ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Exercise For Glowing Face In Marathi

चेहरा कायम चमकदार राहण्यासाठी करा ‘योग्य’ व्यायाम (Exercise For Glowing Face In Marathi)

 

नेहमी आपला चेहरा सुंदर दिसावा असं कोणाला वाटत नाही? अर्थातच प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. त्यासाठी अनेकदा पार्लरला भेट देऊन चेहऱ्यावर चमक कायम तशीच ठेवण्याचा प्रयत्नही केला जातो. पण सतत पार्लरमध्ये जाणं हे खिशाला परवडू शकत नाही. मग चेहरा कायम चमकदार राहण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो. तर आपण रोजच्या रोज चेहऱ्याचे योग्य व्यायाम करून आपल्या चेहऱ्याची चमक टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी तुम्ही नक्की काय करायला हवं हे आम्ही तुम्हाला सांगतो. कितीही नाही म्हटलं तरी आपण नक्कीच आपल्या चेहऱ्याची सर्वात जास्त काळजी घेत असतो आणि का घेऊ नये? कोणताही माणूस सर्वप्रथम आपल्याला भेटतो तेव्हा त्याच्यावर आपल्या दिसण्याचं इम्प्रेशनच सर्वप्रथम येत असतं. आपला चेहरा नेहमी चमकदार ठेवण्यासाठी व्यायाम करा. याचा तुम्ही नियमित वापर केल्यास, कायम चेहरा सुंदर दिसण्यासाठी मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून काही वेळ काढून कुठेही तुम्ही हे व्यायाम करून तुमचं सौंदर्य टिकवू शकता. 

1. शक्य तितकं डोळे मोठे करणं (Make The Eyes As Big As Possible)

डोळे मोठे

Shutterstock

 

काम करून करून डोळ्यांवर प्रचंड शीण येतो. त्यामुळे तुम्ही दिवसभरात काम करत असताना मध्येच ताठ बसा आणि डोळे शक्य तितके मोठे करा. आधी घडाळ्याच्या काट्याप्रमाणे आणि मग विरोधी दिशेने डोळे फिरवा. त्यानंतर डोळे बंद करून किमान पाचपर्यंत अंक मनात मोजा. असं किमान दहा वेळा रोज करा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा शीण निघून जातो आणि डोळ्यांमुळे तुमचा चेहरा खराब दिसत नाही. तुमचे डोळेही ताजेतवाने दिसतात. तुमच्या डोळ्यातील निस्तेजपणा निघून जाण्यासाठी याची मदत होते. व्यायामाचे आरोग्यासाठी फायदे जाणून घ्या.

2. चेहऱ्याच्या त्वचेसाठी करा गालांचा व्यायाम (Exercise The Cheek For Glowing Face)

गालांचा व्यायाम

Shutterstock

ADVERTISEMENT

 

चेहरा चमकदार राहण्यासाठी तुम्ही एक सोपा व्यायाम करू शकता. आधी तोंड मिटा. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन तुम्ही तोंडात हवा घेऊन तोंड फुगवा. आता ही हवा तशीच गालात ठेऊन द्या आणि किमान दहा अंक मनात मोजा. नंतर ही हवा सोडून द्या. गालाच्या एका बाजूला ही हवा भरून झाली की, पुन्हा दुसऱ्या बाजूला पुन्हा हवा भरून घ्या आणि तसंच करा. असं किमान दहा वेळा करा. त्यामुळे तुमच्या गालांचा योग्य व्यायाम होऊन तुमची त्वचा टाईट राहण्यासाठी याची मदत होते. तसंच तुम्ही अजून एक व्यायाम करू शकता. तुम्ही तुमच्या दातावर गालाचा दाब पडेपर्यंत तुमचे गाल आतपर्यंत ओढून घ्या. असं केल्यानेही तुमचा चेहरा चांगला राहतो. 

वाचा – पेशी कमी होण्याची लक्षणे, कारणे आणि उपाय

3. ओरडून द्या चेहऱ्याच्या पेशींना व्यायाम (Shouting Exercise The Facial Cells)

पेशींना व्यायाम

Shutterstock

 

यासाठी तुम्हाला ताठ बसून समोर पाहायचं आहे आणि मग डोळे उघडून जोरात ओ असं ओरडायचं आहे. असं ओरडून झाल्यानंतर थोडं थांबा आणि मग ई असं जोरात ओरडा. हा दोन्ही प्रकारे व्यायाम केल्याने तुमच्या चेहऱ्याच्या पेशींना व्यायाम मिळतो आणि चेहरा तुकतुकीत राहण्यासाठी तुम्हाला मदत होते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय.

ADVERTISEMENT

4. ओठांसाठी स्मितहास्य फायदेशीर (Smiling Is Good For Lips)

स्मितहास्य

Shutterstock

 

चेहऱ्याचा सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे ओठ. तुमचे ओठ अधिक सुंदर दिसावे यासाठीदेखील तुम्ही व्यायाम करू शकता. पण बऱ्याच जणांना याची कल्पना नसते. हा अतिशय सोपा व्यायाम आहे. ओठावर स्मितहास्य आणा आणि पुन्हा चेहरा सरळ ठेवा. असं किमान दिवसातून दहावेळा करा. त्यामुळे तुमचे ओठ आकर्षक राहण्यास मदत होते. तसंच तुम्ही अधिक सुंदर दिसता. अजून एक उपाय म्हणजे तुम्ही ताठ बसा आणि अशा स्थितीत ओठ उघडून खळखळून हसा. हसताना गालाच्या पेशींवर प्रभाव पडायला हवा. 

5. गळ्याच्या पेशींना द्या व्यायाम (Exercise Neck Cells)

गळ्याच्या पेशींना द्या व्यायाम

Shutterstock

 

तुमचा गळाही तितकाच महत्त्वाचा आहे. हादेखील तुमच्या चेहऱ्याचा अविभाज्य भाग आहे. त्याला व्यायाम देणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी ताठ बसा आणि चेहरा मागे झुकवा आणि वर छताकडे पाहा. मग ओठ बंद करून काहीतरी तोंडात चघळत आहात अशा हालचाली करा. त्यामुळे गळ्याच्या पेशींचा व्यवस्थित व्यायाम होईल. हातावरची चरबी महिनाभरात करा कमी.

ADVERTISEMENT
20 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT