ADVERTISEMENT
home / Festive
Navratri साठी खास 20 Outfit Ideas

Navratri साठी खास 20 Outfit Ideas

गणपतीनंतर आता वेळ आहे नवरात्रीत देवीचा जागर करण्याची. पण देवीच्या भक्तीबरोबरच नवरात्रीत उत्साह असतो तो गरबा आणि दांडियाचाही. सगळीकडे रंगीबेरंगी लाईट्स आणि सुंदर नवरात्री स्पेशल लुक्समधील गरबा नृत्य करणाऱ्यांना पाहून उत्सवाला खरा रंग चढतो. गरबा किंवा दांडियाला जाताना प्रत्येकीचीच इच्छा असते की आपण हटके आणि आकर्षक दिसावं. त्यामुळे अनेक दिवस आधीच अनेकींची तयारी सुरू होते. काहीजणी नवरात्रीत ट्रेडीशनल लुकला पसंती देतात तर काहीजणी फ्युजन लुकला. तुम्हाला जर अजूनही नवरात्रीत नक्की कोणतं आऊटफिट घालावं असा प्रश्न पडला असेल तर POPxoMarathi घेऊन आलं आहे 20 Outfit Ideas. मग या आयडियाज पाहा आणि तयार व्हा रास गरबा आणि दांडिया करायला.

नवरात्रीसाठी खास 20 Outfit Ideas

नवरात्रीसाठी खरंतर प्रत्येक जण उत्सुक असतो. त्यामुळे प्रत्येकीलाच या नऊ दिवसांमध्ये छान दिसायचं असतं. मग तुम्हीही या आऊटफिट आयडियाज पाहा आणि नवरात्रीचे नऊ दिवस छान साजरे करा.

1. पारंपारिक घागरा विथ ट्विस्ट

Instagaram

ADVERTISEMENT

नवरात्रीतील गरबा आणि दांडिया म्हंटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते रंगीबेरंगी घागरे आणि चनिया चोली. हाही घागरा आणि चोली आहे पण विथ लिटील ट्वीस्ट. कारण याला आहे रफल लेयर. त्यामुळे हा घागरा खूपच घेरदार आणि कलरफुल आहे. तसंच याच्या चोळीवर मिरर वर्क आहे. त्यासोबत घातलेल्या पारंपारिक ऑक्सीडाईज्ड ज्वेलरीने याला कंप्लीट लुक आला आहे. त्यामुळे टिपीकल पारंपारिक लुक नसूनही ही घागरा चोळी अगदी नवरात्रीच्या गरब्यात उठून दिसेल यात नवल नाही.

Chaitra Navratri Wishes in Hindi

पारंपारिक गुजराती घागरा-चोली

Instagram

ADVERTISEMENT

हे आहेत पारंपारिक कच्छी वर्क असलेले घागरा आणि चोली. ज्यावर छान मिरर वर्क आणि पोमपोम गोंडे लावलेले आहेत. नवरात्रीत परिपूर्ण लुकसाठी तुम्ही अशी भरपूर कच्छी वर्क असलेली घागरा चोळी घालू शकता. जर तुम्हाला अशा कपड्यांचा नंतर वापर नसेल तर ते भाड्यानेही विकत घेता येतील. कारण नवरात्रीच्या फॅशनमध्ये केडीया, मिरर वर्क आणि पोमपोमवाल्या चनिया-चोलीला जास्त मागणी असते.

Navratri ke Bhajan in Hindi

ब्लॅक इज राईट

Instagram

ADVERTISEMENT

जर तुम्हाला जास्त कलरफुल किंवा हेवी लुक घागरा चोली नको असेल तर तुम्ही हा लुक करू शकता. हा काळा रंगाचा घागरा-चोली तुम्ही घातल्यास गरबा नाईटला तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष नक्कीच वेधलं जाईल. लेस आणि पोमपोम वर्क असलेला हा घागरा आणि कोल्ड शोल्डरची चोली तुम्हाला अगदी हॅपनिंग लुक देईल. त्यावर तुम्ही ऑक्सीडाईज्ड ज्वेलरी किंवा स्टेटमेंट ज्वेलरीही घालू शकता.

वाचा – नवरात्रीच्या 9 रंगांचे नक्की काय आहे महत्त्व, जाणून घ्या नवरात्रीचे नऊ रंग

इंद्रधनुष्यी घागरा आणि प्लेन चोली

Instagram

ADVERTISEMENT

रेन्बो कलरमधला हा घागरा आणि त्यावर प्लेन चोली असलेलं हे आऊटफिट सध्या ऑनलाईन मार्केटमध्ये ट्रेंड करतंय. कोणतंही कच्छी काम नसलेला आणि मिरर वर्क नसलेला हा घागरा फक्त यावरील रंगसंगतीमुळे उठून दिसतो. त्यावर पारंपारिक नवरात्री ज्वेलरी घातली की तुमचा लुक कंप्लीट झाला.

हटके असा इक्कतचा घागरा

Instagram

नेहमीच्या पारंपारिक कच्छी वर्कला थोडा बाजूला ठेवत या लुकमधील घागरा आहे इक्कतचा. या लुकमध्ये फक्त चोलीवर कच्छी वर्क केलेलं दिसत आहे. त्यावर पेअर अप केली आहे स्टेटमेंट ज्वेलरी. जसं गळ्यातील मोठा फॅब्रिकपासून बनवलेला नेकपीस, हातातील मेटल कडाज आणि ऑक्सीडाईज्ड रिंग्ज. मोठी टिकलीसुद्धा अशा लुकवर आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

धोती पँट आणि टॉप

Instagram

केडिया म्हणजे कवड्यासोबत धोती पँटची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. गरब्यामध्ये लेहंग्याऐवजी कवड्यांचं वर्क असलेली धोती पँट तुम्ही घालू शकता. हे पारंपारिकही दिसतं आणि सुंदरही. कच्छी वर्क आणि घेरदार स्लीव्ह्स अशा कॉन्ट्रास्ट कलर्समधील हा धोती आणि टॉप लुक तुमच्यावर नक्कीच चांगला दिसेल. त्यावर बीड्स किंवा पारंपारिक ज्वेलरीतील मोठे झुमके आणि नेकपीसने हा लुक पूर्ण होईल.

नवरात्रीसाठी नवा रंग

ADVERTISEMENT

Instagram

हा आहे चणिया चोळीतील नवा रंग म्हणजे पांढरा. रंगीबेरंगी घागरा-चोली सगळेच घालतात. पण ही आहे पांढऱ्या रंगातील घागरा चोली. ज्यावर कलरफुल मिरर वर्क केलं आहे. यावर घातलेल्या पारंपारिक ऑक्सीडाईज्ड ज्वेलरीने याला सुंदर लुक आला आहे. तुम्हीही असं काही हटके नवरात्री आऊटफिट नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही हवं असल्यास एखाद्या निऑन शेडलाही पसंती देऊ शकता.

ओपन घागरा आणि जीन्स

Instagram

ADVERTISEMENT

पारंपारिक घागरा चोलीला अजून एक चांगला पर्याय आहे हा वरील आऊटफिट. ज्यामध्ये ओपन घागरासोबत जीन्स असं कॉम्बो केलं आहे. फुल स्लीव्ह्ज चोली त्यावर कच्छी वर्क आणि तसंच वर्क घागऱ्यावर. पण हा आहे ओपन घागरा. ज्यामध्ये तुम्हाला गरबा खेळताना अवघडल्यासारखंही होणार नाही. मग यंदा असा हटके घागरा आणि पारंपारिक ज्वेलरी असं कॉम्बिनेशन करायला हरकत नाही.

गरबा प्रिंट चनिया-चोली

Instagram

नवरात्रीत यंदा सर्वात जास्त मागणी आहे ती गरबा प्रिंट असलेल्या चनिया-चोलीला. हलक्या रंगातील लेहंग्यावर भडक रंगाची प्रिंट जास्त उठून दिसते. यावर तुम्ही मल्टीकलर दुपट्टा किंवा चोली असं कॉम्बिनेशनही करू शकता. पण शक्यतो जर तुम्ही भडक रंगाचा लेहंगा घालणार असाल तर त्यावर हलक्या रंगाची चोली जास्त छान दिसते.

ADVERTISEMENT

लेहरिया प्रिंट कुर्ता

Instagram

जर तुम्हाला घागरा-चोली असा पारंपारिक लुक न करता सुटसुटीत आऊटफिट हवं असल्यास तुम्ही वरील लुक करू शकता. असा फुल लेंथ कुर्ता जो निऑन रंगात असून लेहरिया प्रिंटमध्ये आहे. नवरात्रीत खूपच छान दिसेल. त्यावर तुम्ही केवडीया म्हणजे कवड्यांची आणि पोमपोम किंवा टॅसल ज्वेलरी पेअरअप करू शकता.

सिल्क गाऊन आणि गोल्डन दुपट्टा

ADVERTISEMENT

Instagram

काही जणींना टिपीकल नवरात्री लुक आवडेलच असं नाही. त्यांच्यासाठी हा लुक आहे. या लुकमध्ये तेजस्विनीप्रमाणे तुम्ही डार्क कलरमधील थोडा ट्रे़डीशनल पण स्लिव्हलेस सिल्क गाऊन आणि त्यावर नेटची गोल्डन ओढणी पेअर करू शकता. या लुकवर तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी घातली तरी पुरेशी आहे.

साऊथ कॉटन स्कर्ट आणि ब्लाऊज

Instagram

ADVERTISEMENT

अभिज्ञाचा हा लुक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे महाराष्ट्र आणि गुजरातचं. कारण हा नवरात्रीत छानही दिसेल आणि नंतरही एखाद्या फॅमिली फंक्शनलाही वापरता येईल. हा साऊथ कॉटनचा हटके लुक असलेला ब्लाऊज आणि स्कर्ट फारच सुंदर आणि एलिगंट आहे. जो फुल स्लीव्ह्ज असल्याने अभिज्ञानेही फक्त स्टेटमेंट इयररिंग्ज घातल्या आहेत.

कुर्ता आणि कच्छी वर्क जॅकेट

Instagram

जर तुम्हाला अगदीच हेवी लुक नको असेल आणि ऑफिसहून थेट गरबा खेळायला जायचं असेल तर वरील पर्याय उत्तम आहे. एखाद्या कलरफुल किंवा व्हाईट कुर्त्यावर कच्छी वर्क किंवा मिरर वर्क असलेलं हाफ जॅकेट घालणे. हा लुक तुम्ही अगदी पटकन करू शकता आणि सोप्यारितीने कॅरीही करू शकता. यावर तुम्ही ऑक्सीडाईज्ड ज्वेलरी घालून मस्तपैकी फ्युजन लुक करू शकता.

ADVERTISEMENT

फाल्गुनी पाठक लुक

Instagram

फाल्गुनी पाठक आणि नवरात्री हे तर नावाजलेलं कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला कुर्ताही घालायचा नसेल तर तुम्ही फाल्गुनी यांच्याप्रमाणे जीन्स आणि कॉटन शॉर्ट कुर्ती किंवा शर्टवर असं हेवी जॅकेट घालू शकता. यावरही तुम्ही थोडा फ्युजन लुक देण्यासाठी चेन असलेले किंवा हेवी झुमके घालू शकता. अजून पारंपारिक टच देण्यासाठी भरपूर मेटल बांगड्याही घालू शकता.

ग्लिटर ब्लॅक गरारा

ADVERTISEMENT

Instagram

टेलीव्हिजनवरील आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री मौनी रॉयचा हा लुक गरबा पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा गरारा किंवा शरारा म्हणून ओळखलं जाणारं सुंदर आऊटफिट घातलं आहे. मौनीने यावर नेकला मिरर वर्क असल्याने नेकपीस न घालता स्टेटमेंट इयररिंग्स आणि हातात कडं घातलं आहे.

हेवी पंजाबी ड्रेस

Instagram

ADVERTISEMENT

जर तुमच्याकडे शराऱ्याचा ऑप्शन नसेल तर नो प्रोब्लेम. तुम्ही बॉलीवूडची लोलो करिश्मा कपूरप्रमाणे वेलवेट फॅब्रिक आणि हेवी वर्क असलेला असा पंजाबी ड्रेस घालू शकता. करिश्माप्रमाणे तुम्ही यावर फक्त स्टेटमेंट इयररिंग्ज आणि रिंग्जही घालू शकता.

डिझाईनर साडी

Instagram

जर तुम्हाला साडीची आवड असेल तर तुम्ही सध्या ट्रेंडमध्ये असलेली अशी बादला वर्क केलेली ग्लिटरी साडीही नवरात्रीसाठी नेसू शकता. या साडीने तुम्हाला अगदी नवरात्रीला हवा तसा झगमग लुकही मिळेल. कारण का हे वर्क नवरात्रीच्या लाईटिंगमध्ये उठून दिसेल. नंतरही अशी साडी तुम्हाला एखाद्या पार्टीला घालता येईल.

ADVERTISEMENT

प्युअर सिल्क साडी

Instagram

जर तुम्हाला ग्लिटरी किंवा डिझाईनर साड्या आवडत नसतील तर तुम्ही प्राजक्ता माळीसारखी एखादी प्युअर  सिल्क साडीसुद्धा नेसू शकता. ज्यावर तुम्ही देवी असलेली टेंपल ज्वेलरी किंवा मोठ्या आकाराची फ्युजन फॅब्रिक ज्वेलरी पेअर अप करून हटके लुक देऊ शकता.

लाँग गाऊन आणि जॅकेट

ADVERTISEMENT

Instagram

कुर्ती, पंजाबी ड्रेस किंवा साडी यापैकी कोणताही पर्याय तुम्हाला सूटेबल नसेल तर वरील लुक तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हीही स्पृहासारखा लाँंग गाऊन आणि त्यावर कट वर्क असलेलं जॅकेट असा लुक करू शकता. हे आऊटफिट तुम्हाला नवरात्रीतही वापरता येईल आणि त्यानंतरही. सध्या या प्रकारच्या जॅकेट्सची फॅशन ट्रेंडमध्ये आहे.

बेस्ट फ्युजन लुक

Instagram

ADVERTISEMENT

सगळ्यात छान, सुटसुटीत आणि तरीही नवरात्रीसाठी सुंदर असणारा हा पूजा सावंतसारखा लुक. ट्यूब पॅटर्नमधला हा वनपीस आणि त्यावर ऑक्सीडाईज्ड ज्वेलरी फारच सुंदर दिसतेय. हे आऊटफिट दिसायला ग्लॅमरसही आहे आणि फेस्टीव्ह टच असलेलं आहे.

हेही वाचा –

नवरात्रीला स्पेशल दिसण्यासाठी ‘9’ प्रकारच्या पारंपरिक साड्या

नवरात्रीसाठी मुंबईत कुठे करता येईल मनसोक्त शॉपिंग

ADVERTISEMENT

मुंबईत नक्की कुठे साजरा कराल नवरात्रौत्सव

प्रत्येकाला माहीत हव्या #Navratri शी निगडीत या गोष्टी

26 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT