ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मालती आहे देवाचा आशीर्वाद, निक जोनसच्या भावना

मालती आहे देवाचा आशीर्वाद, निक जोनसच्या भावना

निक जोनस आणि प्रियंका चोप्रा जानेवारी महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून आईवडील झाले आहेत. प्रियंकाने मदर्स डेला तिच्या मुलीसोबत निकचा आणि तिचा फोटो शेअर केला होता. मुलीच्या सुरक्षा आणि संगोपनाबाबत दोघंही खूपच प्रोटेक्टिव्ह आहेत. तिचा फोटो, नाव अथवा इतर माहिती दोघांनाही जाहीर करायची नव्हती. मात्र हॉस्पिटलमध्ये लीक झालेल्या कागद पत्रांमुळे त्यांच्या मुलीचे नाव मालती असल्याचं उघड झालं होतं. मात्र आता पहिल्यांदाच निकचं लेकीवरचं प्रेम चाहत्यांसमोर उफाळून आलं आहे. त्याने ‘दी केली क्लार्कसन’ या शो दरम्यान त्याचा पिता होण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

काय म्हणाला निक जोनस

दी केली क्लार्कसन या शोमध्ये निकने तो आणि प्रियंका मालतीचं संगोपन कसं करतात याबाबत माहिती दिली आहे. तो या शो दरम्यान म्हणाला की, “माझ्यासाठी मालती सर्वात प्रिय आहे, तिचं आमच्या आयुष्यात येणं आमच्यासाठी अद्भूत असा क्षण आहे. तिचं घरात असणं माझ्यासाठी ईश्वराचा आशीर्वादआहे” या शब्दात त्याने पिता होण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोबतच त्याने आईवडील होण्याच्या प्रक्रियेत त्यांना आलेली काही आव्हानेही चाहत्यांसोबत शेअर केली. जेव्हा मालती जन्मानंतर एनआयसीयूमध्ये होती, तेव्हाचा काळ प्रियंका आणि निकसाठी खूपच कठीण होता. या शोमध्ये चर्चा करताना होस्टने निक आणि प्रियंकासह मालतीचा फोटो प्रेक्षकांना दाखवला. मात्र मालतीचा चेहरा या फोटोमध्येही हार्ट शेपने झाकलेला होता. तेव्हा निक जोनसने हसून प्रेक्षकांना सांगितलं की, ” कारण तिचा चेहरा हार्ट शेपसारखा आहे.”

मालतीच्या येण्याने जोनस कुटुंब आनंदात

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने 2018 साली जयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिच्शन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर प्रियंका निकच्या घरी अमेरिकेत सेटल झाली. लग्नाला तीन वर्ष झाल्यावर त्यांनी आईवडील होण्याचा निर्णय घेतला. 2022 वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात प्रियंका आणि निकने ते सरोगसीने आईवडील झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांची लेक जवळजवळ 100 दिवस एनआयसीयूमध्ये होती. मदर्स डेला निक आणि प्रियंका मालतीला घरी घेऊन आले.  निक आणि प्रियंका सध्या मालतीच्या संगोपनामध्ये व्यस्त असून आईवडील होण्याचा आनंद घेत आहेत. निक कुटुंबात चौथी नात आल्यामुळे निकचे आईवडीलदेखील खूपच खूश आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
26 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT