ADVERTISEMENT
home / आरोग्य
not only calcium and vitamin d these things also necessary for bone health

फक्त ‘कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी’च नाही हाडांसाठी आहे या गोष्टींचीही गरज

चाळीशीनंतर हाडांची हळू हळू झीज होऊ लागते. आजारपण अथवा अशक्तपणा आल्यावरही सर्वात जास्त परिणाम तुमच्या हाडांवर होतो. ज्यामुळे सतत अंगदुखी, कंबरदुखी, पाय दुखणे अशा समस्या जाणवतात. निरोगी राहण्यासाठी हाडे मजबूत आणि बळकट असायला हवी. हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आपल्या शरीराला पुरेशा कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ ची गरज आहे हे आपल्याला सांगण्यात येतं. पण एवढंच पुरेसं नाही… कारण यासोबत असे अनेक घटक शरीरासाठी गरजेचे आहेत. ज्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी राहतात.

हाडे मजबूत राहण्यासाठी हवा सर्वांगिण आहार

शरीरात हाडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हाडं कमजोर असतील तर विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. अंग दुखणे, अशक्तपणा आणि फ्रॅक्चर या समस्या हाडे मजबूत नसतील तर सतत जाणवतात. यासाठी हाडांचे योग्य पोषण होणे गरजेचे आहे. हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आपण शरीराला कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी मिळेल याची काळजी घेतो. मात्र तज्ञ्जांच्या मते हाडांच्या आरोग्यासाठी एवढं पुरेसं नाही. कारण शरीराचे योग्य पोषण झाले तरंच तुमची हाडे मजबूत राहतात आणि शरीराचे पोषण होण्यासाठी सर्वांगिण आहार महत्त्वाचा आहे. शरीराला कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसोबत, मॅग्नेशिअम, झिंक, ओमेगा थ्री अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, प्रोटिन्स, देखील गरजेचं असतं. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स (Tips To Remove Calcium Deficiency In Marathi)

हाडांच्या बळकटीसाठी आहारात वाढवा हे पदार्थ

सर्वांगिण आहार देणारा पोषक आहार घेतला तर हाडं मजबूत राहतातच शिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहते. यासाठी आहारात दुधाचे पदार्थ वाढवा. कारण दुधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम, प्रोटिन्स आणि फॉस्फरस असते. शिवाय जर तुम्ही नियमित सर्व प्रकारच्या भाज्या खात असाल तर त्यातून तुम्हाला भरपूर व्हिटॅमिन्स मिळतात. व्हिटॅमिन सी मुळे तुमच्या शरीरात कोलेजनची निर्मिती होते. ज्यामुळे हाडांना पोषक खनिजांचा पूरवठा होतो.  व्हिटॅमिन D पुरेपूर मिळाले तर तुम्ही कायम राहाल निरोगी (Vitamin D Benefits In Marathi)

व्यायामाकडे करू नका दुर्लक्ष

हाडं मजबूत राहण्यासाठी शरीराला फक्त पोषक घटकांची गरज आहे असं नाही तर त्यासोबत नियमित व्यायामही करायला हवा. कारण व्यायामामुळे तुमच्या शरीरातील मांसपेशीमधील घनता वाढते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस वर्क आऊट करा. शरीराचे वजन संतुलित ठेवून तुम्ही तुमच्या हाडांचे आरोग्य राखू शकता. यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायामाने वजन नियंत्रित ठेवा. आश्चर्यकारक! डान्स वर्कआऊट करुन तुमचे वजन होऊ शकते कमी (Dance Workout For Weight Loss)

ADVERTISEMENT
21 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT