ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
भारती सिंहला हवी आहे बेबी गर्ल, मजेशीर पद्धतीने शेअर केल्या भावना

भारती सिंहला हवी आहे बेबी गर्ल, मजेशीर पद्धतीने शेअर केल्या भावना

कॉमेडिअन भारती सिंह लवकरच आई होणार आहे. सध्या तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि ती घरात बाळाच्या आगमनासाठी सज्ज होत आहेत. इन्सावर भारतीने अगदी हटके पद्धतीने तिच्या नवऱ्यासोबत ती आई होणार ही गोष्ट शेअर केली होती. मजेशीर व्हिडिओमुळे चाहत्यांना सुरुवातील खरंच वाटलं नाही. कारण हा तिचा एखादा मजेशीर व्हिडिओ असू शकतो असंच साऱ्यांना वाटलं. आता पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना भारतीने हटके पद्धतीने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाली भारती…

Year Ender 2021: यावर्षी हे मराठी कलाकार झाले आई-बाबा

भारतीने पापाराझींना मजेशीर उत्तरे दिली

एका कार्यक्रमासाठी भारती तिच्या कारमधून पोहचली. मात्र कारमधून प्रवेश करत असतानाच तिला पापाराझींचा घेराव पडला. सेलिब्रेटींना अशा प्रसंगांना अनेक वेळा सामोरं जावं लागतं. पापाराझी धक्केबुक्के देत अगदी भारतीच्या कारच्या खिडकीजवळच आले. त्यावर भारतीने “या दादा खिडकीतून आता गाडीतच या” अशा पद्धतीने मजा घेतली. त्यानंतर तिच्या पुढे आलेला घेराव पाहून तिने “यावर्षी मलाच मतदान करा” असं म्हणत हात जोडले. जेव्हा एका पापाराझीने भारतीला प्रेगन्सी बाबत विचारले तेव्हा ती म्हणाली, “का बाबा! मी काय चूक केली आहे का मला बाळ होणार आहे तर” कार मधून उतरल्यावरही पापाराझी भारतीवर प्रश्नांचा वर्षाव करतच होते. तेव्हा ती म्हणाली, हे बघा, मी तुम्हाला सांगेन की कोणत्या हॉस्पिटलमध्ये बाळ होणार आहे. तेव्हा सर्वांनी माझ्या डिलिव्हरीच्या खर्चासाठी तुमच्यातर्फे पन्नास पन्नास हजार द्यायला जरूर या. कारण आम्हाला आमच्या पद्धतीने तुमच्यासोबत ही गोड वार्ता शेअर करायची होती. मात्र तुम्ही धडका मारत आमचं सस्पेंस खराब करून टाकलं आहे. त्यामुळे आता मी माझ्या फ्रेंड्सनां सांगेन तुम्हाला हॉस्पिटलचा पत्ता द्यायला मग तुम्ही प्रत्येकाने पन्नास हजार द्यायला हवे “

तेजस्विनी आणि संजय जाधव यांचा ट्रिपल धमाका

ADVERTISEMENT

भारती आणि हर्षच्या आयुष्यातील गोड क्षण

भारती सिंह ने खूप कमी वेळात एक कॉमेडिअन म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे. दहा डिसेंबरला तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत ती आई होणार हे शेअर केलं होतं. ज्यामध्ये तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सरप्राइझ झालेला दिसून आला. या डिसेंबरमध्ये हर्ष आणि भारतीच्या लग्नाला चार वर्षे होत आहेत. भारतीने त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने “मी आई होणार आहे. खूप छान वाटत आहे मम्मील होताना” असं व्यक्त केलं होतं. भारतीसाठी हा क्षण खूप गोड असून ती सध्या कामातून ब्रेक घेत घरी आराम करत आहे.

देवमाणूस 2′ मालिकेची दणक्यात सुरुवात

22 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT