Bigg Boss मराठीचा तिसरा दिवसही तसा रोमांचक गेला असेल म्हणायला हवे. कारण जी भांडण या घरात राहण्यासाठी अपेक्षित असतात. अगदी तशीच भांडणे या घरात आता व्हायला सुरुवात झाली आहे. शाब्दीक चकमक आणि ग्रुपबाजी आता अवघ्या दोन दिवसात दिसून येऊ लागली आहे. प्रेक्षकांना मोमो म्हणून माहीत असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ तर अगदी दोनच दिवसात चांगली हिट झाली आहे. मीरा जगन्नाथ हिला अशा अवतारात पाहता अनेकांना हिंदीतील बिग बॉस फेम निकी तांबोळीची आठवण झाली आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून घर डोक्यावर घेऊ पाहणारी ही मीरा जगन्नाथ निकी तांबोळी होऊ पाहतेय अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
Bigg Boss Marathi: पहिल्या भागापासून लक्ष वेधून घेतोय जय दुधाणे
हक्क मागण्यात एक्सपर्ट
मीरा जगन्नाथ ही अगदी आल्या दिवसापासून काहीना काही कारणास्तव चर्चेत आहे. जेवण कमी पडते या विषयावर भांडणारी मीरा सगळ्यांच्या नाकी अगदी नऊ आणत आहे. तिच्या मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाही तर ती चिडचिड करताना दिसते. पण ज्यावेळी खेळाची वेळ येते त्यावेळी ती मात्र सगळ्यांच्या मदतीला उतरते असा हा तिचा स्वभाव फारच वेगळा पण सगळ्यांच्या लक्षात राहील असा आहे. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून ती जितकी भांडताना किंवा चिडताना दिसत आहे तितकीच ती इतरांना मदत करताना दिसत आहे. हिंदीतील स्पर्धक निकी तांबोळी ही तिच्या अशाच बेफाम स्वभावामुळे प्रसिद्ध झाली होती. तिला हवे तसेच ती वागायची पण खेळाची वेळ आली की जीव तोडून खेळायची. त्यामुळेच पहिल्याच दिवशी नॉमिनेट झाली तरी ती लंबी रेस का घोडा आहे असेच सगळ्यांना वाटत आहे.
Bigg Boss मराठी : स्पर्धकांवर होतेय या गोष्टींमुळे टीका
मोमोही वागते अगदी तशीच
मीराने मोमोचे कॅरेक्टर प्ले केले आहे. त्यामुळे सध्याचा तो माहीत असलेला असा चेहरा आहे. मोमो जशी मालिकेत थोडीशी बुद्धी काहीही न कळणारी पण तरीही धुर्त दाखवण्यात आली आहे. अगदी तशीच ती खऱ्या आयुष्यात असल्याचे देखील दिसत आहे. बेड निवडण्यापासून ते अगदी या रुमची मालकीण असल्यामुळे बेडरुमची काळजी घेण्याचे काम ती चांगलेच करते. इतकेच नाही तर ती इतरांच्या कामांमध्येही हस्तक्षेप करुन आपली कामे करते. त्यामुळे तिचा हा खेळ पहिल्या दिवसापासूनच दिसून आला आहे.
खेळात टिकून राहणे महत्वाचे
बरेचदा स्पर्धक खेळात टिकून राहण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून काहीतरी करण्याच्या नादात बरेचदा काही स्पर्धक आपली ग्रे शेड असलेली प्रतिमा निर्माण करतात. जी मुळीच चांगली नाही. मराठी प्रेक्षक हा अनेकदा ऑल राऊंडर खेळाडू निवडत असतो. त्यामुळे शेवटपर्यंत खेळात टिकताना कितीही स्ट्रॅटर्जी वापरली तरी देखील हा खेळ कधी आणि कसा बदलेल हे काही शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे आता खेळाडूंनी त्यांचा गेम दाखवण्यापेक्षा तो पुढच्या काही दिवसांसाठीही टिकून ठेवायला हवा.
त्यामुळे मीराची ही जादू नेमकी कशी चालणार आणि पुढे ती काय काय करणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे.
मराठी बिग बॉस 3 ची दिमाखदार सुरुवात, हे कलाकार आहेत स्पर्धक