home / पालकत्व
Baby Girl Quotes In Marathi

छोट्या मुलीवरील कोट्स | Baby Girl Quotes In Marathi 

घरात बाळ जन्माला येणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. पूर्वी लोक फक्त मुलगा झाला तरच आनंद साजरा करायचे. पण आता तसे राहिले नाही. आता लोक मुलीच्या जन्माचाही सोहळा साजरा करतात आणि का करू नये? मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते. तिच्या इवल्याश्या सोनपावलांनी येऊन ती घरदार समृद्ध करते. मुलगी म्हणजे घरातील चैतन्य, उत्साहाचा झरा असते. आईवडिलांसाठी छोट्याश्या परीचा जन्म हा आनंददायी क्षण असतो. तिच्या पायगुणांनी घरात लक्ष्मी नांदते. आईवडिलांसाठी त्यांची छकुली म्हणजे त्यांचा जीव की प्राण असते. भावांसाठी ती मोठी झाल्यावर दुसरी आईच होते आणि वडिलांसाठी तर ती एक हळवा कोपरा असते. मुलगी आणि बाबाच्या खास नात्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. कारण बाबासाठी त्याची लेक म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा असते. मग अशा छकुलीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सगळे जण योग्य आणि छान शब्दांच्या शोधात असतात. तुम्हीही छोट्या मुलीवरील कोट्स (Baby Girl Quotes In Marathi) शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास Cute Baby Girl Quotes In Marathi चा संग्रह आणला आहे. तुम्हाला तुमच्या घरातील छोट्याश्या राजकुमारीसाठी काही छान संदेश पाठवायचा असेल तर तुम्ही खालील Quotes On Baby Girl Princess In Marathi च्या संग्रहातून काही गोड संदेश नक्कीच पाठवू शकता. 

छोट्या मुलीवरील खास कोट्स | Baby Girl Quotes In Marathi

छोट्या मुलीवरील कोटस | Baby Girl Quotes In Marathi
छोट्या मुलीवरील कोटस

मुलगी ही सगळ्या घराचा आनंद असते. तिच्या असण्याने घराला घरपण येते. ती नसली कि घर सुनं सुनं वाटतं. तिच्या बोबड्या बोलांनी, तिच्या दुडूदुडू चालण्याने सगळे घर आनंदी होते. वयाने लहान असो वा मोठी, मुलगी ही आई-वडिलांची नेहमी लाडकी असते. म्हणून तर राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. आईवडिलांच्या मनातील भावना व्यक्त करणारे छोट्या मुलीवरील खास कोट्स वाचा. 

ADVERTISEMENT

इवल्याशा पावलांनी जी घरदार सजवी, लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्धी रुजवी… अशा परीचे येणे प्रत्येक घरात व्हावे, जिच्या येण्याने आयुष्य सुंदर होऊन जावे!

जगातील सर्वात मोठ्या निर्मळ आनंदाचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर तो शब्द म्हणजे ‘लेक’. भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या आयुष्यात लेक येते. 

ADVERTISEMENT

जी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते, सर्व घर तिच्या पैंजणांनी निनादते, जिच्या बोबड्या बोलांनी मन प्रसन्न होते,  जिच्या निखळ हास्याने संपूर्ण घर झळाळते, हे सर्व सुख त्यांनाच मिळते, ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. 

नसेल ती दिवा वंशाचा, पण ती आहे दिव्यातील वात, नाव उद्गारते दोन्ही कुळांचे, मोठी होऊनी जगात.

ADVERTISEMENT

अधिक वाचा सुंदर फादर्स डे कोट्स आणि स्टेटस मराठी 2022

तिच्या केवळ अस्तित्वाने आयुष्य  बदलले, तिच्या जन्माने जीवनाचे सार्थक झाले. लेक माझी सप्तसूर माझे, ती श्वास अंतरीचा, तिच्याच मुळे कळाला अर्थ जीवनाचा. 

ADVERTISEMENT

लेक हे एक असे नाजूक फुल आहे जे केवळ भाग्यवंताच्याच अंगणात फुलते आणि सगळे घरदार सुगंधी करते. 

लेक आहे अंगणातली पवित्र तुळस, आणि तीच खरी आहे आमच्या अस्तित्वाचा कळस.

ADVERTISEMENT

लेक हा बापासाठी भार नाही तर आईबापाच्या जीवनाचा आधार आहे.

स्वर्गातील एक लहानसा तुकडा, देवाने पाठवला आहे माझ्या घरी! आमच्या जीवनात सुखाचा सागर घेऊन आलाय आहे एक छोटीशी गोंडस परी…

ADVERTISEMENT

देवाकडे आतापर्यंत काहीही नाही मागितलं, पण त्याने नेहमीच भरभरून दिलं! देवाने आमची झोळी आनंदाने भरली आहे, आमच्या घरात लेकीच्या रूपांत लक्ष्मीच आली आहे. 

अधिक वाचा मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

ADVERTISEMENT

क्युट बेबी गर्ल कोट्स मराठी | Cute Baby Girl Quotes In Marathi

क्युट बेबी गर्ल कोट्स मराठी | Cute Baby Girl Quotes In Marathi
क्युट बेबी गर्ल कोट्स मराठी

ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घराचे नशीब उजळते. केवळ भाग्यवंताच्याच घरी देव मुलगी देतो. मुलगी ही वडिलांच्या हृदयाचा तुकडा असते आणि आईची खरी मैत्रीण असते. जन्माला आल्यापासूनच तिच्यामुळे घर आनंदाने उजळून निघते. तिच्या निरागस रूपाने ती प्रत्येकाला लळा लावते. वाचा अशा निरागस गोंडस परीसाठी क्युट बेबी गर्ल कोट्स मराठी- 

लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं अंगण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण! घरात छोटीशी गोंडस परी असणं म्हणजे आनंदाचं लेणं…

ADVERTISEMENT

लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदणं , लेक रंगांचे शिंपण, लेक गंध हळवं मन! लेक म्हणजे मनाचा हळवा कोपरा, लेक म्हणजे आनंदाचा अखंड झरा!

लेक म्हणजे ईश्वराचे अनमोल देणे,लेक म्हणजे अमृताचे बोल,जिच्या अस्तित्वाने होती सगळे क्षण अनमोल… 

ADVERTISEMENT

घरात एक तरी परी असावी, एक नाजूक कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच कानी सांगावी, जिच्या असण्याने घरात आनंदाची पहाट यावी… 

लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. जिच्या सोनपावलांमुळे आहे सुखसमृद्धी या घराची… 

ADVERTISEMENT

माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा,माझी लेक म्हणजे कडकडीत उन्हातला गार वारा,माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा, माझी लेक म्हणजे आयुष्यात तेवणारा तेजस्वी दिवा!

पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, ही सोनकळी सर्वांना सुख वाटते. तिच्या असण्याने आयुष्य सुखी भासते, तिचे बोबडे बोल ऐकून मन आनंदाने नाचते… 

ADVERTISEMENT

आपल्या गोड हास्याने जी सर्व दु:ख दूर करते, 

माझी प्रिय मुलगी हे संपूर्ण घरदार आनंदाने भरते.. 

ADVERTISEMENT

देवही त्याच घरी लेक पाठवतो, जे भाग्यवंत देवाचे लाडके असतात. सर्वांनाच देवाकडून ही अनमोल भेट मिळत नाही, तर काही नशीबवान लोकांच्याच घरी देव लेकीच्या रूपाने एक अनमोल भेट पाठवतो. 

ज्या घरात मुली असतात, तिथे सदैव आनंदाचा प्रकाश राहतो. जिथे मुली हसतात, त्या घरात सदैव सुखाचा वर्षाव होतो. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश

प्रिन्सेस बेबी गर्ल कोट्स मराठी | Quotes On Baby Girl Princess In Marathi

छोट्या मुलीवरील कोटस | Baby Girl Quotes In Marathi
छोट्या मुलीवरील कोटस

प्रत्येक वडील राजा नसले तरी प्रत्येक वडिलांसाठी त्यांची लेक ही राजकन्याच असते. तिच्या सुखासाठी आईवडील झटतात आणि तिलाही आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या लाडक्या राजकन्येला जगातली सगळी सुखे मिळावी. तुमच्या राजकन्येसाठी खास प्रिन्सेस बेबी गर्ल कोट्स मराठी-

ADVERTISEMENT

तुझ्या बोबड्या बोलांनी थकवा माझा पळून जातो.तुला पाहताच क्षणी मी तुझ्यात रमून जातो… 

तू तो गुलाब नाही जो बागेत फुलतो,तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे जिच्यामुळे माझे हृदय गर्वाने फुलते.

ADVERTISEMENT

तुझ्या छोट्याश्या चेहऱ्यावरचे निर्व्याज हसू ही माझ्यासाठी एक अनमोल भेट आहे. 

तूच आहेस माझे संपूर्ण जग,  तूच आहेस माझे सुख… तूच आहेस माझ्या आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.

ADVERTISEMENT

तुझ्या रूपाने या घरात लक्ष्मीचा वास आहे. तू म्हणजे आम्हा सर्वांचा तू श्वास आहे. म्हणूनच आमच्या जीवनातील तुझे स्थान खूप खास आहे. 

तू आहेस माझ्या काळजाचा तुकडा,जणू आनंदाने ओतप्रोत भरलेला घडा, तुझ्या निरागस रूपाने तू लावतेस सर्वांना लळा, तू माझा जीव आहेस बाळा!

ADVERTISEMENT

लेक म्हणजे भरल्या घराची शोभा, लेक म्हणजे रित्या घरातील उणीव. लेक म्हणजे सुखाची चव, लेक म्हणजे पहाटेचे नाजूक दव! 

भावाचे प्रेम, आईची माया आणि वडिलांचा असते अभिमान,  खरंच मुलगी म्हणजे प्रत्येक माता-पित्याचा असते स्वाभिमान… 

ADVERTISEMENT

तुझी छोटीशी मुठ आवळून जेव्हा तू माझे बोट धरतेस तो प्रत्येक क्षण माझा खास होतो. तुझ्या इवल्याश्या मुठीत मला

जग जिंकल्याचा भास होतो…

ADVERTISEMENT

आनंदाचे अगणित क्षण तिच्या निरागस गोड हास्यात दडले आहेत. तिला कायम हसरं ठेवण्यासाठी मला प्रयत्नांचे वेड जडले आहे…

आईची सावली आणि वडिलांचे स्वप्न आहेस तू, काट्यांमध्ये फुललेला गुलाब आहेस तू, फक्त लेक नाहीस तर सगळ्या घराचा जीव आहेस तू!

ADVERTISEMENT

अधिक वाचा आई’साठी खास कोट्स

लाडक्या छकुलीसाठी मराठी कोट्स | Quotes For Baby Girl Smile In Marathi

क्युट बेबी गर्ल कोट्स मराठी | Cute Baby Girl Quotes In Marathi
क्युट बेबी गर्ल कोट्स मराठी

आज जगात असे एकही क्षेत्र नाही जिथे मुलींनी आपले कौशल्य सिद्ध केले नाही, अंतराळात जाण्यापासून ते अभियांत्रिकी, राजकारण, वैद्यक, क्रीडा, मनोरंजन, सर्वत्र आज मुलींनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ज्यांना मुली नको असतात त्यांच्या विचारांची कीव करावीशी वाटते. तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नसतील तर काळजी करू नका. वाचा लाडक्या छकुलीसाठी मराठी कोट्स- 

ADVERTISEMENT

जसे इवलीशी पणती सगळे घर प्रकाशमय करते तसेच आमची ही इवलीशी परी सगळे घर आनंदित करते. 

आईबाबा आजीआजोबांची इच्छा केली देवानी केली पुरी आणि लक्ष्मीच्या रूपाने घरी आली एक परी. जिच्या बोबड्या बोलांनी सगळे घर आनंदले, जिच्या निरागस हास्याने सगळे जग जिंकले. 

ADVERTISEMENT

बाबांची लाडकी आणि आईचा जीव म्हणजे लेक! सगळ्यांची लाडकी आणि देवाची कृपा म्हणजे लेक. एकदा प्रार्थनेत मागून तर बघा, स्वर्गातील सगळी सुखे तुमच्या घरात आणते लेक!

एक मुलगी बेरंग घरही आनंदाच्या रंगाने रंगवते. मुलगी स्वतः समाधानी राहून घरात आनंद पसरवते!

ADVERTISEMENT

लेक म्हणजे संपूर्ण घराची शान आणि ती उंचावते दोन्ही कुळांचा मान!

मुलगी म्हणजे लक्ष्मीचे वरदान असते. मुलगी म्हणजे सरस्वतीचा मान असते. मुलगी म्हणजे पृथ्वीवर अवतरलेली जणू  देवता असते. 

ADVERTISEMENT

तुझ्याच भोवताली आमचे जग फिरते, तुझ्या निरागस हास्यापुढे सगळे सुख फिके पडते. तुझ्या अस्तित्वाने आमचे आयुष्य उजळले, जेव्हा घरात आली तुझी चिमुकली पाऊले…

तुझ्या जन्माने सगळं दुःख  विसरायला लावलं,तुझ्या सहवासाने आयुष्य जगायला शिकवलं,  आणि तुझ्या असण्याने आमचं जीवन फुलांसारख बहरलं. 

ADVERTISEMENT

ईश्वराच्या कृपेने मला हे सौभाग्य मिळाले आहे, एका छोट्याश्या परीमुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. 

माझी छकुली म्हणजे माझ्या आयुष्यातील गोडवा आहे, माझी छकुली म्हणजे आनंदाचा कधीच न आटणारा झरा आहे. घरातील प्रत्येक कोपरा उजळून टाकणारा प्रकाश आहे. तिच्या निरागस हास्यामध्ये जग जिंकल्याचा आनंद आहे. 

ADVERTISEMENT

Conclusion : ज्या घरात मुली असतात, त्या घरातले वातावरण काहीतरी वेगळेच उत्साही असते हे अनुभवी लोक नक्कीच सांगू शकतील. या उत्साहाचे कारण म्हणजे मुलींची पॉझिटिव्ह फेमिनाईन एनर्जी असते. म्हणूनच मुलीच्या जन्मानंतर आईवडिलांचे नशीब उजळून निघते. तुमच्याही घरात तुमची छोटीशी लाडकी परी असेल आणि तिच्यावरचे प्रेम तुम्हाला शब्दांत व्यक्त करायचे असेल तर वाचा छोट्या मुलीवरील कोट्स (Baby Girl Quotes In Marathi).

अधिक वाचाबाप-लेकीचं सुंदर नातं 

ADVERTISEMENT
17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
good points logo

good points text