ADVERTISEMENT
home / Festival
दसऱ्याला आपट्याच्या पानांऐवजी वाटा ‘आनंद’

दसऱ्याला आपट्याच्या पानांऐवजी वाटा ‘आनंद’

विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला सोनं वाटण्याची आणि लुटण्याची पद्धत  आहे. सोन्याचं प्रतिक म्हणून अनेक वर्षांपासून आपट्याची पानं एकमेकांना दिली जातात. मात्र पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पहाता प्रत्येकाने या प्रथेकडे तर्कशुद्ध दृष्टीने पाहायला हवं. सोन्याचं प्रतिक म्हणून आपट्याची पानं वाटण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आपट्याच्या झाडाला अक्षरशः ओरबाडलं जातं. मोठ्या प्रमाणावर ही झाडं तोडली जातात. एक सुज्ञ नागरिक या नात्यायने कमीतकमी या वर्षापासून तरी आपण या प्रथेत थोडासा बदल नक्कीच करायला हवा. जर आपट्याचं पान हे आपण सोन्याचं  केवळ प्रतिक म्हणून वाटत असू तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण समृद्धीचं प्रतिक म्हणून दसऱ्याला वाटू शकतो. पाहूया अशा काही गोष्टी ज्या आपण दसऱ्याला वाटून आनंद लुटू शकतो.

Instagram

1. लहान मुलांना खाऊ –

भारतीय पंरपरा जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीला त्याची ओळख करून देण्यासाठी आपण दसऱ्याला लहान मुलांना विजयादशमीचं महत्त्व पटवून देतो. सोसायटीमध्ये हा सण साजरा करण्यासाठी सर्व लहान मुलं घरोघरी जाऊन आपट्याची पानं वाटतात. तुमच्या मुलांना अथवा घरी येणाऱ्या या लहान मुलांना तुम्ही आपट्याच्या पानांऐवजी त्यांना आवडेल असा एखादा पौष्टिक खाऊ वाटू शकता. फळं, राजगिरा चिक्की, होममेड चॉकलेट, मिठाई असा खाऊ मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तुम्हाला पाहता येऊ शकतो. शिवाय यातून तुमच्या मुलांना आणि शेजारी राहणाऱ्या इतर मुलांना आपट्याची पानं आपण आता का  वाटू नयेत याचा सुरेख संदेश नकळत मिळू शकतो.

ADVERTISEMENT

Dasara Information In Marathi

2. गरजू मुलांसाठी शालेय साहित्य –

जर तुमच्या सोसायटीत एकमेकांकडे जाण्याची पद्धत नसेल तर तुम्हाला हा पर्याय नक्कीच एक अनामिक आनंद देऊ शकतो. तुमच्या परिसरातील एखाद्या अनाथआश्रमात जाऊन अथवा तुमच्या घरी काम करणाऱ्या मदतनीसांच्या मुलांना तुम्ही वह्या, पुस्तके अशा  शालेय वस्तू वाटू शकता. दसऱ्याला आपण सरस्वतीचं पूजन करतो. मग या सरस्वती मातेची आराधना करण्यासाठी याहून आणखी चांगला मार्ग कोणता असू शकेल. गरजू मुलांना त्यांचं शालेय साहित्य मिळाल्यामुळे जो आनंद मिळेल तो पाहून तुमचा दसरा अगदी ऐश्वर्यात पार पडेल.

3. हॅंडमेड आपट्याची पाने –

तुम्हाला तुमच्या प्रियजन, कुटुंब, मित्रमंडळींसोबत आपट्याची पानं वाटूनच हा सण साजरा करायची सवय असेल तर काहीच हरकत नाही. कारण आपट्याचं पान हे शेवटी आपण एक प्रतिक म्हणून वाटत असतो. तेव्हा जुन्या वर्तमान पत्र अशा वापर झालेल्या कागदापासून आपट्याच्या पानांचा आकार कापून घ्या. त्याला सोनेरी रंगाने रंगवून हे स्वतः तयार केलेलं आपट्याचं पान तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना देऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला सण साजरा केल्याचा आनंद मिळेल आणि पर्यावरणाचं नुकसानही कमी प्रमाणात होईल.

4. गरजूंना अन्नदान –

सोनं वाटणं ही गोष्ट तुमच्याकडील सुखसमृद्धीचं प्रतिक आहे. थोडक्यात माणूस मनाने जितका समृद्ध असेल तितकाच तो धनाने समृद्ध होऊ शकतो . जर समृद्ध व्हायचं असेल तर आधी इतरांना देता यायला हवं. यासाठीच आपल्या संस्कृतीत देण्याचा संस्कार शिकवला जातो. म्हणूनच आपट्याची पानं वाटण्यापेक्षा जर तुम्ही या दिवशी गरजूंना अन्नदान केलं तर तुमचा दिवस नक्कीच सार्थकी लागेल. यासाठी गरजवंतांना अन्नदान करा.

ADVERTISEMENT

5. आपट्याच्या पानाच्या आकाराचे खाद्यपदार्थ –

आपट्याचं पान असंही आपण एक प्रतिक म्हणून वाटत असतो. जे दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याच्या पेटीत पडलेलं दिसतं. म्हणूनच याला पर्याय म्हणून तुम्ही घरी  आपट्याच्या पानाच्या आकाराची मिठाई तयार करून तुमच्या प्रियजनांना वाटू शकता. काजू कतली अथवा इतर कोणतीही वडीच्या आकार मिठाई तयार करा. या मिठाईला आपट्याच्या पानांचा आकार द्या आणि खाण्यासाठी वापरण्यात येणारा हिरवा  रंग लावा. ज्यामुळे आपट्याचे पान वाटल्याचा आणि मिठाई खाण्याचा दोन्ही गोष्टींचा आनंद तुम्हाला लुटता येईल.

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

DIY: ट्रेंडी राहण्यासाठी आणि घर सजावटीसाठी स्वतः तयार करा ‘या’ वस्तू

जाणून घ्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे महत्व आणि आख्यायिका

06 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT