श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान एकमेकांचे चांगले फ्रेंड आहेत. मागे एकदा त्या दोघांना एकत्र पाहून त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याचा सुगावा अनेकांना लागला होता. सहाजिकच सोशल मीडियावर या दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांना एका रेस्टॉरंट बाहेर पाहिल्यावर नेटकऱ्यांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. दोघं रिलेशनशिपमध्ये असून डेटिंगसाठी ते एकमेकांना भेटत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या दोघांची ही खास भेट सध्या अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.
पलक आणि इब्राहिम खरंच आहेत का नात्यात
शनिवारी पलक आणि इब्राहिम एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी भेटले होते. पापाराझींची नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये पलक तिवारीने हिरव्या रंगाची शॉर्टस, व्हाईट टी शर्ट आणि ग्रे जॅकेट परिधान केलं होतं. मोकळ्या केसांमध्ये पलक खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. इब्राहिम अली खान त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये व्हाईट शर्टमध्ये कुल दिसत होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या. मागे एकदा जानेवारी महिन्यात ते दोघं असेच स्पॉट झाले होते. आता पुन्हा झालेली खास भेट पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर या व्हिडिओवर या दोघांमध्ये काय सुरू आहे, ती दोघं एकमेकांना डेट करत आहेत का असे प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे.
पलक तिवारीने केलं स्पष्ट
एका मुलाखतीमध्ये पलकला या विषयी विचारण्यात आलं होतं की, ती सध्या इब्राहिमला डेट करत आहे का? त्यावर पलकने स्पष्टीकरण दिलं होतं की, आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. आम्ही बाहेर फिरण्यास गेलो होतो आणि लोकांनी अफवा पसरवण्यास सुरूवात केली. वास्तविक तेव्हा पलक आणि इब्राहिम त्यांच्या इतर मित्रांसोबत हॅंगआऊट करत होते. मात्र लोकांनी फक्त पलक आणि इब्राहिमला स्पॉट करत अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती. आता मात्र पुन्हा एकदा ती दोघं एकत्र दिसल्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे. कदाचित नेटकऱ्यांना ही जोडी आवडत असावी आणि त्यांनी रिलेशनशिपमध्ये असावं अशी चाहत्यांची इच्छा असावी. पण सध्या तरी दोघांनीही त्यांचं नातं जाहीरपणे कबूल केलेलं नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक