ADVERTISEMENT
home / फॅशन
Monsoon Fashion Tips You Must Follow in Marathi

पावसाची आतुरतेने वाट पाहताय, मग त्याआधी अपडेट करा तुमचं वॉर्डरोब

पावसाची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाला एकदा जोरदार सुरुवात झाली की त्यानुसार तुमचे कपडे आणि इतर फॅशनमध्ये आपसूक बदल होत जातात. वातावरणात गारवा आणि ओलावा वाढतो. रस्त्यावर पाणी आणि चिखल निर्माण होतो. सहाजिकच त्यानुसार तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही खास बदल होत जातात. पावसाळ्याला साजेसे कपडे, फुटवेअर, रेनकोट, छत्री तुमच्या घरात दाखल होते. पावसाला जोरात सुरुवात होण्याआधीच जर तुम्ही तुमचं वॉर्डरोब अपडेट केलं तर तुमची ऐनवेळी धावाधाव होणार नाही. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स…तसंच तुमची प्रत्येक ऋतूमध्ये ‘फॅशन’ असते जरा हटके… मग तुमच्यासाठी खास ठरतील हे पावसाळी कोट्स (Rain Quotes In Marathi), फॅशन कोट्स (Fashion Quotes In Marathi), साडी कोट्स (Saree Quotes In Marathi) आणि तसंच मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets In Mumbai)

योग्य कपडे निवडा

Monsoon Fashion Tips You Must Follow in Marathi

पावसाळ्यासाठी असलेलं खास कलेक्शनची निवड करताय, मग काही गोष्टी आधीच ठरवा. हे कलेक्शन उंचीला कमी असेल असं निवडा, जसं की शॉर्ट्स, थ्री फोर्थ, मिडी ड्रेस. ज्यामुळे तुमचे कपडे चिखलामुळे खराब होणार नाहीत. पावसाच्या दिवसात अधिक फ्रेश दिसण्यासाठी रंगबेरंगी, निसर्गाच्या रंगात मिसळणारे, फुलापानांची डिझाइन असलेले कपडे घाला. ज्यामुळे तुम्ही जास्त आकर्षक दिसाल.

फॅब्रिकची निवड

मान्सुनसाठी कपड्यांची खरेदी करताना, पावसाळ्यातील वातावरणाचा विचार करा. कारण कोणत्या दिवशी जास्त पाऊस पडेल आणि कोणत्या दिवशी पाऊस पडणार नाही याचा खरा अंदाज आजवर कोणीच बांधू शकलेलं नाही. त्यामुळे पावसाळ्याचे चारही महिने असे कपडे निवडा जे लवकर सुकतील. पावसाळ्यात जर तुम्ही जास्त जाड अथवा लवकर न सुकणाऱ्या फॅब्रिकचे कपडे वापरले तर त्यांना घाणेरडा वास येण्याची शक्यता असते. अशा वेळी जीन्स आणि जाड कापडाचे कपडे वापरूच नका. त्याऐवजी या काळात शक्य असेल तर पॉलिस्टर, पातळ सुती कपडे वापरा. 

साजेशी छत्री आणि रेनकोट

पावसाळ्यात तुमच्याजवळ छान छत्री आणि रेनकोट असायलाच हवा. छत्री आणि रेनकोटमुळे तुमचं पावसापासून संरक्षण होतंच. पण तुम्ही फॅशनेबल आणि सुंदरही दिसू शकता. यासाठी निरनिराळ्या प्रिंट असलेल्या आकर्षक रंगाच्या छत्री आणि रेनकोटची पावसाळ्यासाठी निवड करा. वाचा उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स (Fashion Tips For Tall Girls In Marathi)

ADVERTISEMENT

फ्लिप फ्लॉप्स

तुमच्याजवळ फुटवेअरचं कितीही छान कलेक्शन असलं तरी पावसाळ्याआधी तुम्हाला ऋतूमानानुसार खरेदी करावीच लागते. या काळात लेदर अथवा हायहिल्स पेक्षा रबर फ्लिप फ्लॉप्स जास्त सुरक्षित असतात. 

पावसासाठी हॅंड बॅग

Monsoon Fashion Tips You Must Follow in Marathi

फुटवेअर प्रमाणेच तुमचं लेदर बॅगचं कलेक्शन पावसाळ्यात लवकर खराब होऊ शकतं. यासाठी पावसाळ्यासाठी खास बॅग खरेदी करायला विसरू नका. अशी बॅग निवडा जी आकर्षक असेलच पण त्यामध्ये तुमची छत्री, रेनकोट व्यवस्थित राहिल. शिवाय बॅग वॉटरप्रूफ असेल तर तुमचं किंमती सामान बॅगेत ठेवल्यावर पावसाने खराब होणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT