ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
पेपलम चोळी

लग्नासाठी बेस्ट आहेत पेपलम टॉप स्टाईल

 लग्नाचा सीझन आला की बाजारात अनेक वेगळे ट्रेंड दिसू लागतात.लग्न कोणाचेही असले तरी प्रत्येकाला स्टायलिश आणि हटके दिसायला आवडते. अशातच जर तुम्ही काह नव्या ट्रेंडच्या शोधात असाल तर तुम्हाला आम्ही  पेपलम चोळीचा नवा पर्याय याविषयी माहिती देणार आहोत. तुम्ही कोणत्याही डिझायनर स्टुडिओमध्ये गेलात तर तुम्हाला अगदी हमखास हा ट्रेंड पाहायला मिळतो. पेपलम टॉपची स्टाईल तुम्हाला कशी करता येते ते जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला कोणत्याही लग्नात अगदी हटके दिसायला नक्कीच मदत होईल.


पेपलम चोळी म्हणजे काय?

पेपलम चोळी ही रोजच्या चोळीपेक्षा मोठी असते. छातीच्या खाली एक अशी झालर केलेली असते की, त्यामुळे तुमचे पोट झाकले जाते. याला तुम्ही झबलं म्हटलं की ती तुम्हाला अधिक जास्त कळू शकेल. सध्या ही पेपलम टोळी जास्त ट्रेंडमध्ये आहे. त्याच्याखाली असंख्य अशा पद्धतीने स्टायलिंग करता येते. त्यामुळेच तुम्ही हा पर्याय ट्राय करायला हवा असा आहे. तुमची शरीरयष्टी कशीही असली तरी देखील तुम्हाला पेपलम चोळी कायमच चांगल्या दिसतात.

पेपलम चोळी आणि गरारा पँट्स

पेपलम चोळी गरारा पँट

गरारा पँटस या घेरदार आणि फेस्टिव्ह असतात. गरारा पँटस आणि पेपलम चोळी हे एक उत्तम असं कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला खूप गोंधलेले कपडे घालायला आवडत नसेल ज्याने लग्नासाठी जाणे त्रासदायक ठरते. अशावेळी तुम्ही पेपलम चोळी आणि गरारा पँट्स घालू शकता. जे खूपच सुंदर दिसतात. पेपलम चोळी आणि गरारा पँट्स यावर ओढणी नाही घेतली तरी देखील चालू शकते. 

पेपलम चोळी साडी

पेपलम चोळी साडी

पेपलम चोळीवर तु्म्हाला साडी देखील नेसता येते. जर तुम्हाला नेहमीसारखी साडी नेसायची नसेल आणि तोच तोच ब्लाऊज घालून कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी पेपलम चोळीचा ब्लाऊज आणि साडी हा मस्त पर्याय आहे. कारण पेपलम चोळी या साडीवर खूपच जास्त भाव खाऊन जातात. त्या इतक्या सुंदर दिसतात की, तुम्ही एखादा डिझायनर पीस घातला असे वाटते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास पेपलम चोळी आणि साडी नेसायला हवी.

ADVERTISEMENT

पेपलम चोळी लेहंगा

पेपलम लेहंगा

खूप जणांना लग्नाच्या दिवसात लाँग स्कर्ट घालायला खूप आवडते. कारण असे स्कर्ट एकदम चांगला लुक देण्यास मदत करतात. अशावेळी तुम्हाला पेपलम चोळी आणि लेहंगा घालता येऊ शकतो. तुमच्याकडे एखादा हेवी स्कर्ट असेल तर तुम्ही त्यावर मस्त डिझायनर अशी पेपलम चोळी घालू शकता. पेपलम चोळी आणि स्कर्ट घातल्यामुळे तुम्हाला एक चांगला लुक मिळतो. या शिवाय काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन वापरुनही तुम्ही काहीतरी करु शकता

उत्तम ज्वेलरीची करा निवड

पेपलम टॉप हे आधीच चांगले हेवी आणि सुंदर असतात. त्यामुळे तुम्हाला यावर ज्वेलरीची निवड करताना छान चोकरसेटची निवड करणे खूपच जास्त गरजेचे असते. त्यामुळे तुमची चोळी कशी आहे हे बघून तुम्ही उत्तम अशा ज्वेलरीची निवड करा आणि तुमच्यासाठी चांगला लुक मिळवा.  ब्रायडल ज्वेलरीची निवड यावर करताना तुम्ही याच गोष्टींचा विचार करायला हवा

आता या लग्नाच्या सीझनमध्ये नक्कीच पेपलम टॉपची स्टाईल करा. 

09 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT