ADVERTISEMENT
home / Fitness
योग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, अन्यथा होईल नुकसान

योग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, अन्यथा होईल नुकसान

आरोग्य ही खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची संपत्ती आहे. आरोग्य जपणं सर्वात महत्त्वाचं. त्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करतात. पण बरेच जण योग करण्याला जास्त प्राधान्य देतात. योग आपल्या शरीराच्या तंदुरूस्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण योग करण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवणंदेखील अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला याविषयी माहीत आहे का? हे नियम न पाळल्यास योगाचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे नक्की कोणत्या वेळी योग करायचा आणि काय करू नये याविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. योग्यप्रकारे योग करण्यासाठी योगावरील पुस्तकं वाचायला हवी, ते वाचून सुद्धा तुंम्ही योग शिकुन योग्य प्रकारे करू शकतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग करताना आरामदायी कपडे घालायला हवेत. कोणत्याही प्रकारचे टोचणारे अथवा अतिशय घट्ट कपडे घालू नयेत. तसंच तुम्ही कोणतेही दागिने घातले असतील तर तेदेखील काढून ठेवावे. तसंच खुल्या वातावरणात योग केल्यास, त्याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. तसंच कोणतंही आसन करताना ते पूर्ण करावं. लगेच दुसरं आसन करायला जाऊ नये. आता पाहूया नक्की कोणते आहेत ते महत्त्वाचे नियम –

1. थंडगार पाणी पिणं टाळा

Shutterstock

योग करत असताना थंडगार पाणी पिणं टाळावं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण योग करताना शरीरात उष्णता निर्माण होते आणि असं असताना थंडगार पाणी प्यायल्यास, तुम्हाला सर्दी,  खोकला आणि अलर्जीसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला तहान लागल्यास, तुम्ही गरम अथवा साधं पाणी प्या.

ADVERTISEMENT

2. पोट भरलं असताना योग करू नये

जेव्हा तुमचं पोट भरलेलं असतं तेव्हा योग करणं योग्य नाही. सकाळ आणि संध्याकाळी जेऊन झाल्यानंतर योग करू नये. सकाळी योग करायला जमत नसेल आणि संध्याकाळी तुम्ही योग करत असाल तर तुमचा आहार आणि योग यामध्ये किमान तीन तासांचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही संध्याकाळी योग करत असाल तर तुम्हाला त्यामुळे ऊर्जा आणि शांतता मिळते. काही योगासनं ही शांत आणि सशक्त असतात त्यामुळे संध्याकाळ अथवा रात्रीच्या वेळेत त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं

3. शरीराची योग्य तयारी करणं आवश्यक

Shutterstock

ADVERTISEMENT

योगासनाचे प्रकार करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीराचं वॉर्मअप करणं आवश्यक आहे. यामुळे शरीरामध्ये थोडी उष्णता निर्माण होऊन तुम्ही व्यवस्थित योग करू शकाल. तसंच तुम्ही हलका व्यायाम आणि आसनं करू शकता. कधीही लगेचच योग करू नये. योग करण्यासाठी लागणारी उष्णता वॉर्मअप केल्याने निर्माण होते.

4. आजार असताना योग करू नये

तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला अंगात ताप असेल तर योग करू नये. तसंच कोणताही गंभीर आजार असेल तरीही योग करू नये. त्यामुळे शरीराला अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी

5. लगेच आंघोळ करू नये

ADVERTISEMENT

Shutterstock

योग करून झाल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. योग करताना शरीर उष्ण होते. त्यामुळे लगेच जाऊन आंघोळ केल्यास, शरीरावर दुष्परिणाम होतात. सहसा असं करणं टाळा. योग केल्यानंतर साधारण एक तासाने आंघोळ करणं योग्य ठरेल.

6. योग करताना मूत्रविसर्जन टाळा

योग करताना मूत्रविसर्जन टाळा. कारण योग करताना पाणी हे घामाद्वारे शरीराच्या बाहेर पडणं गरेजचं असतं. त्यामुळे मूत्रविसर्जन करणं टाळा.

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

ADVERTISEMENT

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

19 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT