काही दिवसांपूर्वी सगळ्यांनाच धक्का देणारी अशी बातमी समोर आली. सेलिब्रिटी कपल करण मेहरा-निशा रावल यांच्यामधील कौटुंबिक वाद चव्हाढ्यावर आला. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर दोघांमध्ये असं काही बिनसलं की, त्यांना मीडियाचा आधार घेत आपली बाजू स्पष्ट करावी लागली. या प्रकरणातून अजून प्रेक्षक सावरलेले नसताना अभिनेत्री निशा रावलने मुलाच्या वाढदिवसाची ग्रँड पार्टी आयोजित केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यामध्ये अभिनेता करण मेहरा कुठेही दिसत नाही. करणने एक पोस्ट शेअर करत आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण आता निशाच्या अशा वागण्यामुळे नेमकं खरं कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, त्यांचा हा वाद सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
गरबा नाही तर दयाबेनचा या गाण्यावरील व्हिडिओ होतोय व्हायरल
मित्रांसोबत साजरा केला वाढदिवस
निशा रावलने मुलगा कविशच्या वाढदिवसाचे कोणतेही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केलेले नाही. या वाढदिवसासाठी तिने काही खास मित्रांना आमंत्रित केले होते. त्याध्ये डिझायनर रोहित वर्माचा देखील समावेश होता. त्याने त्याच्या अकाऊंटवरुन काविशला शुभेच्छा देण्यासाठी फोटो पोस्ट केले होते. पण काही वेळातच त्याने त्याच्या अकाऊंटवरुन हे फोटो आणि व्हिडिओ काढून टाकलेले आहे. पण सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहे. निशाने तिच्या खास मित्रांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या चेहऱ्यावर कौंटुबिक वादाचे कोणतेही दु:ख दिसत नाही. ती तिच्या लोकांमध्ये अत्यंत आनंदी दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे. या वाढदिवसाला करण मेहरा हा आलेला दिसत नाही. त्यामुळेच या फोटोची चर्चा अधिक रंगली
गाथा नवनाथांची’ मालिकेतून नाथांचा महिमा प्रेक्षकांच्या भेटीला
करणने मुलासाठी केली पोस्ट
करण मेहरा या वाढदिवसाला प्रत्यक्ष हजर नसला तरी त्याने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर मुलासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने त्याच्यासाठी खास अॅस्ट्रोनॉट असलेला केक खास बनवून घेतला आहे. शिवाय त्याने एक गिफ्ट ठेवून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने मुलाबद्दल लिहिले आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडक्या मुला.. देव तुझं रक्षण करो, मला आठवतो तू मला गाझिलयनप्रमाणे प्रेम करायचा माझेही तुझ्यावर प्रेम आहे.मी कायम तुझ्या ह्रदयात आहे. असे म्हणत त्याने त्याच्या पोस्टमध्ये काविशला टॅग केले आहे. काविशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्येही त्याच्या वाढदिवसाचे कोणतेही फोटोज दिसत नाही. पण त्याला खूप जणांनी वेगवगळ्या पोस्टमध्ये टॅग केले आहे. करण मेहराच्या या फोटोजची चर्चाही होताना दिसत आहे.
काय होता वाद ?
निशा रावल आणि करण मेहरा हे टीव्हीवरील एक आयडियल कपल म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. पण लग्नाच्या इतक्या वर्षानंतर त्यांच्यामध्ये असलेला दुरावा निशाने समोर आणला आहे. करण आणि निशामध्ये झालेल्या एका भांडणामध्ये करणणे निशाला भींतीवर आदळले ज्यामुळे निशा जखमी झाली. तिने मीडियाला बोलावून याची माहिती दिली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. निशाने त्याच्यावर विवाहबाह्य संबंध आणि मारहाणीचे आरोप केले. तर करणने हे आरोप नाकारत निशा खोटं बोलते असे सांगितले. निशाला त्याने बायपोलर म्हणत ती खोटं बोलत असल्याचे सांगितले. दोघांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता ही दोघं वेगळी झाली असून काविश निशाकडे आहे.
आता या दोघांच्या नात्यांमधील दुरावा कधी संपेल याची सगळेच वाट पाहात आहेत.
लिटिल चॅम्प्सचं स्वप्न साकारण्यासाठी सारेगमपचा मंच सज्ज