ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
असा पार पडला पायल रोहतगीचा मेंदी समारंभ, या दिवशी होणार लग्न

असा पार पडला पायल रोहतगीचा मेंदी समारंभ, या दिवशी होणार लग्न

टेलीव्हिजन अभिनेत्री पायल रोहतगी आणि रेसलर संग्राम सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.सध्या पायलच्या घरात लग्नाची लगबग दिसू लागली असून काही प्री वेडिंग फंक्शनही सुरू झाले आहेत. लग्नाआधी नववधूला मेंदी काढण्याची पद्धत आहे. पायलचा हा विधी पार पडला असून, सोशल मीडियावर तिच्या मेंदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोत दिसत असल्यानुसार पायलच्या मेंदी सोहळ्यासाठी फक्त कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी झालेला आहे. जवळजवळ बारा वर्ष पायल आणि संग्राम एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे फायनली ते लग्नाच्या बंधनात अडकताना पाहणं कुटुंबिय आणि चाहत्यांसाठी नक्कीच आनंद देणारं असणार आहे. 

कधी आहे लग्न

पायल आणि संग्रामचं लग्न नऊ जुलैला आहे. लग्नापूर्वीचे विधी सुरू झाले असून सध्या पायलच्या मेंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर झळकत आहेत. पायलने तिच्या अकाउंटवर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने कॅप्शन दिली  आहे, ” तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नव्या टप्प्याची तुमच्याकडून वेगळी मागणी असेल. पायलने तिच्या मेंदीसाठी पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा पेहराव केला होता. कफ्तान वर्गातील ड्रेस तिने मेंदीसाठी निवडला होता. तसंच तिच्या चेहऱ्यावर मेंदीसोहळ्याचा आनंदही खुलून दिसत होता. 

पायलला संग्रामने असं केलं होतं प्रपोज

पायल रोहतगीने कंगना रणौतच्या रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये संग्राम जेव्हा आला होता तेव्हा त्याने लवकरच ते लग्न करणार असं जाहीर केलं होतं. संग्रामने नॅशनल टेलीव्हिजनवर या शोच्या माध्यमातून पायलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. या दोघांची ओळख एका रिअॅलिटी शोधमधूनच झाली होती. त्यानंतर त्यांनी 2014 साखरपुडा केला होता. मात्र लग्नाचा निर्णय घेण्यासाठी चांगलाच उशीर केला. असंही पायल आणि संग्राम जवळजवळ बारा वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकून सुखाचा संसार करावा हीच चाहत्यांची अपेक्षा आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT