एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या आणि ऐश आरामात जीवन जगणाऱ्या सेलिब्रिटींवरही अनेकदा आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळते आणि त्याचं आयुष्य कधी राजापासून रंक होतं हे त्यालाही कळत नाही. कधी पैशाचे नियोजन चुकणे तर कधी वयपरत्वे काम मिळणे बंद होणे या सगळ्यामुळे आर्थिक संकट हे अनेकांना सोसावे लागले आहे. पण आपल्या देशात असे काही सेलिब्रिटी आहे जे एकमेकांसाठी धावून येतात. आता नेहा कक्करच बघा ना तिने ज्येष्ठ गायक आणि गीतकार संतोष आनंद यांना तब्बल 5 लाख रुपयांची मदत केली आहे. गीतकार संतोष आनंद कोण? आणि नेहा त्यांच्या मदतीला का धावून आली ते जाणून घेऊया
मराठी चित्रपटातून जया बच्चन करणार कमबॅक
एकेकाळी गायली प्रसिद्ध गाणी
‘एक प्यार का नगमा है’ सारखी गाणी लिहिणारे संतोष आनंद सध्या परिस्थितीशी झगडा देत आहे. त्यांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणताही नवा पैसा राहिलेला नाही. शिवाय या वयात काम कोणी देत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज चुकते करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसा नाही. अशा परिस्थतीत नेहा कक्करने ज्येष्ठ संगीतकाराची बाजू सावरुन घेण्यासाठी त्यांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत त्यांना पुरेशी पडणार नाही. म्हणूनच तिने सगळ्या लोकांनाही आवाहन करत ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून त्यांना मदत करण्यास सांगितले आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवर हा सगळा किस्सा घडला. त्यावेळी त्यांना काम देण्यासाठी संगीतकार विशाल ददलानाही पुढे सरसावला त्यानेही मदतीचा हात पुढे करत त्यांना गाणी देण्याची विनंती केली आहे. शिवाय ही गाणी प्रसिद्ध करण्याची जबाबदारी विशालने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
कला आणि चित्रपटातील योगदानासाठी आर माधवनला मिळाला सन्मान
संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव
लक्ष्मीकांत- प्यारेलाल ही प्रसिद्ध जोडी आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी गायलेली गाणी आतापर्यंत अनेकांनी ऐकली आहेत. यंदा इंडियन आयडॉलमध्ये संगीतकार प्यारेलाल आले आहेत. त्यांच्यासोबतच या कार्यक्रमात संतोष आनंद आले आहेत. त्यावेळीच त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कळले. त्याची जीवनकहाणी आणि आताचा संघर्ष ऐकून नेहा कक्करच्या डोळ्यातही पाणी आले आहे. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत जाहीर केली.
नेहा कक्करला इंडियन आयडॉलने घडवले
इंडियन आयडॉलच्या प्लॅटफॉर्मवरुनच नेहा कक्करचे करिअर घडले आहे. याच रिअॅलिटी शोमधून तिने आपले करिअर केले आहे. या माध्यमातून तिने अमाप प्रसिद्धी मिळवली. नेहा कक्करने या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नेहाने हा रिअॅलिटी शो केल्यापासून बॉलिवूडच्या कित्येक चित्रपटांसाठी प्ले बॅक सिंगिग केले आहे. तिची अनेक गाणी प्रसिद्ध आहे.तिने नुकतेच रोहनप्रीत या पंजाबी गायकाशी लग्नगाठ बांधली असून तिने लॉकडाऊनच्या काळात तिचा दिमाखदार लग्नसोहळा केला. नेहाच्या नव्या बाजूमुळे तिचे फॅन्स फार खुश आहेत. कलाकाराने कलाकाराला मदत करणे हे फार महत्वाचे आहे. अनेक कलाकारांची मदत करण्यासाठी खूप जणांनी बरेच काही केले आहे. आता त्यामध्ये नेहा कक्करचे नाव जोडले जाणार आहे.
दरम्यान, इंडियन आयडॉलचा हा एपिसोड फारच भावनिक असणार आहे.
तू सौभाग्यवती हो’ मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण