लक्षणावरून त्यावर उपचार करणे सोपे जाते. यासाठी मायग्रेनची लक्षणे अवश्य जाणून घ्या.

1. भूक कमी लागणे

2. कामात रस न वाटणे

ADVERTISEMENT

3. डोक्याचा अर्धा भाग दुखणे

4. घाम सुटणे

5. मळमळ, उलटी

6. प्रखर उजेड आणि तीव्र आवाज सहन न होणे

ADVERTISEMENT

7. अशक्तपणा

8. डोळे दुखणे

9. धुसर दिसू लागणे

10. काही विशिष्ट खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणे

ADVERTISEMENT

जाणून घ्या चिकनगुनिया लक्षणे

मायग्रेन दूर करण्यासाठी उपाय (Migraine Treatment At Home In Marathi)

जर तुमचं डोकं मायग्रेनमुळे दुखत असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. शिवाय काही घरगुती उपचार करुनदेखील तुम्ही तुमची डोकेदुखी कमी करू शकता.

1. साजूक तूप –  मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित तुमच्या नाकपुडयांमध्ये दोन थेंब शुद्ध तूप टाका.

2. लवंग पावडर – डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.

ADVERTISEMENT

3. सफरचंद – मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा

4. पालक आणि गाजराचा रस- मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.

5. लिंबाची साले – लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावा.

ज्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकेल.

ADVERTISEMENT
Migraine Treatment At Home In Marathi

6. आले – एक चमचा आल्याच्या रसात थोडं मध मिसळा. हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि प्या. ज्यामुळे तुमची डोकेदुखी कमी होईल. त्यासोबतच आल्याचा चहा घेतल्यास अथवा आल्याचा एक तुकडा तोंडात ठेवल्यासदेखील तुम्हाला आराम मिळू शकेल. आल्याचा रस पोटात गेल्याने तुमची डोकेदुखी कमी होऊ शकेल. एवढचं नाहीतर तुम्ही आल्याच्या सालांचा वापर ही करू शकता.

7. काकडी – काकडीचा रस डोक्यावर लावल्याने अथवा काकडीचा वास घेतल्याने तुमची डोकेदुखी कमी होईल

8. द्राक्षाचा रस – ताजी द्राक्ष मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. डोकं दुखत असल्यास दिवसभरात दोन वेळा पाण्यासोबत हे सरबत प्या. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेड असतात ज्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो.

9. दालचिनी – दालचिनी पावडर हा मसाल्याचा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचं जेवण तर स्वादिष्ट होतच. याशिवाय दालचिनीचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदे आहेत. जसं तुम्हाला मायग्रेनपासूनदेखील सुटका मिळू शकते. यासाठी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून तुमच्या कपाळावर लावा. तुम्हाला निवांत वाटू लागेल.

ADVERTISEMENT

10. मसास – कोमट तेलाने तुमच्या डोक्याला मसाज करा. हळूवार केलेल्या या हेडमसाजमुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.

मायग्रेन घरगुती उपाय (Migraine Upay In Marathi)

1. आईस पॅक –  एका स्वच्छ टॉवेलवर बर्फाचे काही तुकडे ठेवा आणि त्याने तुमचे डोकं, मान आणि पाठीला शेकवा. बर्फात काही थेंब पेपरमिंट ऑईल टाकल्यास तुम्हाला आणखी बरे वाटेल.

2. तिळाचं तेल – तिळाच्या तेलात एक दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलची टाका आणि तेल गरम करा. तेल कोमट झाल्यावर त्या तेलाने हेड मसाज करा. यामुळे तुमचे सिरोटोनिन वाढते ज्यामुळे तुमचे डोके दुखणं कमी होतं. तिळाचं तेल हे त्वचा आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे.

Migraine Upay In Marathi

3. पेपरमिंट –  पेपरमिंटमुळे सूज कमी होते आणि आराम मिळतो. मायग्रेनच्या त्रासावरही तुम्ही  याचा वापर करू शकता. यासाठी पेपरमिंटची चहा प्या अथवा पाण्यात पेपरमिंट आणि मध टाकून प्या. शिवाय डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही पेपरमिंट ऑईलने हेडमसाज सुद्धा करू शकता.

ADVERTISEMENT

4. अॅपल सायडर व्हिनेगर – एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळा आणि प्या.

5. मायग्रेन अटॅक –  जर एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा अटॅक आला तर त्याला आधी आडवं झोपवा. डोक्याच्या ज्या भागाकडे दुखत असेल त्या भागाकडील नाकपुडीत तिळाचं तेल टाका. रुग्णाला तेल नाकातून श्वाासाद्वारे ओढण्यास सांगा.

6. कापूर –  गायीच्या शुद्ध तूपात थोडेसं कापूर मिसळा आणि त्या तुपाने डोक्याला मसाज करा.

7. पाणी – पाणी पिण्याचे फायदे आपल्याला माहित आहेतच. जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर मुबलक प्रमाणात पाणी प्या..

ADVERTISEMENT

8. कोबी – मायग्रेनच्या त्रासावर कोबीची पाने वाटून त्याची पेस्ट डोक्यावर लावा. ज्यामुळे तुमचं डोकं दुखणं कमी होऊ शकेल.

9. उपाशी राहू नका – मायग्रेनचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर जास्त वेळ उपाशी राहू नका.

10. पुरेशी झोप घ्या –  मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे.

मायग्रेनपासून वाचण्यासाठी उपाय (Tips To Prevent Migraine In Marathi)

मायग्रेन चा अटॅक कधीही येऊ शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी  सतत सावध असणं फार गरजेचं आहे. आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर मायग्रेनच्या त्रासापासून वाचणं नक्कीच शक्य आहे.

ADVERTISEMENT
मायग्रेनपासून वाचण्यासाठी उपाय

1. कडक उन्हात घराबाहेर पडू नका

2. उग्र वासचे परफ्युम लावू नका

3. प्रखर उजेडात काम करू नका. झोपताना दिवे बंद करा.

4. पुरेशी झोप घ्या. झोपमोड होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी झोपण्यापूर्वीच आजूबाजूचे वातावरण शांत
ठेवण्यासाठी घरच्यांना विनंती करा.

ADVERTISEMENT

5. ताण- तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. दैनंदिन जीवनात अनेक समस्या आणि चिंताना तोंड द्यावे लागते. म्हणूनच नियमित मेडीटेशन करा. योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल.

6. कमी प्रकाशात डोळ्यांवर ताण येईल असे काम करणे टाळा.

7. दररोज कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.

8. वातावरणात बदल झाल्यामुळे मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. यासाठी अचानक थंड वातावरणात जाणे टाळा शिवाय उन्हाळ्यात थंड पाणी पिऊ नका.

ADVERTISEMENT

9. उन्हाळ्यात अती घाम सुटेल असे गरम पदार्थ जसे की गरमागरम कॉफी अथवा वाफाळता चहा नका घेऊ.

10. गर्भ निरोधक गोळ्यांचा अती वापर करू नका. कारण ओरल पिल्समध्ये प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे हॉर्मोन्स असंतुलित होतात. हॉर्मोन्समधील बदलांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

home remedies for migraine in marathi

मायग्रेनसाठी डाएट टीप्स (Diet Tips Of Migraine In Marathi)

कोणत्याही आरोग्य समस्येवर योग्य आणि संतुलित आहाराने मात करता येते. शिवाय एखादी आरोग्य समस्या होऊ नये यासाठी आधीच योग्य उपाय केले तर कोणतीही समस्या निर्माण होऊ शकत नाही.

1.आहारात अधिक प्रमाणात लिक्विडचा समावेश करा. जसे की सूप, लिंबू पाणी, ताक, लस्सी, नारळपाणी

ADVERTISEMENT

2.आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा.

3. डाएटमध्ये  फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.

Leafy vegetables

4. चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

5. अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ खाऊ नका.

ADVERTISEMENT

6. मायग्रेन असेल तर उपवास करणे टाळा.

7. चीज, प्रक्रीया केलेले पदार्थ, चमचमीत पदार्थ खाण्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकते.

8. हवाबंद केलेले पदार्थ खाणे टाळा.

9. पिझा, बर्गर, भटुरे आणि कुकीजसारखे पदार्थ खाण्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

ADVERTISEMENT

10. योग्य आणि संतुलित आहारासोबत मुबलक प्रमाणात पाणी प्या.

योगासने आणि प्राणायम (Yoga To Get Rid Of Migraine In Marathi)

योगासने आणि मेडीटेशनमुळे मन शांत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने आणि प्राणायमाचा सराव करा. शिवाय झोपताना अथवा झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनीटे केलेल्या मेडीटेशनमुळे तुम्हाला निवांत वाटू लागेल. यासाठी ही काही योगासने अवश्य करा.  

yoga for migraine

1. अनुलोम विलोम प्राणायम

2. अधोमुख शवासन

ADVERTISEMENT

3. सेतुबंध आसन

4. शिशुआसन

5. जानु शिरसासन

पुढे वाचा – 

ADVERTISEMENT

Causes of Migraine in Hindi

13 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT