प्रत्येक राशीमध्ये वेगवेगळे गुण असतात, तसेच वेगवेगळे दोषही असतात. प्रत्येक राशीची माणसं ही वेगवेगळ्या स्वभावाची असतात. त्यामुळेच प्रत्येक राशीप्रमाणे माणसाचा स्वभाव वेगळा असतो. पण ‘आळस हा माणसाचा शत्रू आहे’ ही म्हण तुम्हाला माहीत असेल. त्याप्रमाणे आपल्याकडे अशा काही राशी आहेत, ज्या राशींचे लोक आळशी असतात. अशा राशींच्या लोकांना सगळ्या तयार गोष्टी हव्या असतात. त्यांना मेहनत नको असते. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ अशा स्वभावाचेही या व्यक्ती असतात. अशा कोणत्या राशी आहेत, ज्या आळशी या श्रेणीमध्ये मोडतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पण त्यातील एक आहात का बघा जरा.
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
या राशींच्या व्यक्तींमध्ये आळस एकदम भरभरून असतो. यांच्या मेंदूचा जितका उपयोग करून घ्यायचाय तुम्ही करून घ्या. पण जेव्हा शारीरिक श्रमाची गोष्ट येते तेव्हा या राशीच्या व्यक्तींना खूपच त्रास व्हायला लागतो. कोणत्याही बनवलेल्या योजना बिघडवण्यामध्ये या व्यक्ती माहीर असतात. या व्यक्ती ना स्वतः कोणत्या गोष्टींचा आनंद घेत ना इतरांना घेऊ देत. यांच्या हातात एखादी गोष्ट असेल तर दिवस-रात्र केवळ झोपून राहण्याचा आनंद या व्यक्ती घेऊ शकतात.
वृषभ ( 20 एप्रिल – 21 मे)
यामध्ये अजिबात शंका नाही की, या राशीच्या व्यक्ती या अतिशय जिद्दी असतात. पण मेहनत करणं यांना आवडत नाही. जिथे जास्त मेहनत करावी लागते अशा कामांमध्ये आपलं डोकं लावणं या व्यक्तींना आवडत नाही. कोणत्याही कामामध्ये ताण वाढत आहे जाणवलं की, अशा व्यक्ती त्यातून आपलं अंग बाहेर काढून घेतात. मात्र आपल्या करिअरच्या बाबतीत आळसाशी थोडी तडजोड या व्यक्ती करून घेतात. पण आपल्या रोजच्या आयुष्यात यांना कोणी चुकीच्या गोष्टीवर बोललं तर त्यांना ते आवडत नाही. त्यांना हवं तरच ते काम पूर्ण करतात नाहीतर त्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)
आळस तर या राशीच्या अगदी कणाकणात आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण सगळी कामं करू असं या व्यक्ती दाखवतात पण आळसापुढे दुसरं यांना काही सुचत नाही. हे आपल्या मनाचे राजे असतात. कोणती गोष्ट यांना आवडली तर त्यासाठी दिवस-रात्र काम करतील ती मिळवण्यासाठी वाटेल ते करतील. पण एखादं काम यांना नाही आवडलं तर अतिशय सहजतेने या व्यक्ती ते काम टाळतात. मेहनतीच्या कामापासून दूर राहात येईल असाच यांचा नेहमी प्रयत्न असतो. कारणं देण्यामध्ये या राशीच्या व्यक्तींचा हात कोणीच धरू शकत नाही.
मीन ( 19 फेब्रुवारी – 20 मार्च)
या राशीच्या व्यक्ती खूप क्रिएटिव्ह असतात आणि आपल्या क्रिएटिव्हिटीचा वापर कामाच्या बाबतीत शॉर्टकट्सचा वापर करून करतात. यांच्यावर कोणत्या कामाचा ताण आला तर यांचा पारा वाढायला लागतो. बऱ्याचदा काम कमी असलं तरीही आपल्याकडे कितीतरी काम आहे असा दिखावा करण्यात या व्यक्ती माहीर असतात. तसंच या राशीच्या व्यक्तींमध्ये सहनशीलता अतिशय कमी असते. त्यामुळे कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्यासाठी या व्यक्ती पुढे येत नाहीत. जिथे आळस आहे तिथेच राहणं यांना जास्त आवडतं. त्यामुळे उत्साही व्यक्तींबरोबर मैत्रीदेखील या व्यक्ती करणं टाळतात.
हेदेखील वाचा
आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’