ADVERTISEMENT
home / Love
जोडीदारावर हात उगारणे बिघडवू शकते तुमचे नाते

जोडीदारावर हात उगारणे बिघडवू शकते तुमचे नाते

नाते बिघडवण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे हात उगारणे. अनेकांना हात उगारणे म्हणजे अधिकार गाजवल्यासारखी गोष्ट वाजवते. कोणत्याही गोष्टी समजून न घेता त्यांना मारणे हा एकमेव पर्याय वाटतो. प्रेमाच्या नात्यातही अनेकांना जोडीदाराला समवण्यासाठी किंवा त्यांच्यावर आपला अधिकार गाजवण्यासाठी हात उगारावासा वाटतो. पण तुम्ही नात्यात असा हात उगारत असाल तर वेळीच सावध व्हा कारण ही गोष्ट तुम्हाला तुमच्या प्रेमापासून कायमची दूर करु शकते. जाणून घ्या या गोष्टी कशा करतात तुमच्या नात्यावर परीणाम

नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

विश्वास होतो कमी

नाते हे नेहमी विश्वासावर अवलंबून असते. तुमचे तुमच्या जोडीदारावर कितीही प्रेम असले तरी तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवता हे महत्वाचे असते. अनेकदा परिस्थिती समजून न घेता आपण उगाचच एखाद्या विषयावर वाद घालत राहतो. आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवत राहतो. याचा परिणाम असा की, तुम्ही कधी कधी रागाच्या भरात तुमच्या जोडीदारावर हात उचलता. तुम्हाला ही फार क्षुल्लक गोष्ट वाटत असली तरी ती तुमच्या जोडीदाराच्या मनावर खूप मोठा परिणाम करत असते. तुमच्याकडून ही चूक झाल्यानंतर तुमच्या जोडीदाराला तुमच्यासोबत काहीही करण्याची भीती वाटते कारण त्यांना तुम्ही पुन्हा मारणे किंवा त्रास देणे नको असते. साहजिकच ते तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवू लागतात.

sorry म्हणून वर्षाचा शेवट करा गोड.. नातेसंबंध टिकण्यास होईल मदत

ADVERTISEMENT

आदर होतो कमी

आदर होतो कमी

shutterstock

नात्यात विश्वासासोबत अत्यंत महत्वाचा असतो तो म्हणजे आदर. एकमेकांचा आदर राखणे नात्यात फार महत्वाचे आहे. त्यामुळे तुमचे नाते बहरण्यास मदत होते. पण जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर हात उगारत असाल तर आपसुकच तुमच्या प्रतीच्या त्यांच्या मनातील आदर कमी होतो. कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगी त्यांना तुमची साथ अजिबात महत्वाची वाटत नाही. उलट त्यांच्या दृष्टिकोनातून तुमची प्रतिमा पूर्णत: उतरते आणि बरेचदा ती शून्यही होते.  बरेचदा तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जोडीदाराला रस राहात नाही.

नात्यातील आनंद होतो कमी

हात उगारणे ही कोणत्याही प्रसंगी वाईटच गोष्ट आहे. जर तुम्हाला जोडीदाराच्या चुकीची शिक्षा ही केवळ हात उगारण्यात आहे असे वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष कोणीही एकमेकांना मारणे ही गोष्ट नात्यातील आनंद कमी करण्यास कारणीभूत ठरते. या एका चुकीमुळे तुमच्या प्रेमाच्या आठवणी या धुसर होऊ लागतात. आणि कटू गोष्टी अधिक आठवू लागतात. याचाच परीणाम म्हणजे तुमच्या नात्यातील आनंद कमी होऊ लागतो. 

ADVERTISEMENT

एकमेकांची साथ नकोशी होणे

आपण अनेक वेळा ऐकले असेल की दारुच्या नसेत पतीने पत्नीला मारहाण केली किंवा संशयावरुन मारहाण केली. अशा पद्धतीची मारहाण ही केवळ मन:स्ताप देणारी असते. कोणत्याही नात्यात अशा प्रकारची मारहाण सहन करण्याचा आपल्याला हक्क नाही. ही गोष्ट सतत होत राहिली की, प्रेमाची माणसं ही एकमेकांपासून दुरावतात. माफी मागण्याने हे नाते केवळ ठिगळ जोडून राहिल. पण तुमच्या जोडीदाराला तुमची साथ हवी आहे असे होत नाही. केवळ नाईलाज म्हणून तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न ते करत असतील.

त्यामुळे जर तुम्ही जोडीदारावर हात उगारत असाल तर तुमचे नाते हे अंत्यत गंभीर परिस्थितीत आहे असे समजा. योग्यवेळी स्वत:ला आवरा नाहीतर या नात्याचे दुरगामी परीणाम तुम्हाला जाणवतील.

‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर पैशांमुळे बिघडणार नाहीत नातेसंबंध

22 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT