ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Newborn Baby Announcement Message In Marathi

नवजात बाळाच्या जन्माच्या घोषणेसाठी संदेश | Newborn Baby Announcement Message In Marathi

घरात बाळाचा जन्म झाल्यावर नुसता आनंदी आनंद पसरतो. हल्ली नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने घोषणा करताना पाहिले आहे. बाळाच्या जन्माची घोषणा करण्यासाठी वेगवेगळे संदेश (Newborn Baby Announcement Message In Marathi) मराठीतून आपल्याला वाचायला मिळतात. तुम्हालाही तुमच्या नवजात बाळाच्या जन्माची घोषणा करायची असेल तर मराठीतून काही विशिष्ट आणि खास संदेश आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. आपलं बाळ म्हणजे आपला आनंद असतो आणि तो सगळ्यांबरोबर शेअर करण्यासाठी तसा खास क्षणही असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर सर्वांसोबत हा आनंद आपल्याला साजरा करायचा असतो आणि त्यासाठी नवजात बाळाच्या जन्माच्या घोषणेसाठी काही खास संदेशही आपण देत असतो. असेच काही खास घोषणा संदेश तुमच्यासाठी. 

नवजात बाळ जन्म घोषणा संदेश – Newborn Baby Announcement Message In Marathi

Newborn baby announcement message in marathi
Newborn Baby Announcement Message In Marathi

नवजात बाळ घरात जन्माला आलं की आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्या बाळाचा जन्म झालाय हा आनंद आपल्याला सर्वांनाच सांगायचा असतो. प्रत्येकाला मेसेज करणं शक्य नसतं. आजकाल बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सोशल मीडिया असो अथवा व्हॉट्स अप स्टेटस असो तुम्हाला त्यावरूनही हे सांगता येतं. पण हे सांगण्यासाठी बाळाचे आगमन संदेश काय असायला हवेत असा प्रश्न पडतो. तर नवजात बाळाच्या जन्माच्या घोषणेसाठी संदेश खास तुमच्यासाठी. बाळ जन्माला आलं की त्याची बेडरूमही तयार करावी लागते. अशावेळी आपण वास्तू टिप्सही जाणून घेतो. नवजात बाळाच्या बेडरूमसाठी खास वास्तू टिप्सही असतात. पण त्याआधी त्या बाळाचं स्वागत करायची तयारी सुरू होते ती त्याच्या जन्माच्या घोषणेपासून. असेच काही संदेश पाहूया.

1. घरात आला पाहुणा खास 
ज्याची होती कायमची आस
आई वडील झालो आम्ही
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी 

2. इवल्याशा पावलांना पाहून 
गेले मन भारावून 
आई वडील होण्याचा आनंद आहे खास 
याचीच होती आम्हाला इतके वर्ष आस 
Its Baby Girl 

ADVERTISEMENT

3. तुझ्या येण्याने आला बहर 
आनंदाचा झालाय कहर 
गगनात मावेनासा झालाय आमच्या आनंद
तूच आमचा सर्वानंद 
Its Baby Boy 

4. फुटली नवी पालवी 
आला नवा बहर 
आमच्या आयुष्यात आली आहे 
एक गोडशी परी 
तुमच्या आशिर्वादाची आहे गरज 

5. आतुरतेने पाहत होतो ज्या क्षणाची वाट 
अवतरली आहे आज ती पहाट 
घरी आली लक्ष्मी 
सुख समृद्धी आणि समाधानाच्या आल्या लहरी 

6. होतं तुझं माझं आयुष्य
होताच तसा सुखाचा संसार
पण संसार झालाज आज पूर्ण 
मुलाच्या जन्माने झालो संपूर्ण 

ADVERTISEMENT

7. कधीपासून होतो पाहात 
तुझीच वाट 
तुझ्या येण्याने बहरलाय 
संसाराचा थाट 
आम्ही गोंडस मुलाचे आई – बाबा झालोय 

8. इतक्या महिन्यांची वाट बघणं 
आता झालंय पूर्ण 
तुझं या जगात स्वागत आहे बाळा! 
आम्ही झालोय मुलाचे आई वडील

9. स्वप्नंही खरी होतात
घरी आली आहे एक लहान परी
तुमचा आशिर्वाद तिला लाभो हीच सदिच्छा!

10. या जगात येऊन मला खूपच आनंद होतोय
मी जन्म घेतला आहे आणि त्यामुळेच
घरात सगळीकडे आनंद पसरला आहे
माझं नाव आहे…..

ADVERTISEMENT

11. आमच्या आयुष्यातील नव्या प्रेमाचे करा स्वागत
आमच्या आयुष्यातील नवीन पाहुण्याचे झाले आहे आगमन 

12. आमचा छोटा मुलगा जन्माला आलाय
यापेक्षा अधिक आनंद काही असून शकत नाही
तुमच्या आशिर्वादाची गरज आहे 

13. निळ्या रंगाची झाली आहे उधळण
घरी आला आहे कृष्ण सावळा 

14. कधीपासून तुझ्या येण्याची तयारी होती सुरू
अखेर तो क्षण झाला आहे रूजू
आम्ही झालो आहोत आई – वडील
घरात आली आहे एक गोड परी 

ADVERTISEMENT

15. माझ्या हृदयावर राज्य करणारी
अशी गोड परी आली आहे जन्माला
झालो आई – बाप आता 
आली आहे सुखाची चादर वाट्याला

16. तीच माझी साखर
तीच माझं तिखट 
तिच्यामुळेच आयुष्यात आलाय गोडवा 
अशी माझी गोंडस मूरत 

17. आमचं घर आता दोन पायांनी वाढलं आहे
घरात नवं बाळ जन्माला आलं आहे 

18. आमच्या आनंदात जगानेही व्हावं सामील
घरात आला आहे बाळ राहील 

ADVERTISEMENT

19. झोपमोड होण्याची, डायपर बदलण्याची आणि अमाप प्रेम करण्याची 
वेळ आली आहे
घरात लहान परी आली आहे

20. घरात लहान मूल असावं 
प्रत्येकालाच वाटतं
आम्हीही असेच नशीबवान ठरलो असून 
घरात आला आहे एक लहान पाहुणा 

वाचा – Funny Dohale Jevan Wishes In Marathi

मुलीच्या जन्माच्या घोषणेसाठी संदेश | Newborn Baby Girl Announcement Message In Marathi

Newborn Baby Girl Announcement Message In Marathi
Newborn Baby Girl Announcement Message In Marathi

मुलीचा जन्म हा कित्येक घरात लक्ष्मीचा जन्म मानला जातो. लक्ष्मीच्या पावलानी मुलगी येते आणि घरादारामध्ये सुखसमृद्धी निर्माण करते असं म्हटलं जातं. नवजात बालकाचे पालकत्व काही सोपे नसते. आपल्या घरात मुलींना अधिक महत्व दिले जाते अशाच मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या जन्माची घोषणा कशी करायची यासाठी काही संदेश. बाळाच्या जन्माचे संदेश (New Baby Born Wishes In Marathi)

ADVERTISEMENT

1. रंगबेरंगी इंध्रधनुष्य
विधात्याने निर्माण केलेली अमूल्य अशी ठेव 
आई – वडिलांना अभिमान वाटावा अशी परी 
कन्यारत्नाचा झालाय लाभ

2. डोळ्यात जिच्या स्वप्न अपरंपार
अशी परी आली आहे 
जी करेल सुखांनी युक्त घरदार 

3. मिळाला आहे जन्माचा अमूल्य ठेवा 
घरी आली आहे अप्सरा 

4. इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
अमूल्य अशी परी आली आहे माझ्या पदरात 

ADVERTISEMENT

5. आई होणार समजलं जेव्हा
बाप म्हणूनही केली होती प्रार्थना
जन्म तुझाच व्हावा म्हणून केला होता धावा 
अशाच परीचा जन्म झाला 

6. आम्ही दोघंही 
स्वागत करत आहोत एका छोट्याशा परीचं
तुमच्या आशिर्वादाचीही आहे तिला गरज 

7. देवाने परीच्या रूपात 
दिले आहे एक बक्षीस भेट आम्हाला 

8. तिच्या येण्याने गजबजलं आहे घर 
तिच्या येण्याने झालं आहे संपूर्ण आमचं जग 

ADVERTISEMENT

9. ज्या क्षणाची आतुरतेने पाहत होतो वाट
घेऊन आली आहे परी तिचा वेगळाच थाट 

10. पहिला आवाज ऐकल्यानंतरच झाले मी वेडी 
पाडली जिने आई – वडिलांना भुरळ
अशी परी आली आहे दारी 

11. स्वर्गातील एक लहानसा तुकडा
देवाने पाठवला आहे माझ्या घरी 
आली आहे जीवनात आमच्या 
छोटीशी गोंडस परी 

12. कोण म्हणतं चमत्कार होत नाही
आमच्या हातात नऊ महिन्यानंतर 
आला आहे एक चमत्कार
लहानशा पिटुकल्या पावलानी 
लक्ष्मी आली पदरी 

ADVERTISEMENT

13. ही वेळ आहे नव्या घोषणेची 
घरी आलेल्या नव्या परीच्या आगमनाची

14. तिला पाहिलं आणि सर्व काही हरखून जायला झालं
सुख नक्की कशाला म्हणतात हे तिच्या जन्म झाल्यावर कळलं 

15. आमचं आयुष्य बदलायला 
आली आहे एक नवी परी 

16. आगमनाने जिच्या घरात आला आहे आनंद 
अशीच परी जिच्यामुळे न्हाऊन निघाले आहे सारे घर 

ADVERTISEMENT

17. दोघंही होतो आनंदी
पण तिच्या येण्याने आनंदाचा खरा अर्थ कळला आहे
आज आमचं आयुष्य झालं आहे पूर्ण
घरात झालं आहे परीचं आगमन 

18. करायची आहे महत्त्वाची घोषणा
आली आहे परी आमच्या घरा 

19. आजचा दिवस आहे खास 
परीच्या जन्माने झाला आहे दिवस झकास 

20. आयुष्यात हवा होता जो आनंद
परीच्या येण्याने झाला आहे तो पूर्ण 

ADVERTISEMENT

वाचा – Baby Girl Quotes In Marathi

मुलाच्या जन्माच्या घोषणेसाठी संदेश | Newborn Baby Boy Announcement Message In Marathi

New Born Baby Status Marathi
New Born Baby Status Marathi

आजही आपल्याकडे मुलाचा जन्म हा कुलदीपक समजण्यात येतो. अर्थात मुलं असो वा मुली. दोघेही समानच आहेत. मुलाच्या जन्माची घोषणा करण्यासाठी काही खास संदेश (New Baby Born Wishes In Marathi).

1. छोटीशी बोटं, छोटेसे हात 
इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात 
घरात आला आहे लाडोबा
हवी आहे तुमच्या आशिर्वादाची साथ 

2. तुझ्या येण्याची पाहत होतो वाट
अखेर आला तो दिवस खास 
झाला आहे घरात छोट्या राजाचा जन्म 

ADVERTISEMENT

3. घर आधीही होतं आनंद
पण आता हा आनंद झाला आहे द्विगुणित 
राजकुमाराच्या येण्याने सर्व काही झाले आहे खास 

4. गेले नऊ महिने पाहात होतो वाट 
अखेर बाळराजा आले आहेत थाटात 

5. आमचं कुटुंब लागलं वाढीला
झालाय गोंडस मुलाचा जन्म 
तुमच्या आशिर्वादाची आहे गरज

6. देवाकडे आतापर्यंत काहीही नाही मागितलं
पण त्याने नेहमीच भरभरून दिलं
अशीच झोळी पुन्हा एकदा देवाने भरली आहे 
घराच झाला आहे बाळराजांचा जन्म 

ADVERTISEMENT

7. लवकर ऐकू येणार आहे आई – बाबा अशी हाक 
मुलाचा जन्म झाला आहे आज 

8. प्रेमाची उधळण करायला आला आहे कृष्ण सावळा

9. नऊ महिने सहन केले हाल
पण तुला पाहताच सर्व काही विसरायला झाले
गोंडस बाळराजे हाती जेव्हा आले 

10. आयुष्यातला एकटेपणा दूर करायला
आला आहे माझा सोन्या माझी साथ द्यायला

ADVERTISEMENT

11. कितीही नाही म्हटलं तरीही 
तुझ्या जन्माने उजळून निघाले आहे घर
मुलाच्या जन्माने आनंदाचा झालाय कहर 

12. देवाने केली कृपा 
घरी आला छोटा देवबाप्पा 

13. देव नेहमीच आपल्याला छान छान भेट देत असतो
मलाही दिली आहे आज देवाने सुंदर भेट
झाला आहे घरात बाळराजांचा जन्म 

14. माणसाला आयुष्यात अजून काय हवं
आई – वडील होण्यासारखं मोठं सुख नाही
हेच सुख आज आम्ही अनुभवतो आहोत 
झालाय मुलाच जन्म, होतोय सांगायला आनंद  

ADVERTISEMENT

15. बाळाच्या जन्माने होतो पूर्ण परिवार
सांगायला होतोय आज आनंद 
आमचा पूर्ण झालाय परिवार
झालाय मुलाचा जन्म, हवे आहेत तुमचे आशिर्वाद!

16. सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर
मिसळणार आहे त्याच्या रडण्याचा सूर 
झालाय मुलाचा जन्म आज 
आनंद गगनात माईना माझ्या आज

17. असा हा आनंद की पिटवावी दवंडी 
आलाय माझा सखा सवंगडी 

18. अजून काय हवं म्हणता म्हणता झालाय तुझा जन्म 
बाळराजाचा जन्म झालाय घर झालंय खास 

ADVERTISEMENT

19. अंगाईची करूया तयारी, झोपेची आता आसच नाही 
ज्याच्यासाठी केला इतका अट्टाहास, त्याचा जन्म झालाय आज 

20. जगाने ऐकावे पूर्ण, छोट्या महाराजांचा झाला आहे जन्म 
आहे एकमेव खास, याच्या जन्माचीच लागली होती आस

नवजात बाळ जन्म घोषणेसाठी व्हॉट्स अप स्टेटस | WhatsApp Status For New Born Baby In Marathi

New Born Baby Status Marathi
New Born Baby Status Marathi

बाळाच्या जन्मानंतर आपल्या आनंदात आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रपरिवाराला समाविष्ट करून प्रत्येकालाच घ्यायचे असते. पण प्रत्येकाला मेसेज करून अर्थात संदेश पाठवून सांगणं शक्य नसतं. आता व्हॉट्स अप स्टेटसचीही (New Born Baby Status Marathi) सोय आहे. पण व्हॉट्स अप स्टेटसमध्ये असे काय खास लिहायचे यासाठी काही संदेश 

1. आई – बाबा, आजी – आजोबांची 
इच्छा केली देवानी केली पुरी
लक्ष्मीच्या रूपाने परी आली घरी 

ADVERTISEMENT

2. होती ज्याची पाहत वाट 
झालंय छोट्या राजाचं आगमन थाटात 

3. आई – बाबा झालो
हा आनंद कशापेक्षाही मोठा असू शकत नाही 
परीचा झालाय जन्म 

4. देवाकडे प्रार्थना केली होती एकाची 
देवाने केला आनंद द्विगुणित 
जुळ्या मुलांचे झालो आहोत आई – वडील
आशिर्वाद लाभो सर्वांचे!

5. आई  आणि बाळ आहेत सुखरूप
दिला आहे गोंडस मुलाला जन्म
देवाची झाली कृपा 
आला घरी देवबाप्पा

ADVERTISEMENT

6. इवल्याशा लक्ष्मीच्या पावलांनी 
घरदार भरलं आहे 
आई आणि वडील म्हणून 
आमचा ऊर भरला आहे 

7. ज्यासाठी केला होता नऊ महिने अट्टाहास 
त्याच बाळराजाने घेतला आहे जन्म आज 

8. आनंदाची बाब
झालाय गोंडस परीचा जन्म!

9. आमच्या घरातील नव्या सभासदाचे करा स्वागत!
झालाय गोंडस मुलाचा जन्म  

ADVERTISEMENT

10. दुहरी आनंद दुहेरी घोषणा
झालाय जन्म मुलाचा आणि मुलीचा 

11. मागितले होते एक मिळाले दोन 
जुळ्या मुलींच्या जन्माने झालंय कुटुंब पूर्ण 

12. आता हवी गुलाबी रंगाची 
सवय करून घ्यायला 
कारण आली आहे अप्सरा 

13. आई – बाबा झालो
मुलाचा जन्म झाला!

ADVERTISEMENT

14. काहीतरी करायला हवं खास 
कारण मुलाचा जन्म झालाय आज 

15. काय बोलावे काही कळेना 
मुलाच्या जन्माने आनंद गगनात माईना!

16. किती सांगायचंय तुला किती सांगायचंय
झालाय परीचा जन्म ….हेच गुणगुणायचंय

17. मुलीचा जन्म झालाय….आनंदीआनंद झालाय

ADVERTISEMENT

18. मुलाच्या जन्माने आलंय उधाण 
जन्माला आलीये माझी शान!

31 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT