ADVERTISEMENT
home / मनोरंजन
raanbaazaar-web-teaser-released-tejaswini-pandit-getting-all-praises-in-marathi

वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’, मराठी वेब होत आहेत बोल्ड

‘रेगे’ (Rege), ‘ठाकरे’ (Thackeray) असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे (Abhijeet Panse) पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ (Raanbaazaar) असे नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी (Planet Marathi), अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसिरीजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित प्लॅनेट मराठीच्या नवीन वेबसिरीजची घोषणा! याचा पहिलाच टीझर प्रेक्षकांना नक्कीच हादरवून टाकणारा आहे. 

सशक्त विषयाची मांडणी 

या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सांगितले की, ” आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॅान्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षय ला वाटला आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.” 

अतिशय थरारक कथानक 

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे. आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला ‘रानबाजार’विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसिरीजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसिरीज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज 20 मे पासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

तेजस्विनीचा पहिलाच टिझर हादरवून सोडणारा 

मराठी वेबसिरीजमध्येदेखील आता अनेक वेगवेगळे विषय मांडले जात आहेत. तर मराठी वेबसिरीजही आता बोल्ड आणि बिनधास्त होताना दिसून येत आहेत. तेजस्विनी पंडितचा रानबाजारचा हा पहिलाच टीझर प्रेक्षकांना हादरवून सोडणारा आहे. अशा पद्धतीने टीझर आल्यामुळे पुढे आता वेबसिरीजमध्ये नक्की कसा विषय मांडला असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय प्राजक्ता माळीची भूमिका काय असणार आणि इतर कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT