त्वचा चांगली दिसावी यासाठी आपण सगळ्या गोष्टी करुन पाहतो. कोणी चांगल्या टीप्स दिल्या तर त्या देखील आपण फॉलो करतो. अनेकदा वेबसाईटवरुनही आपण वेगवेगळ्या स्किन टीप्स वाचून तशा पद्धतीने चेहऱ्यावर प्रयोग करायला पाहतो. पण जे इलाज तुम्ही तुमची त्वचा चांगली करण्यासाठी करत आहात त्याचा उपयोग खरोखरच तुमच्या चेहऱ्याला होतो का? कारण अनेकदा तुम्ही स्किनकेअरचे व्हिडिओ पाहता ते परदेशातील महिलांचे असतात. त्यांनी केलेल्या उपाययोजनांचा तुम्हाला फायदा होईलच असे नाही. कारण भारतीय त्वचाही वेगळी आहे. त्यामुळेच आज आम्ही भारतीय महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी या संदर्भात टीप्स देणार आहोत.
भारतीयांना त्वचेसंदर्भात सर्वसाधारण कोणत्या तक्रारी असतात?
जगभरातील लोकांच्या त्वचेत का असतो फरक
स्वयंपाक घरातील वस्तूंचा असा करा स्किनकेअर म्हणून वापर
घरगुती उपचारापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे
भारत हा उष्णकटीबंधीय देश आहे. भारताचा विचार करायला गेला तर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. म्हणजे पंजाब, काश्मीर या ठिकाणी वेगळे वातावरण आहे.तर आसाम, अरुणाचल प्रदेश आणि समुद्रापासून जवळ असलेल्या राज्यातील वातावरण वेगळे असते. त्यानुसार भारतातच तुम्हाला वेगवेगळ्या स्किनटोन दिसतील. थंड प्रदेशाच त्वचा फुटण्याचा त्रास तर ज्या ठिकाणी उन जास्त आहे तिथे चेहरा काळवंडण्याचा त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची त्वचा ही फारच वेगळी असते.
हेही वाचा: मुरुमांच्या चट्टेसाठी घरगुती उपचार
ज्याप्रमाणे भारतातील वातावरणात फरक आहे. अगदी त्याचप्रमाणे जगभरातील वातावरणानुसार त्यांच्या त्वचेत बदल होत जातो. ज्या ठिकाणी बर्फ आहे तेथील लोकांच्या त्वचेतील मेलनिन अगदीच लाईट कलरचे असते म्हणून तुम्हाला त्यांची त्वचा पांढरी दिसते. जसजसे मेलनिनमध्ये बदल होतात.तसतसं स्किनटोनमध्ये फरक पडत जातो. आफ्रिकेच्या भौगोलिक परिस्थितीमुळे तेथील लोकांची त्वचा ही अधिक गडद रंगाची असते. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार त्वचेमध्ये त्याच्या रंगामध्ये फरक पडत जातो.
भारतीयांना त्वचे संदर्भात अनेक तक्रारी असतात. त्यापैकी काही अशा तक्रारी आहेत. त्या कदाचित सगळ्यांनाच असतात. आम्ही अशा काही तक्रारी काढल्या आहेत. ज्या तुमच्या असतील किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून तुम्ही या तक्रारी ऐकल्या असतील.
सर्वसाधारणपणे पौंगडावस्थेत तरुणींना पिंपल्स यायला सुरुवात होते. काहींना पिरेड्स सुरु होण्याच्या कालावधीत चेहऱ्यावरील पिंपल्स येतात. शिवाय शरीरातील हार्मोन्सबदल हे देखील त्यामागचे एक कारण आहे. त्यामुळे पिंपल्स येणे ही फार सर्वसाधरण तक्रार भारतीय महिला करतात.
भारत हा उष्णकटीबंध देश आहे. अनेक ठिकाणी उनाच्या तीव्र झळा लागतात. त्याचा परिणा त्वचेवर इतका होतो की अनेकांना सनबर्नचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे अनेकांच्या अंगावर चट्टे येतात.काहींची त्वचा काळवंडते. उन्हामुळे जळते. त्यामुळे ही आणखी एक तक्रार त्वचेसंदर्भात असते.
वयाआधी आलेल्या सुरकुत्या चेहऱ्यावर चांगल्या वाटत नाही.भारतातील प्रदुषणाचा विचार करता त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात.
त्वचेच्या प्रकारानुसार अनेकांना हा त्रास होतो. याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. कारण तुमच्या पोअर्समध्ये घाण साचून हा त्रास तुम्हाला होतो. ते जर योग्यवेळी काढले नाही तर तुमच्या चेहऱ्यावर अधिक खड्डे पडतात आणि तुमचे चांगले त्वचा मिळण्याचे स्वप्न स्वप्नच राहते.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स लगेच चेहऱ्यावरुन जात नाही. ते खराब दिसतात म्हणून अनेकजण चेहऱ्यावरील पिंपल्स फोडतात. त्यामुळे त्याचे काळे डाग चेहऱ्यावर जात नाही. पिंपल्सतरी चेहऱ्यावरुन जातील. पण पिंपल्सचे काळे डाग चेहऱ्यावरुन जायला वेळ लागतो. या संदर्भातील अनेक तक्रारी घेऊन महिला डॉक्टरांकडे येतात. हे डाग जावेत म्हणून ते कोणताही उपाय करायला तयार असतात.
तुमच्या त्वचेतील आणखी एक फरक म्हणजे ओपन पोअर्स. ओपन पोअर्समुळे तुमची त्वचा अचानक थोराड वाटू लागते. शिवाय ओपन पोअर्समुळे इतरही अनेक त्रास होतात. हा त्रास कोणालाही होऊ शकते.
वरील सगळ्या त्रासाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर झाला की, तुमच्या चेहऱ्यावर रॅशेश येतात. हा अगदी जगभरातील महिलेंचा त्रास आहे.
*थोड्याफार फरकाने सगळ्यांच्याच त्वचेला हा त्रास होतो. पण त्याचे वेगवेगळे परिणाम हवामानानुसार होतात.
स्वयंपाकघरातील अनेक असे जिन्नस आहेत ते तुमच्या चेहऱ्याला तजेला आणू शकतात. आणि तुम्हाला त्वचेच्या त्रासापासून दूर ठेऊ शकतात. आम्ही किचनमधील असे जिन्नस घेतले आहे त्यांचा तुमच्या चेहऱ्यासाठी उपयोग होऊ शकेल असा विचारही तुम्ही कधी केला नसेल.
‘हळद’ ही बहगुणी आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पी हळद आणि हो गोरी’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे तुमच्या हळदीचा वापर करु शकता. हळदीचा थेट वापर करण्यापेक्षा तुम्ही जर हळदीचे सेवन केले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होऊ शकेल. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुधातून हळद प्या. तुमची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.
‘दालचिनी’ हा मसाल्याचा प्रकार असला तरी त्याचे सौंदर्यवर्धक फायदे आहेत. तुमची त्वचा काळवंडली असेल किंवा तुम्हाला पिंपल्स आले असतील तर तुम्हील दालचिनीचा वापर करु शकता.
दालचिनी फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचा दालचिनी पावडर, २ ते ३ चमचे मध घ्यायचे आहे. एका भांड्यात दालचिनी पावडर आणि मध एकत्र करुन पेस्ट तयार करायची आहे. ही तयार पेस्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायची आहे. साधारण १० मिनिटे हा पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर कोमट पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा धुवायचा आहे.
*आठवड्यातून एकदा हा प्रयोग करुन पाहा.
आहारात लसूणचा समावेश अनेक जण करतात. वरणात, भाजीत, माशांना लसणाची पेस्ट आवर्जून चोळली जाते. पण यासोबतच लसणाचे आणखीही काही फायदे आहेत. तुमच्या सौंदर्याशी निगडीत त्याचा एक फायदा आहे तो म्हणजे पिंपल्सना दूर करण्याचा. जर तुम्हाला पिंपल्स आले असतील तर तुम्ही लसणाची पाकळी घेऊन तिला थोडं कापा. लसूण तुम्हाला जिथे पिंपल्स आले आहे तिथे लावा. तुम्हाला इतर कुठेही लसूण लावायचे नाही. तर तुम्हाला लसणाचा ओलसरपण तुमच्या पिंपल्सवर लावायचा आहे.तुमचे पिंपल्स लसणामुळे बसतात.
हे करत असताना तुम्हाला थोडी जळजळ होईल. पण ही जळजळ जास्त प्रमाणात होत असेल तर हा प्रयोग करु नका.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तरी दही तुमच्या चेहऱ्यामध्ये नैसर्गिक ओलावा आणू शकते. दह्याचा मास्क बनवणेही अगदी सोपे आहे. तुम्हाला दह्यात हळद, मध घालून तयार पॅक चेहऱ्याला लावायचा आहे. पॅक वाळल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे.
हेल्दी डाएटमध्ये ओट्सचा समावेश केला जातो. पण ओट्सचे सौंदर्यवर्धकही फायदे आहेत. तुमच्या त्वचेला तजेला आणायचे असेल तर तुम्ही ओट्सचा मास्क नक्की लावून पाहायला हवा.
तुम्ही ओट्स दुधात किंवा पाण्यात भिजवून ओट्स थेट चेहऱ्याला लावू शकता. यात तुम्हाला जर काही व्हरायटी आणायची असेल तर त्यात हळद किंवा मध देखील घालू शकता. हा मास्क वाळल्यानंतर तुम्ही चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्या तुम्हाला मस्त फ्रेश वाटेल.
तुम्ही त्वचेची अशी घ्याल काळजी तर तुमचीही त्वचा होईल सुंदर
‘बेसन’ हा किचनमधील घटक आहे तो अनेक रेसिपीजमध्ये वापरण्यात येतो. तुम्ही त्याचा वापर चेहऱ्यासाठी करु शकता. आता तुमची त्वचा अगदीच ड्राय असेल तर याचा वापर करु नका. काऱण अनेकदा पीठं लावून चेहरा कोरडा पडण्याची शक्यता जास्त असते. बेसन मास्क बनवताना तुम्ही त्यात थोडी हळद, अॅलोवेरा जेल आणि पाणी घाला आणि तयार मास्क चेहऱ्याला लावा.
तांदळाचं पीठ हा एक चांगला स्क्रब आहे. जर तुम्ही तांदळाचे पीठ हाताला लावून पाहिले तर ते खरखरीत लागते. त्यामुळे ते तुमची त्वचा अत्यंत नाजूक पद्धतीने स्क्रब करु शकते.
तुम्हाला हा स्क्रब तयार करण्यासाठी तांदुळाच्या पीठात थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे. तयार स्क्रब तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चोळायचा आहे.
बदामामधील स्निग्धपणा तुमच्या चेहऱ्यासाठी चांगला असतो. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता. तुम्हाला चंदनाप्रमाणे बदाम उगाळायचे आहे आणि तुम्हाला बदाम तुमच्या चेहऱ्याला लावायचे आहे.
तयार पदार्थावर कोंथिंबीर चिरुन आपण घालतो. पण कोथिंबीर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते आणि तुमची त्वचा तजेलदार करते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला कोथिंबीर लावण्यास काहीच हरकत नाही.
एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आणि एक चमचा ओट्स घ्या. मिश्रण वाटून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. वाळल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्ससाठी बेकिंग सोड्याचा वापर तुम्ही करु शकता. एका भांड्यात थोडा लिंबाचा रस घेऊन त्यावर बेकिंग पावडर घाला. चांगलं फसफसायला लागल्यानंतर ते मिश्रण नाक हनुवटीला लावा थोडा मसाज करा आणि चेहरा धुवून टाका. ब्लॅकहेड्स नरम पडतात आणि पोअर्सही लहान होतात.
लिंबाबाबत सांगायचे झाले तर लिंबाचे अनेक फायदे आहेत. पण लिंबाचा रस थेट चेहऱ्यावर लावणे म्हणजे थेट अॅसिडजन्य पदार्थ तुमच्या चेहऱ्यावर लावणे. लिंबाच्या रसामुळे प्रचंड जळजळ होऊ शकते. त्यामुळे लिंबाचा वापर करताना एक तर त्यात दुप्पट पाणी घाला किंवा अन्य काही पदार्थांचे कॉम्बिनेशन करा. लिंबामुळे तुमचा काळवंडलेला काळा चेहरा उजळण्यास मदत होते.
मधदेखील तुमच्या त्वचेसाठी चांगले आहे. तुम्ही तुमच्या त्वचेला मध लावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मध थेट लावता येणार नाही. कारण मध हे उष्ण असते. त्यामुळे तुम्ही ओट्समध्ये मध घालून त्याचा वापर करु शकता.
साखर हे एक चांगले स्क्रब आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्याला साखरेचा स्क्रब लावू शकता. साखर आणि मध एकत्र करुन तुम्हाला स्क्रब लावायचे आहे. विशेषत: तुम्हाला जर नरम आणि उठावदार ओठ हवे असतील तर तुम्ही हा स्क्रब तुम्ही तुमच्या ओठाला लावा.
नैसर्गिकपद्धतीने आणा चेहऱ्यावर ग्लो, वाचा टीप्स
पिकलेलं केळ हे त्वचेसाठी चांगले. तुमची त्वचा कोरडी किंवा मिश्र प्रकारातील असेल तर तुम्ही केळं तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. पिकलेलं केळं स्मॅश करुन नुसते चेहऱ्याला लावा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही त्यात ओट्स घाला आणि ते चेहऱ्याला लावा वाळल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
जर तुमच्याकडे फार पिकलेली पपई असेल तर तुम्ही पपईचा छान चेहऱ्याला मसाज करु शकता. पपईचा गर कोणत्याही चेहऱ्याला सूट होतो. म्हणून तुम्ही अगदी निर्धास्तपणे पपई चेहऱ्याला लावू शकता. आता पपई वाया घालवायला जिवावर येत असेल तर तुम्ही पपईची काढलेली सालही चेहऱ्याला चोळू शकता. पपईमुळे तुमच्या चेहऱ्याला चांगला तजेला येतो. तुम्हाला पपई स्मॅश करुन चेहऱ्याला थेट लावायचे आहे.
किचनमधील बटाटा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. बटाटामध्ये असणारे ब्लिचिंग एजंट तुमच्या काळवंडलेल्या त्वचेला पूर्ववत करतात. त्यामुळे किसलेला बटाटा, बटाटाच्या चकत्या तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. याशिवाय तुम्हाला जर बटाटाचा स्प्रे तयार करायचा असेल तर तुम्ही तोही करु शकता.
बटाटा किसून तुम्हाला त्याचा रस काढून एका स्प्रे बॉटलमध्ये घ्यायचा आहे आणि हा स्प्रे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे. चेहरा वाळल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याचे धुवू शकता.
काकडीची कोशिंबीर जितकी रिफ्रेश करते तितकीच ती तुमच्या त्वचेला तजेला आणते. डोळ्याखालील काळी वर्तुळे, चेहऱ्यावरील डाग, थकलेल्या त्वचेला फ्रेश करण्याचे काम काकडी करते. काकडी किसून तिचा किस चेहऱ्याला लावून मस्त 15 ते 20 मिनिटे ठेवा.चेहरा स्वच्छ धुवून घ्या छान फ्रेश वाटेल.
तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील टॅन काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर टोमॅटो लावायलाच हवा. टोमॅटोचा गर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे. तुम्हाला रिफ्रेशिंग तर वाटेलच. तुमचे टॅनही कमी होईल आणि तुमची त्वचा होईल सिल्की स्मुथ.
तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी अंड हा उत्तम इलाज आहे. शक्य असल्यास एका अंड्याचा पांढरा बलक घेऊन तो तुम्ही तुमच्या ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. ब्लॅक हेड्समास्कप्रमाणे तुम्हाला तुमचे ब्लॅकहेड्स निघायला हवे असतील तर तुम्ही थोडा जाड थर लावा. तो निघण्यासाठी त्यावर टिश्यू पेपर लावा आणि एका फटक्यात ओढून काढा तुम्हाला तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स गेल्याचे जाणवेल.
फ्रिजरमधील बर्फ ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला थंडावा तर देतेच पण तुमच्या त्वचेसाठीही ती खूप चांगली आहे. तुम्ही तुमचा चेहरा नीट निरखून पाहा जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खड्डे दिसत असतील तर ते ‘ओपन पोअर्स’ आहेत. तुम्ही ते घालवू शकत नाही पण कमी करु शकता. तुम्हाला रोज तुमच्या चेहऱ्याला एक तरी बर्फ चोळायचा आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुम्ही आवर्जुन बर्फ लावून तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स बंद करा.
घरगुती उपचार सुरु करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती करुन घेणेही गरजेचे असते. त्या गोष्टी कोणत्या ते आधी आपण पाहुया.
सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे माहीत हवे. जर तुम्हाला ते माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार आधी जाणून घ्या. जर तुमची त्वचा तेलकट स्वरुपाची असेल तर तुम्ही घरगुती वस्तूंचा वापर करताना तुमची त्वचा अधिक तेलकट करणार तर नाही ना ? याचा विचार करणे आवश्यक असते. नाहीतर तुमच्या त्वचेला अधिक मुरुम येण्याची शक्यता असते. त्यामुळे काहीही वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार नेमका कोणता आहे याची माहिती करुन घ्या.
तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता अजूनही ओळखता येत नाही? मग वाचा या सोप्या टीप्स
आता ज्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या त्वचेच्या प्रकार कोणता ? हे माहीत करुन घेणे गरजेचे असते अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही कोणत्या वयोगटात मोडता याचा विचार करणेही आवश्यक आहे. तुमच्या वयोमानानुसार तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वयाचाही विचार करायला हवा.
चांगली त्वचा हवी म्हणून तुम्ही काहीही करत असाल तर थोडं थांबा कारण तुम्हाला नेमके त्वचेसंदर्भातील कोणते त्रास आहेत हे जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला पिंपल्स असतील पण तुम्ही काळवंडलेला चेहरा पूर्ववत करण्याचा इलाज करत असाल तर त्याचा काडीमात्र फायदा तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही. पिंपल्स कमी व्हायचे सोडून तुमच्या चुकीच्या अवलंबण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला त्वचेच्या इतर तक्रारी होऊ शकतात.
घरगुती उपचार सुरु करण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्टी माहीत हवी की, जर तुम्ही आधीच त्वचेसाठी काही उपचार घेत असाल तर अचानक घरगुती गोष्टींचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर करणे चांगले नाही. तुमच्यासाठी स्किनस्पेशलिस्टचा इलाज हा सर्वोत्तम आहे. त्यामुळे तुम्ही लगेचच घरगुती इलाज सुरुु करु नका.
ज्या प्रमाणे इतरांची औषध तुम्ही घेऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुमचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतल्याशिवाय तुम्ही कोणताही इलाज करु नका. उदा. एखाद्याला हळदीची एलर्जी असू शकते. त्याच्या वापरामुळे पुरळ, पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कशापासून एलर्जी आहे, हे लक्षात घेऊन इलाज करायला घ्या.
वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखूनच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर प्रयोग करायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा, तुमचे वय या सगळ्याचा विचार करुन मगच तुम्ही तुमच्या चेहऱ्याला शोभणारे पदार्थ लावा.
त्वचा ही नाजूक असते. त्यामुळे त्वचा चांगली होण्यासाठी सतत प्रयोग करणे हे वाईट आहे.त्यामुळे आठवड्यातून तुम्ही दोनदा हा प्रयोग करुन पाहायला हवा जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही विचारपूर्वक हा प्रयोग करा.
(सौजन्य-shutterstock)
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काह