ADVERTISEMENT
home / Fitness
मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा

मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा

आपल्या मुलाने निरोगी राहावं असं प्रत्येक आईला वाटतं. मुलं निरोगी राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. त्याच्या आहारात पौष्टिकच गोष्टींचा समावेश करते. मुलांनी बाहेरचं न खाता घरात तयार केलेलं अन्न खावं यासाठी ती तळमळीने चांगले चांगले पदार्थ शिकते. मुलांना खाऊ घालते. पण तुमची हीच पौष्टिक आणि सतत चांगलं खाण्याची सवय तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे ती कशी ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी पुढे नक्की वाचा.

सतत खायला देत राहणे

मुलांना सतत खायला लावणे नाही चांगले

shutterstock

 आईचं मन फारच काळजीवाहू असतं. तिला आपल्याला मुलाने सतत खात राहावे असे वाटते. म्हणजे ती आल्यावरही विचारते तुला भूक लागली का? तुला काहीतरी खायला करुन देते. मग ही दिवसभरातील कोणतीही वेळ असो तिला तिच्या मुलाने सतत खावेसे असे वाटते. तुम्ही देखील आजुबाजूला अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील ज्या ठिकाणी आई आपल्या मुलांना अगदी रात्रीही घरी परतल्यानंतर खाऊ घालतात. आता तुम्ही म्हणाल यात काय चुकलं? तर तुमच्या मुलांना आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही त्यांना देणे चांगले पण त्यांना खायला देताना तुम्ही वेळ आणि काय खायला देत आहात हे देखील बघा. कारण बरेचदा आई आपल्या मुलाचे पोट भरावे म्हणून त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक खायला देतात. 

ADVERTISEMENT

उदा. मुलगा खेळून आला त्याला भूक लागेल हे आधीच समजून काही महिला मुलांसाठी सँडवीच, शिरा, पोहे असा बेत करुन ठेवतात. आता संध्याकाळी त्यांनी समजा भुकेसरशी ते खाल्लं. तरी रात्री खाण्याची जबरदस्ती करता.

एक वर्षापर्यंत लहान मुलाला नक्की काय द्यायचे खायला, अन्यथा होतील वाईट परिणाम

तुला हे खायलाच हवं

आई आपल्या मुलांना चांगल ओळखते हे आम्हाला माहीत आहे. पण त्यांच्यावर खाण्याची जबरदस्ती करणेही चांगले नाही. तुमचं मुलं काल भरपूर जेवलं असेल म्हणून ते उद्या तितकचं  जेवेल असं होत नाही. पण काही पालक मुलांच्या पानात अन्न वाढतात. त्यांना कधी कधी ते खाता येत नाही. अशावेळी काही पालक मुलांना जबरदस्ती करुन पानातील अन्न संपवायला लावतात. मुलं रडत असली तरी तुझ्यासाठी हे आवश्यक आहे.तू हे खायलाचं हवे. असे सांगून आई इमोशनल ब्लॅकमेल करुन मुलांना खाऊ घालतात. पण हीच पालकांची चुकी आहे. वाढीच्या वयातील मुलांनी योग्य आहारा घ्यावा ही गोष्ट योग्य असली तरी खाण्याची जबरदस्ती तुम्हालाच पुढे त्रासदायक पडू शकते. गरजेपेक्षा जास्त जेवण जेवल्यामुळे मुलांना अपचनाचा त्रास होऊ शकतो किंवा त्यांचे वजनही वाढू शकते. 

आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

ADVERTISEMENT

सतत पौष्टिक पदार्थ देत राहणे

सतत चांगलं खाण्याची सवयही पडू शकते महागात

shutterstock

आता काही आई अशा असतात ज्यांना आपल्या मुलांना कायमच पौष्टिक द्यायचे असते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांनी काय पौष्टिक खायला हवे याचे एक वेळापत्रकच त्यांनी तयार केलेल असते. त्यांच्या या वेळापत्रकानुसार मुलांनी ते खावे असेच त्यांना वाटते.  काही पालक पौष्टिक लाडू बनवतात. यामध्ये वेगवेगळी पीठ,ड्रायफ्रुट असतात.या सगळ्याचे किती प्रमाण मुलांच्या आहारात असावे हे त्यांना कळत नाही. त्यांना असे वाटते की, इतके पौष्टिक घटक पोटात गेल्यानंतर मुलाचे आरोग्य चांगले राहील.पण असे होत नाही. तुमच्या या सतत खाण्याच्या वेळापत्रकामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. शिवाय त्यांना अन्य आजार होण्याची शक्यता असते. 

मुलांना सगळ्यात जास्त आई ओळखते ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा कधी कधी महिला भावनेच्या भरात आपला मुलगा काहीच खात नाही म्हणून त्याला खाऊ घालतात. तुम्हाला तुमचे मुलं कुपोषित आहे असे वाटत असेल तर डॉक्टरांकडे न्या. त्यांच्या उंचीनुसार त्यांचे वजन किती असायला हवे हे विचारुन घ्या. ती यादी जवळ बाळगा. कारण तुम्ही मुलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक खाण्याची सवय लावली की, त्यांना आवरणे कठीण असते आणि त्यांच्या लठ्ठपणाला नियंत्रित ठेवणे फारच कठीण होऊन बसते. 

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

25 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT