ADVERTISEMENT
home / Mental Health
मोबाईलचे दुष्परिणाम

जाणून घ्या मोबाईलचे दुष्परिणाम | Mobile Che Dushparinam

मोबाईल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. मोबाईल दिसला नाही की खूप जणांची चिडचिड होऊ लागते. पूर्वी मोबाईल हा फक्त मोठ्या माणसांसाठी कामाची अशी वस्तू होती. पण आता ती अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. लहान मुलांच्या हातातही हल्ली मोबाईल फोन दिसू लागला. खूप जणांना फोन नसेल तर झोप लागत नाही.  फोन हातात असेल मगच झोपावेसे वाटते. फोनच्या खूप जास्त अधीन गेल्यामुळे हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. मोबाईलचे इतकेच नाही तर अन्यही काही दुष्परिणाम आहेत जे तुम्ही जाणून घ्यायला हवेत. मोबाईलचे हे दुष्परिणाम (Mobile Che Dushparinam) जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्यापासून दूर कसे जायचे हे देखील कळेल.

मोबाईलचे दुष्परिणाम (Mobile Side Effects In Marathi)

मोबाईलचा वापर जसा वाढू लागला आहे. तसे मोबाईलचे दुष्परिणाम (Mobile Che Dushparinam) वाढू लागले आहेत. तु्म्ही मोबाईलचा अतिरेक करत असाल तर मोबाईलचे दुष्परिणाम (Mobile Side Effects In Marathi) कोणते जाणवतील ते जाणून घेऊया.

एकटेपणा (Isolation)

मोबाईलच्या अति वापरामुळे  इतरांसोबत बोलण्याची इच्छा कमी होते. आजुबाजूला कोणीही असेल तर त्याच्याशी बोलण्यापेक्षा फोनमध्ये गुंगून राहणे अशा लोकांना आवडू लागते. एकदा का अशी सवय लागली की, आजुबाजूला असणारी माणसे स्वत:हून बोलणे सोडून देतात. आता आजुबाजूला असणारी माणसंच नको असतात. त्यामुळे अशा लोकांना एकटेपणा कधी येतो ते देखील कळत नाही. फोनमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे असे काही अस्तित्व राहात नाही. त्यांना एकटेपणा आवडू लागतो आणि पर्याय नसल्यामुळे अशी माणसं एकटी पडू लागतात

निद्रानाश (Sleeplessness)

खूप जणांना रात्रीची झोप येत नाही. यासाठी कारणीभूतही मोबाईल असू शकतो. खूप जण मोबाईलमध्ये इतके गुंतून पडतात की त्यांना वेळेचे भान राहात नाही. डोळ्यासमोर जर सतत फोन असेल तर अशावेळी त्याच्या प्रकाशामळे झोपसुद्धा येत नाही. फोनच्या दुष्परिणामांपैकी हा एक दुष्परिणाम आहे. कारण झोप पूर्ण झाली नाही की, त्याचा परिणाम आपोआपच आरोग्यावर होऊ लागतो. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास सुरु झाला असेल तर तुम्ही फोन लगेचच सोडून द्या. मोाबाईलचे दुष्परिणाम (Mobile Side Effects In Marathi) हे गंभीर आहेत

ADVERTISEMENT

कामात लक्ष न लागणे (Distract From Work)

मोबाईलचा खूप जास्त वापर ज्यावेळी आपण करु लागतो. त्यावेळी मोबाईल हातातून सोडवत नाही. त्यामुळे होते असे की, खूप जणांचा खूप वेळ हा नको त्या गोष्टीमध्ये वाया जातो साहजिकच त्याचा परिणाम हा कामात लक्ष न लागण्यामध्ये होऊ लागतो. घराच्या कामांपासून ते ऑफिसचे काम असे काहीही करण्यास लक्ष लागत नाही. कामातून थोडासा वेळ काढून तरी किमान फोन बघावा अशी इच्छा होऊ लागते. त्यामुळे हा देखील त्रास होऊ लागतो.

वाचा – उचकी लागणे उपाय (Uchki Var Upay In Marathi)

पैसे वाया जाणे (Wastage Of Money)

मोबाईलचे दुष्परिणाम जाणून घेताना मोबाईलचे वेड लागल्यानंतर वेगवेगळे अॅप डाऊनलोड करणे. वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याचे वेड लागू लागते. मोाबाईलवर अनेक अॅप असतात.  त्या अॅपच्या माध्यमातून खरेदी करणे, एखादे अॅप विकत घेणे असे सगळे काही होऊ लागते. त्यामुळे नाहक पैसे जाण्याची वेळ येऊ शकते. खूप लहान मुलं तर गेम्स खेळताना बरेच जण काहीतरी विकत घेतात. त्यामुळे अनाठायी पैसा खर्च होतो. मोठ्यांमध्ये एका बोटाखाली लगेच खरेदी करणारे अॅप असल्यामुळे बरेच जण खरेदी करण्याच्या मागावर असतात. त्यामुळे पैसै खर्चण्याची शक्यता अधिक असते.

सायबर क्राईमचा धोका (Cyber Bullying)

मोबाईल जितका फायद्याचा आहे तितकाच त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. सध्या सायबर क्राईमचा धोका हा अधिक वाढला आहे. त्यामुळे सायबर क्राईमचा धोका हा वाढू लागला आहे. नको त्या साईटवर गेल्यामुळे खूप वेळा आपला पर्सनल डेटा लीक होण्याची शक्यता असते. हा असा डेटा लीक झाल्यानंतर त्याचा फायदा इतर लोक अगदी नक्कीच घेऊ शकतात. सायबर फसवणुकीचे अनेक किस्से आतापर्यंत तुम्हीही ऐकले असतील त्यामुळे हा एक त्रास होण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

डोळ्यांच्या समस्या (Eye Problems)

मोबाईलचा अति वापर हा डोळ्यांसाठी फारच हानिकारक असतो.  मोबाईलची किरणं सतत डोळ्यांवर पडल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, झोप न येणे असे काही त्रास नक्कीच होऊ लागतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहायचे असेल तर मोबाईलचा अतिवापर करणे टाळायला हवे.

सेल्फी (Selfie Addiction)

फोनमध्ये सेल्फी काढायला कोणालाही आवडते. पण सतत स्वत:ला पाहणे हे देखील आपल्याला वेगळ्या आजाराकडे घेऊन जातो.  सौंदर्याबद्दल खूप विचार करणे आणि आपल्यातील चुका शोधणे यामुळे प्रत्येक व्यक्तिमध्ये न्यूनगंड येण्याची शक्यता असते. त्यामुळे सेल्फीचे अॅडिक्शन हे देखील मोबाईलच्या दुष्परिणामांपैकी एक आहे. जर तुम्हीही सतत सेल्फी काढत असाल वेगवेगळी तोंड बनवत असाल तर आताच त्याकडे दुर्लक्ष करणे हे फारच जास्त गरजेचे आहे.

कार्पल टनल (Carpal Tunnel)

कार्पल टनल ही शरीरासंदर्भातील एक त्रास आहे. यामध्ये हाताची बोटे, मनगट यांना झिणझिणया येऊ लागतात. त्या भागात दुखू लागते. मोबाईलचा वापर करताना बरेचदा आपण आपल्या बोटांचा जास्तीत जास्त वापर करत असतो. हातात फोन घेतल्यामुळे आणि मनगटाचा अति वापर केल्यामुळे त्या भागात कंपने यायला सुरुवात होतो. हात थरथरु लागतो. हात दुखू लागणे या प्रकाराला कार्पल टनल म्हणतात. तुम्हाला हा त्रास होऊ लागला असेल तर तुम्ही फोनचा वापर करणे सोडा

कॅन्सर (Cancer)

कॅन्सरसाठी कारणीभूत असलेली धोकादायक किरणे ही देखील कॅन्सरला कारणीभूत ठरु शकतात. कॅन्सरसारखा आजार हा फारच दुर्धर असतो. मोबाईलच्या अति वापारामुळे तुम्ही मोबाईलचा वापर थडा कमी करायला हवा. मोबाईलमधून बाहेर पडणारे रेडिएशन तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे मोबाईलचा वापर कसा करावा हे तुम्ही नक्कीच माहीत करुन घ्यायला हवे.मोबाईलचे दुष्परिणाम पाहता हे सोडून देणे उत्तम

ADVERTISEMENT

डिप्रेशन (Depression)

मोबाईलचा वापर जरी अति झाला तर वरील सगळे त्रास तुम्हाला होऊ शकतात. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही, डोळ्यांना त्रास होऊ लागला. तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. त्याहीपेक्षा जर तुम्हाला एकटेपणातून बाहेर पडता आले नाही तर त्याचा त्रास अधिक होऊ लागतो. जो तुमच्यातील ताण वाढवतो. ताणतणावातून बाहेर पडणे हे देखील  त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.

मोबाईलपासून लांब राहण्यासाठी उपाय (How To Get Distracted From Mobile)

 मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम (Mobile Che Dushparinam) तुम्हाला जाणवू लागले असतील  तर तुम्ही आताच मोबाईलपासून दूर जाण्यासाठी काही सोपे उपाय करायला हवेत ते जाणून घेऊयात.

  1. वाचनाची सवय लावा. वाचन ही अशी सवय आहे जी लावल्यामुळे तुमचा अधिक वेळ हा त्यामध्ये गुंतून राहतो. मोबाईलमध्ये पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष हातात पुस्तके घेऊन वाचा. तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. 
  2. मोबाईलमधून बाहेर पडण्यासाठी एखादा छानसा डान्स क्लास लावून घ्या. त्यामुळे तुमची गाण्याची इच्छा आणि मनोरंजनाचा कोटा पूर्ण होतो. 
  3. मोबाईलपासून दूर जाण्यासाठी आपले एक वेळापत्रक बनवून घ्या. त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल. 
  4. जेवण बनवणे ही एक कला आहे ही कला देखील तुम्ही आत्मसात करा. त्यामुळेही तुम्हाला बराच फायदा मिळण्यास मदत मिळते. जेवणात बराच वेळ जातो. त्यामुळे मोबाईल हातात घ्यायची इच्छा होत नाही. 
  5. फिरण्याची आवड तुम्हाला असेल तर तुम्ही मस्त फिरण्याचा प्लॅन करा. फिरल्यामुळेही तुमचा बराच वेळ हा जातो. त्यामुळे मोबाईलकडे फारसे लक्ष जात नाही.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)  

1. तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागले आहे हे कसे समजावे ?

कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही फोनचा सतत वापर करत असाल किंवा काहीही कारण नसताना सतत तुम्हाला फोन वापरायची इच्छा होत असेल तर तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात असे समजावे. सुरुवातील हे व्यसन अजिबात कळत नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्याच्या आहारी जाता त्यानंतर तुम्हाला फोन मिळाला नाही तर तुमची सतत चिडचिड होऊ लागते, झोप लागत नाही, काहीही करायची इच्छा होत नाही अशी काही लक्षणे (mobile che dushparinam) दिसू लागतात.

 2. मोबाईलचा अति वापर वाईट किंवा चुकीच्या वापरामध्ये बदलू शकतो का ?

हो, नक्कीच जितके तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अधिक गुंताल तितका तुम्हाला त्याबद्दल अधिक कळू लागते. फोनचा वापर करताना नाहक इंटरनेटचा वापर वाढू लागतो. सेल्फी काढण्याचे वेड लागू लागते. मोबाईल वापरताना अनेक नको त्या गोष्टी पाहण्याची इच्छा होऊ लागतो. जर तुम्हालाही अशा काही सवयी लागल्या असतील तर तुम्ही मोबाईलचा अति वापर करणे किंवा इतरांना वापर करु देणे आताच थांबवा.

ADVERTISEMENT

3. मोबाईल साधारण किती तासांसाठी वापरायला हवा ?

दिवसातून जास्तीत जास्त 4 तासांसाठी मोबाईलचा वापर व्हायला हवा. त्याहून अधिक वापर हा डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. कारण त्यामुळे निद्रानाश, सतत चिडचिडेपणा असा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

21 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT